ध्यान कसे सहायक आहे समृद्धीचा अनुभव घेण्यासाठी

जर फक्त तिच्यासारखी  बुद्धी माझ्याकडे असेल तर....  

जर फक्त त्यांचे कलात्मक खेळ आणि त्यांच्यावर आहे तशी कृपा माझ्याकडे असते तर....

जर फक्त तिची शैली/संयम व सौन्दर्य माझे असते तर.....

आपल्याला सर्वांना आपल्या आयुष्यातील एखाद्या वळणावर असे वाटत असते कि ते काहीतरी आपल्याकडे असते जे आपल्याकडे नाही.हे स्वाभाविक आहे . आताही , तुम्ही कधी विचार केला आहे का, कि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आधीपासूनच तुमच्याकडे आहेत?

नक्कीच, आयुष्यात काही क्षण पूर्णत्वाचे असतात तर काही अपूर्णत्वाचे. ते क्षण, जेंव्हा आपण पूर्ण  समाधानी  आणि गहनतम् शांततेत असतो. ते क्षण आपल्याला परत कसे मिळतील हा प्रश्न आपल्या बुद्धीला सारखा विचारच करायला लावतो. खरोखर,त्याचे उत्तर ध्यानामध्ये आहे. ते आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी  चामत्कारिकरीत्या काम करते.

meditation abundance marathi

समृद्धी म्हणजे काय?

तुम्ही काय विचार करता जेंव्हा मी समृद्धी म्हणतो? हे उत्पन्न किंवा संपत्ती समजले जाते का? आरोग्य? खूप मित्र- मैत्रिणी? कारकिर्दीतील प्रगती आणि भरभराट? कि ,कृतज्ञतेची भावना आणि प्रेम त्या सर्व गोष्टींसाठी जे तुमच्या आयुष्यात आहे?कदाचित , ह्याच त्या सर्व गोष्टी आहेत ज्या प्रमाण मानल्या जातात.

समृद्धी हि भावना अथवा जाणीव आहे विपुल/ मुबलक असण्याची.नुसताच फक्त विश्वास नाही कि 'चांगल्या  गोष्टी' तुमच्याकडे  येतील पण ज्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत त्या येतील.हि वृत्तीच ते रहस्य आहे परिपूर्ण जीवन जगण्यासाठीचे.

तुम्ही समृद्धी अनुभवणार कशी?

तुम्हाला समृद्धीचा अनुभव घेण्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला वस्तूंचा संचय करण्याची किंवा माणसे जमवण्याची गरज नाही. खरेतर, काहीवेळा त्याच्यावर ताबा मिळवणे/पकड असणे आणि तशी नुसती भावना यांचा त्याग करून तुम्ही समृद्धीचा अनुभव करण्यापर्यंत पोहचू शकता.

 

तुम्हाला गरज आहे ती  तुमच्याकडे आधीपासूनच जे आहे त्याचा अनुभव करण्याची. आणि काय पाहिजे, मग ह्या विश्वात असणारी समृद्धी पाहून तुम्ही कदाचित सद्गतीत होण्याचा अनुभव कराल!हीच तर शक्ती आहे ध्यानाची. समृद्धी आपल्याकडे सर्व बाजूंनी आहेच आणि  ध्यान त्याच्या प्रति सजग करते.

समृद्धी अनुभवण्यासाठी ध्यान कसे सहायक आहे? 

 

० समृद्धी आणि प्रेमासाठी आंतरिक स्थिती निर्माण करते

ध्यान तुमच्या सर्व चिंता आणि ताण - तणाव पासून मुक्तता करण्यासाठी मदत करते. जेंव्हा ह्या नकारात्मक भावना तुम्हाला सोडून जातात, तुम्ही सकारात्मकता अनुभव करण्यासाठी तयार होता.तुम्ही अशा स्थितीमध्ये असता ज्या स्थितीमध्ये तुम्ही सगळीकडून सकारात्मकता अनुभव करू शकता. चांगल्या गोष्टींचा प्रवाह तेंव्हाच असतो जेंव्हा तुम्ही त्यांचे स्वागत करता आणि त्यांना उत्तेजन देता.म्हणूनच समृद्धी  अनुभवण्यासाठी तुम्ही ध्यानाचा वापर करू शकता. ते तुमच्यामध्ये ती स्थिती तयार करते.

० जगातील सर्वात चांगल्या भावनेचा अनुभव करण्यासाठी

तुम्हाला माहिती आहे जगातील सर्वात चांगली भावना काय आहे? ती तुम्ही खूप कष्ट घेऊन काम केले म्हणून मिळालेली पदोन्नती आहे का? ती विजय आहे का प्रतिस्पर्धी किंवा स्वतः वरचा ? ती मजेदार आईस्क्रीमची  चव  आहे का? ती तुमचे मूल जेंव्हा एखादा  अवघड अडथळा पार करते ते आहे का? हो ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्ही आनंद अनुभव करू शकता.

पण हे सीमित शक्यतेच्या भावनेपर्यंत जाऊ शकते. " काहीही शक्य होऊ शकते!" हि जगातील सर्वात चांगली भावना आहे. म्हणूनच ध्यान योग्य आहे. प्रेम, शक्यता ,समृद्धीचा अनुभव  घेण्यासाठी.

० तुमच्या दृष्टिकोनामध्ये आणि वृत्तीमध्ये बदल घडविण्यासाठी

जेंव्हा तुम्हाला तुमच्या  आयुष्यात समृद्धीची जाणीव  होते तेंव्हा समृद्धी वाढते.म्हणूनच, ह्या जाणिवेनेच आयुष्यात पुढे जा कि जे तुम्हाला गरजेचे आहे ते आधीपासूनच तुमच्याकडे आहे. 

-गुरुदेव श्री श्री रविशंकर 

जर तुम्ही नाकारत्मकतेकडे लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला फक्त नकारत्मकतेची जाणीव होईल. जर तुम्ही सकारात्मकतेचा अनुभव कराल , स्वीकाराल /महत्व ओळखाल तर तुम्ही त्याबद्दल परिपूर्ण अनुभव कराल.

म्हणूनच ज्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल, ते वृद्धिंगत होईल.हे तुमच्या कृती आणि शब्दांबाबतही सत्य आहे.

जर तुम्ही असे म्हणालात कि माझ्याकडे खूप आहे आणि माझ्याकडे मला पर्याप्त/ पुरेसे आहे.तुम्हाला फक्त त्याचाच अनुभव येईल. ध्यान हा मार्ग आहे प्रेम आणि समृद्धीचा अनुभव करण्याचा. माझ्याकडे कमतरता आहे या जाणिवेमधून ते तुम्हाला माझ्याकडे खूप आहे या जाणिवेकडे घेऊन जाते.

इच्छांना सत्यात उतरवते

आपल्या सगळ्यांना इच्छा आहेत. आपण जेंव्हा आपल्या इच्छापूर्तीकरिता वेळेची मर्यादा ठरवितो तेंव्हा आपण निराशेला आमंत्रण देतो. इच्छा आपल्याला आनंदी करतात - पण काही प्रमाणात. त्यानंतर, जर आपण ध्यास घेतला , तर त्या जळूप्रमाणे आपल्याला चिटकूनच  बसतात आणि आपले आयुष्यच अवघड करतात. कारण इच्छा आपले सर्व घेणाऱ्या व हानी करणाऱ्या आहेत.

त्यापेक्षा हे करून पहा , तुमच्या स्वप्नांचे स्वप्न बघा आणि त्याच्यासाठी काम करा. त्यानंतर इच्छा समर्पित करा. तुम्ही चकित व्हाल कि किती लवकर गोष्टी तुमच्याकडे येतील जेंव्हा तुम्ही त्यांच्या मागे लागण्याचा प्रयास सोडता. निश्चितपणे तेंव्हाच समृद्धीचा अनुभव घेण्यासाठी  ध्यान उपयोगी आहे.ते तुम्हाला केंद्रित आणि ग्रहणशील बनवते. तुमच्या जागरूकतेची कक्षा रुंदावते आणि तुमच्या आंतरिक स्थितीची जडणघडण आयुष्याचे पहलु खुले करते. इच्छांनी व्याप्त व्हावी अशी थोडीही जागा नाही.

जेंव्हा सर्व प्रकारची समृद्धी असते , वैराग्य येते. आणि जेंव्हा वैराग्य असते , सर्व प्रकारची समृद्धी येते.

-गुरुदेव श्री श्री रविशंकर

समृद्धीचा अनुभव करण्यासाठी ऑनलाईन/ इंटरनेट वरून प्रक्षेपित केलेले 'निर्देशित ध्यान' 

ध्यान तुमच्यासाठी नवीन आहे का? समृद्धीचा अनुभव घेण्यासाठी निर्देशित ध्यानला सुरुवात करा.जर तुम्ही बघताना ग्लास अर्धा रिकामा आहे असे बघत असाल तर निर्देशित ध्यान प्रकारातील ट्रान्सफॉर्मिंग इमोशन्स हे ध्यान करा . ह्या निर्देशित ध्यानामुळे तुम्ही नैसर्गिकपणे समृद्धी आणि कृतज्ञतेचा अनुभव करू शकाल. तुम्हाला फक्त दिवसातून २ वेळा २० मिनिटांचा वेळ काढण्याची गरज आहे. 

वेळ, दुर्मिळ गोष्ट , पण ध्यानामुळे तुमच्यासाठी सुनियोजित होते! म्हणूनच निर्देशित ध्यान प्रकाराने ध्यान करा. समृद्धी आणि कृतज्ञतेचा अनुभव घेण्यासाठी अथवा तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा सहाकार्ऱ्यांच्या बरोबर समूहाने ध्यान करा. त्याच्यामुळे तुम्ही शांत, सकारात्मक आणि समृद्धतेचा अनुभव कराल!

आर्ट ऑफ लिविंगचा 'सहज समाधी  कार्यक्रम' तुम्हाला सहजतेने तुमच्या आंतरिक स्थितीशी जोडण्यासाठी मदत करेल. तुम्ही आनंदी, शांत अतिशय समृद्धीचा अनुभव कराल जे तुमच्या सर्व बाजूंनी आहे.!

 

लेखन: अनुषा चेल्लपा 

(आधार- प्राजक्ता देशमुख,शिक्षक, द आर्ट ऑफ लिविंग )