मी ध्यान योग्य प्रकारे करत आहे हे मला कसे कळेल?

“ध्यानाच्या प्रत्येक सरावानंतर माझ्या तेजाला बघून मी स्वतः आश्चर्यचकित होते. ध्यानामुळे मला दोन तासांच्या झोपे इतकी विश्रांती प्राप्त होते तेसुद्धा केवळ २० मिनिटातच!!” हा किलकिलाट केला माझी ध्यानाच्या वर्गातील मैत्रीण चारी हिने. तिने तिचे अनुभव सांगणे चालूच ठेवले आणि मी वेगळ्याच विचारात आहे याकडे तिचे अजिबात लक्षच नव्हते. माझ्या गेल्या ५ महिन्यांच्या ध्यानाच्या प्रवासात मला इतके आगळेवेगळे अनुभव का आले नाहीत याचे मला नवल वाटत होते. माझासुद्धा दैनंदिन ध्यानाचा सराव आहे पण या संभाषणामुळे मला माझ्यावरच आणि अर्थात माझ्या ध्यानाच्या तंत्रावर शंका येऊ लागली. माझी ध्यान धरण्याची पद्धत तर बरोबर आहे ना? असे विचार माझ्या मनात येऊ लागले.

मला खात्री आहे की अशा प्रकारे विचार करणारी मी एकमेव व्यक्ती नाही आहे. तुमच्या मनातसुद्धा असे विचार येतात का? माझ्या ध्यानाच्या प्रशिक्षकांकडे आपल्या शंकांकरिता उत्तरे आहेत.

तुम्ही योग्य प्रकारे ध्यान करीत असल्याची ५ लक्षणे

#१ तुम्ही सूचनांचे नीट व्यवस्थित पालन करीत आहात

ध्यानात खोलवर जाणेकिती सोपे होते जेव्हा तुम्हाला काही सुचनांद्वारा मार्गदर्शित केले जाते हे तुमच्या लक्षात आले आहे का? म्हणूनच जेव्हा कधी तुम्ही ध्यानाच्या सत्राला उपस्थित राहाल तेव्हा तिथे दिल्या जाणाऱ्या सूचना नीट लक्षपूर्वक ग्रहण करा आणि घरी गेल्यावर त्यांचे योग्यप्रकारे पालन करा. या सूचना म्हणजे रूळ आहेत ज्यावरून तुमची आगगाडी तुम्हाला स्वतःच्या आत घेऊन जाईल.

तर ध्यान करताना जोपर्यंत तुम्ही सूचनांचे व्यवस्थित पालन करीत आहात म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही नक्कीच योग्यप्रकारे ध्यान करीत आहात.

#२ ध्यान करताना तुम्ही ‘कोणत्याही विशिष्ठ अनुभवा’बरोबर जोडलेले असत नाही

जेव्हा तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात गाडीने जात असता तेव्हा कधी सुंदर निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते तर कधी तुम्ही ट्राफिकमध्ये अडकता असे तुमच्या कधी लक्षात आले आहे का? आणि तरीसुद्धा हे दोन्ही एकाच प्रवासाचा भाग असतात, हो ना? त्याचप्रमाणे मन विचारांच्या कल्लोळात अडकलेले असो किंवा शांत असो, काळीज पिसाप्रमाणे हलके असो किंवा डोके जड असो, ध्यान करताना मनाची कोणतीही अवस्था ही “अनुभव” म्हणून धरली जाते.

तुमच्या हे लक्षात आलेच असेल की कित्येक वेळा आपण एका विशिष्ठ अनुभवला धरून ठेवतो आणि आपल्या ध्यानाच्या बाबतीत एक पक्के मत बनवून त्याला घट्ट धरून बसतो. हे समजून घेणे फार चांगले राहील की ध्यान हा एक प्रवास आहे आणि तो काही अंतिम मुक्कामाचे ठिकाण नाही ज्यात तुम्हाला विशिष्ठ खुणेची चिन्हे दिसणार आहेत.

#३ तुम्हाला तुमच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत

काय तुम्हाला हे माहित होते का की तुमच्या ध्यानाची गहनता आणि त्याचे परिणाम हे तुमच्या दैनंदिन जीवन शैलीमध्ये सहजपणे दिसून येतात? काय तुम्हाला अधिक शांतपणा, शिथिलता आणि मनामध्ये स्पष्टपणा, इतर माणसांच्या गरजांच्या बाबतीत तुम्ही अधिक संवेदनशील आहात या सर्वचा अनुभव आला आहे का? तुम्हीं स्वतःला उगीचच आनंदी आणि कारणाशिवाय हसताना पाहाता का? जर याचे उत्तर हो असेल तर हे जाणून घ्या की तुम्ही ध्यान योग्यप्रकारे करीत आहात. यासाठी तुम्ही स्वतःची पाठसुद्धा थोपटवून घेऊ शकता.

आणि जरी तुम्हाला काही बदल जाणवत नसेल तरीसुद्धा लक्षात घ्या की तुम्ही योग्यप्रकारे ध्यान करीत आहात, तुमच्यातील बदलांच्याबाबतीत तुम्ही केवळ अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे. कित्येक वेळा घडून येणारे बदल हे तरल असतात आणि ते आपल्या अजिबात लक्षात येत नाहीत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या ध्यान प्रशिक्षकाबरोबर याबाबतीत बोलू शकता.

#४ ‘मला काही नको, मला काही करायचे नाहीये, मी काहीही नाहीये’, ही तुमची वृत्ती असते

कित्येकदा तुम्ही स्वतःला इच्छा आणि चिंता यांच्या दुष्टचक्रात अडकलेले पहिले आहे का? तुम्ही पाहिले आहे का की ते आपल्याला इतके शक्तिहीन करून टाकतात की आपण त्यांच्यासमोर हारून जातो? त्यांचा बोजा आपण आपल्या डोक्यावर घेऊन चालतो आणि आपल्या डोक्यात त्यांच्यावर काय उपाय करावा हा प्रकाश पडत नसतो. श्री श्री रविशंकर म्हणतात, “तुम्हाला इच्छा असण्यात काहीच चुकीचे नाही परंतु इच्छांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. ‘मला काही नको, मला काही करायचे नाहीये, मी काहीही नाहीये’ ही वृत्ती असेल तरच ध्यान शक्य होते.”

#५ तुम्ही ज्या आसनात बसला आहात ते तुम्हाला सुखदायक वाटते

नेहमी बसून ध्यान करणे हे इष्ट आहे. मग तुम्ही सोफ्यावर बसा, खुर्चीवर बसा, गालिच्यावर बसा किंवा मग सतरंजीवर बसा. तुम्ही आडवे होऊन झोपलेले नाही ना किंवा तुम्ही वाकलेले तर नाही ना याची नक्की खात्री करून घ्या. आडवी किंवा बाक आलेली पाठ (वाकलेली/ आडवे झोपणे) यामुळे तुमचे मन विशाल होऊ शकत नाही आणि ध्यान धरू शकत नाही. यामुळे खरे पाहता तुम्हाला झोप येऊ लागेल.

पाठीचा कणा ताठ ठेऊन बसणे हे फार महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपले आसन हे सुखदायी असणे यामुळे चांगले आणि गहन ध्यान शक्य होते. तुम्ही काही योगासनांचा सरावसुद्धा करू शकता ज्यामुळे तुमची क्षमता आणि लवचिकपणा विकसित होतो आणि त्यामुळे ध्यान करताना तुम्ही एखाद्या आसनामध्ये बराच अवधी शिथिल होऊन बसण्यात मदत होते.

श्री श्री रविशंकर म्हणतात, “ध्यान ही काहीही न करण्याची आणि सर्व सोडून देण्याची कला आहे”. ते मनावर सुसंस्कार करते आणि मनाला चिंता आणि पूर्वसंचित ठस्यांना सोडून देण्यात मदत करते. या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे ध्यान हा एक वैयक्तिक प्रवास आहे जो शांततामय आणि समाधानी जीवनासाठी टिकून राहणारी बांधिलकी आणण्यासाठी जरुरी आहे हे लक्षात येणे होय.

श्री श्री रविशंकर यांचे ज्ञानावरील भाष्य यावरून प्रेरित

लेखक निखील गुप्ता

भारथी हरीश, सहज समाधी मेडीटेशन शिक्षिका यांनी दिलेल्या माहितीवर आधारित

 

 

 

Get to learn Meditation