नैराश्यातून बरे कसे व्हावे याबद्दल काही सूचना (Meditation tips to heal depression in Marathi)

तिच्या आयुष्यात निराशा पसरलेली. तिच्याकरिता जीवनात आता पाहिल्यासारखे काहीच राहिले नव्हते. आधी तिला उत्साहित करणाऱ्या गोष्टींना आता तिच्या आयुष्यात काही अर्थ किंवा जागा उरली नव्हती. काळोख तिचा कायमचा साथीदार झाला कारण तिने स्वतःला परिवार आणि मित्रमैत्रीणींपासून अलिप्त केले. नव्या दिवसाचा कसलाही उत्साह उरला नव्हता आणि कधीकधी तिला स्वतःचे आयुष्य संपवून टाकावे हा विचार तिच्या मनात डोकवायचा. पण तिचे तिच्या आई वडिलांवर असणाऱ्या प्रेमामुळे केवळ तिला हिंमत झाली नाही.

“हल्ली माझ्या मनासारखे काहीही घडत नाही. आयुष्य भकास वाटते आणि घट्ट धरून ठेवायला मला कोणताही आधार सापडत नाही. जगातले सगळेजण माझ्याविरुद्ध कटकारस्थान करीत आहेत आणि मी प्रवाहाच्या विरुद्ध झगडते आहे असे वाटते. माझे आयुष्य एकाकी झालेले. माझ्या स्वप्नांचा चुराडा झालेला. मला आता जगण्यासाठी काहीच कारण उरले नाहीये आणि मृत्यूला कवटाळायला अनेक कारणे आहेत. मी एकटी आहे, मी हताश झालेली आहे. मला आता अजिबात सहन होत नाही.", ही एका २३-वर्षीय युवतीच्या डायरीतील नोंद आहे.

नैराश्याच्या काळ्याकुट्ट काळात थोडेफार आधार आहेत ज्यांना पकडून ठेवता येते. हे तुमच्या अडचणींच्या काळात तुमचे आधारस्तंभ ठरतील. खाली दिलेले काही विश्वसनीय आणि कसोटीस उतरलेले मार्ग आहेत जे कठीण काळात तुमचे सच्चे साथीदार असतील आणि तुम्हाला नैराश्यातून बरे आणतील.

#१ तुम्हाला फक्त आरामात बसायचे आहे.

नैराश्य तुम्हाला इतके शक्तिहीन करून टाकते की तुम्ही कोणतेही काम करू शकत नाही हे आम्हाला समजते. या कारणामुळे बरे होण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलणे तुम्हाला कठीण होते. तर मग संपूर्ण शिथिल होऊन बरे होण्याची प्रक्रिया सुरु करू या? शिथिल होण्याचे सर्वोत्तम तंत्र आहे ध्यान. हे तर तुम्हाला शिथिल तर करतेच पण त्याशिवाय तुम्हाला ताजेतवानेसुद्धा करते ज्यामुळे इतर तंत्रे करण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा येते.

जर तुम्ही काही आघात अनुभवला आहे तर - तुमच्या मनातील दु:खद ठश्यांना हळूहळू पुसून टाकून तुम्हाला बरे करते. तणावामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जेला मुक्तपणे संचार करता येत नाही. ध्यान केल्याने ऊर्जेच्या वाहिन्यातील अडथळा बनलेला तणाव काढून टाकते. आनंद, उत्साह आणि प्रेम यांनी तुम्हाला पुनःप्रभारित करते.

“ध्यान तुम्हाला तुमचे मन शांत करण्यात मदत करते आणि तुम्हाला आतून आनंदित करते. ध्यानाद्वारे आणि श्वसन तंत्रांद्वारे अनेक आजारांमध्ये मदत होऊ शकते. अनेक लक्षणीय संशोधन हे दर्शविते की ध्यानामुळे परिस्थितीत आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, झोपेचे त्रास आणि मज्जासंस्थेचे आजार अश्या आजारांपासून मुक्ती मिळते. “मी तर म्हणतो ध्यान हे आत्म्याचे अन्न आहे.”, असे श्री श्री रविशंकर, अध्यात्मिक गुरु, मानवतावादी आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, म्हणतात.

# २ तुमच्या श्वासातच तुमच्या आनंदाचे गुपित दडले आहे.

तुमच्या श्वासामध्ये तुमच्या निरोगीपणाची अनेक अकथित गुपिते दडलेली आहेत. सुदर्शन क्रिया (SKY) हे अद्वितीय आणि शक्तिशाली तालबद्ध श्वसनाचे तंत्र आहे जे तुमच्या स्वास्थ्याच्या गुपिताची उकल करते.

सुदर्शन क्रिया ही औषधांशिवाय तुमच्या शरीराचे नैसर्गिक संतुलन तर राखतेच पण त्याचबरोबर ती शरीरातील ९० टक्के विषारी द्रव्ये बाहेर फेकते, काँर्टीझाँल (शरीरात तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्स)ची मात्रा कमी करते, अस्वस्थतेपासून सुटका करते आणि झोपेच्या चक्राला पुनःप्रस्थापित करते. प्रोलॅक्टिन (आनंद निर्माण करणाऱ्या हार्मोन्स) च्या निर्मितीमध्ये वाढ करून सुदर्शन क्रिया तुमच्यामध्ये ऊर्जेचे संचारण करते.

नुकत्याच केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष आहे: “SKY (सुदर्शन क्रिया) उपचार पद्धतीमुळे नैराश्याचा प्रभाव कमी होतो. सुदर्शन क्रियेचा परिणाम नैराश्य घालवणाऱ्या औषधांप्रमाणे होतो. आणि हा परिणाम ३ आठवड्यांमध्येच दिसून येतो. (संशोधन पेपर: P३०० अँमलिप्ट्युड अँन्ड अँन्टीडीप्रेसन्ट रिसपॉन्स टू SKY – ३)

सुदर्शन क्रिया ही प्रशिक्षित शिक्षकाकडूनच शिकता येते. तुम्हीसुद्धा ती शिकू शकता. तुम्हाला बस्स तुमच्या जीवनातील काही तास काढायचे आहेत.

 

नैराश्यातून बाहेर पडण्याकरिता हरी ॐ ध्यान

नैराश्यातून बाहेर पाडण्यात सर्व प्रकारच्या ध्यानांचा समान फायदा जरी असला तरी हरी ॐ ध्यानामुळे विशेष प्रभावी परिणाम होतो असे दिसून आले आहे कारण त्यामध्ये आपल्या शरीरातील सात ऊर्जाचा केंद्रांकडे लक्ष देण्यात येते. नैराश्य म्हणजे ऊर्जेची अधोगती होणे, आणि हरी ॐ ध्यानामध्ये आपण सर्वात खालच्या ऊर्जा केंद्राकडून सुरुवात करून सर्वोच्च ऊर्जा केंद्रावर आपले लक्ष केंद्रित करतो. प्रत्येक ऊर्जा केंद्राचा संबंध एका खास भावनेबरोबर आहे. आणि प्रत्येक केंद्राबद्दल आपल्याला जागरुकता झाल्यामुळे त्यांचे शुद्धीकरण होते आणि त्यामुळे भूतकाळात जमा झालेला तणाव निघून जातो आणि जीवनात हलकेपणा जाणवतो.

तुम्ही  घरच्या घरी हरी ॐ ध्यान करू शकता.

नैराश्यातून बाहेर कसे पडावे क्रमशः......