योग निद्रा हे गाढ विश्रांतीच्या अनुभवासाठी आणि आपली कार्यक्षमता वाढवणारे एक अमूल्य तंत्र आहे. हे एक मार्गदर्शित ध्यान आहे, आपणास कोणतेही प्रयत्न करण्याची गरज नाही. योग निद्रेचा नियमित सराव केल्याने आपल्याला सखोल विश्रांती मिळते आणि आघात आणि ताणतणाव दूर होण्यासही मदत होते. २० मिनिटांची योग निद्रा किंवा योगिक झोप आपणास दुपारच्या झोपेपेक्षा जास्त गाढ विश्रांती देऊ शकते. योग निद्रेमध्ये शांत जागरुकता समाविष्ट आहे.
योग निद्रा आणि झोप यातील फरक

झोप ही आपल्या चेतनेच्या चार नैसर्गिक अवस्थांपैकी एक आहे – जागरण, स्वप्न, निद्रा आणि चौथी म्हणजे तुरिया अवस्था किंवा समाधी. साधारणपणे आपण जागृत अवस्थेपासून स्वप्नाकडे झोपेच्या अवस्थेकडे जातो. जेव्हा आपण झोपायला आडवे होतो तेव्हा हे सामान्य तंत्र आहे. परंतु झोपेत, संपूर्ण जाणीव नष्ट होते आणि पाचही ज्ञानेंद्रिये बंद होतात. संवेदना बंद झाल्याने आपल्या प्रणालीला ऊर्जा मिळते. परंतु योग निद्रामध्ये, इंद्रियांना विश्रांती मिळत असली तरीही, आवाज किंवा निर्देशाच्या स्त्रोताकडे हळूवारपणे लक्ष दिल्यास, आपण जागरूकता टिकवून ठेवतो. योग निद्रेमध्ये प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आपण आपली जाणीव शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधून फिरवतो. योग निद्रेमध्ये आपण श्वासाचीही मदत घेतो.
त्यामुळे श्वासोच्छवासाच्या सहाय्याने संपूर्ण शरीरात आपली जागरुकता हलवल्याने आपणास सामान्य झोपेपेक्षा अधिक गाढ विश्रांती मिळते.
योगामध्ये, जागरूकता ही ऊर्जा आहे. म्हणून जेव्हा आपणास आपल्या गुडघ्यांची जाणीव होते, तेव्हा ते उर्जित होतात; जर पाठीच्या खालच्या भागात आपली जागरूकता आणली तर आपण पाठीच्या खालच्या भागात ऊर्जा पाठवत असतो. त्याचप्रमाणे, योग निद्रेमध्ये, शरीराच्या सर्व अवयवांमध्ये आपली जागरुकता आणणे आणि त्यांना जाणीवपूर्वक शिथिल केल्याने आपले संपूर्ण शरीर आणि मन उत्साही होते.
योग निद्रा आणि ध्यान
योग निद्रा आपणास ध्यानस्थ अवस्थेत आणते, हे आणखी काहीही नसून एक प्रकारचे आडवे होऊन केलेले ध्यान आहे.
गाढ विश्रांती आणि गतिशील क्रिया पूरक आहेत. जर आपण आपल्या मनाला आणि शरीराला गाढ विश्रांती दिली नसेल तर आपण गतिमान आणि सक्रिय कसे होऊ शकू? जो कधीही झोपला नाही त्याला अजिबात उत्साही वाटू शकत नाही.
~गुरुदेव श्री श्री रवि शंकर
योग निद्रा सरावाचे महत्त्व
आपल्या दैनंदिन जीवनात काय घडते ते पाहू. मनाच्या पातळीवर आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही विचार असतात. आपल्यात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही भावना असतात. मग विचार म्हणजे काय आणि भावना म्हणजे काय? विचार हे मनाच्या स्तरावरील उर्जेच्या काही लहरी असतात आणि भावना या भावनांच्या स्तरावरील उर्जेच्या काही लहरी असतात. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार, तसेच सकारात्मक आणि नकारात्मक भावना, आपला प्राण आपल्या सूक्ष्म शरीरात हलवतात. जर ते काहीतरी सकारात्मक असेल तर ते आपल्या मज्जासंस्थेला उत्तेजना आणि स्फूर्ती देते. नकारात्मक असेल तर आपल्या मज्जासंस्थेचे आकुंचन किंवा संकोचन घडवून आणते. आपल्या आयुष्यात आपण बोलत असो, कामावर असो, घरी असो किंवा जीवनातील विविध आव्हानांना तोंड देत असो, प्रत्येक कार्यात आपण या उत्साहात किंवा विस्तारात आणि आकुंचना दरम्यान सतत दोलायमान राहतो आणि यामुळे विचार आणि भावनांच्या पातळीवर तणाव निर्माण होतो. आपली मज्जासंस्था हे सर्व शोषून घेत असते.
आता आपण योग निद्रा केल्यावर काय होते ते पाहू. जेव्हा आपण आडवे होतो, प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली असतो तेव्हा आपण तुलनेने अधिक आरामशीर असतो. मग आपण आपली जाणीव शरीराच्या एका भागातून दुस-या भागात फिरवण्यास सुरुवात करतो आणि आपण आरामात श्वासही घेत असतो. हळुहळू, भूतकाळ आणि भविष्याच्या पाशात सदैव गुरफटलेले मन, खेदाने, रागाने किंवा चिंतेने माखलेले किंवा अडकलेले मन त्या पाशातून बाहेर पडू लागते आणि वर्तमानात येते. जेव्हा आपले मन वर्तमान क्षणात पूर्णपणे असते; आपण काहीही करत नाही, आपण काहीही नियोजन करत नाही, आपण विचार करत नाही. आपले मन भूतकाळात नाही, राग किंवा पश्चात्ताप नाही. मन वर्तमानात येताच, मनाने जे काही धरून आहे ते, भूतकाळ आणि भविष्यकाळ, भूतकाळाचे ठसे आणि भविष्यातील चिंता; यांना मन सोडून देऊ लागते. मज्जासंस्था गाढ विश्रांतीच्या अवस्थेत पोहोचते जिथे मन स्वतःवरील ठसे सोडून देऊ लागते. कोणते ठसे सोडवले जात आहेत हे आपल्याला समजत नाही, परंतु ते सोडवले जातात. यामुळे तणावातून आराम मिळतो. विचारांद्वारे जमा केलेला मानसिक ताण आपण सोडतो, शारीरिक ताणाबरोबरच भावना आणि भावनांद्वारे जमा केलेला भावनिक ताणही सोडतो, कारण आपण पाठीवर झोपून दीर्घ श्वास घेत असतो, स्नायूंचा खरा शारीरिक थकवाही निघून जातो. त्यामुळे योग निद्रा म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताणतणावांपासून पूर्णपणे मुक्त होणे होय.
योग निद्रेचा नियमित सराव केल्याने खोलवर रुतून बसलेला आघात दूर होऊ शकतो
योग निद्रेच्या सातत्यपूर्ण सरावाने मोठा बदल घडून येतो. जेव्हा आपण योग निद्रा नियमितपणे करतो तेव्हा सुरुवातीला ते रोजचे किंवा छोटे ताण यापासून सुटका देते. परंतु जर आपण ती दीर्घ कालावधीसाठी नियमितपणे केली तर योग निद्रेचा सराव जसजसा खोलवर होऊ लागतो, तसतसे खोलवर रुतून बसलेले आघातांपासून, खूप जुन्या आठवणी ज्या आपणास आपल्या मन-शरीर यांच्या क्लिष्टतेतून सोडवता आल्या नाहीत, त्यापासून देखील सुटका मिळते.
योग निद्राचे महत्त्व, अगदी नियमित योगाभ्यास करणाऱ्यां करिता सुद्धा
जेव्हा आपण योगाभ्यास करत असतो, तेव्हा आपण शरीराच्या पातळीवर प्रयत्न करत असतो. आता आपल्या लक्षात येईल की आपल्या दैनंदिन जीवनात आपण कंटाळवाणी जीवनशैली जगत असतो. आम्ही सर्व वेळ काम करत असतो. त्यामुळे आता योग हा देखील काहीतरी करण्याचा भाग आहे. परंतु योग निद्रा किंवा ध्यान या दरम्यान, जेव्हा आपण काहीही न करण्याच्या अवस्थेत जातो, परंतु आराम करण्याच्या हेतूने आराम करतो तेव्हा ती वेळ काही कालावधीसाठी असते. तिथे फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण ‘करण्याने’ थकवा येतो किंवा दमछाक होते. त्यामुळे आपण योग करत असलात तरी शेवटी तो करण्यासाठी प्रयत्न हा असतोच; परंतु योग निद्रेमध्ये आपण सहजतेच्या अवस्थेत जातो जे आपल्या शरीराला आणि मनाला आवश्यक असलेल्या विश्रांतीचा सर्वात गहन प्रकार आहे.
गुरुदेवांनी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा आपणास दूरवर बाण मारायचा असेल, तेव्हा तो मागे खेचावा लागतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण अत्यंत व्यस्त जीवनशैली जगत असतो आणि चोवीस तास एकाच वेळी अनेक कामे करत असतो, तेव्हा विश्रांतीची गुणवत्ता देखील तितकीच खोल असणे आवश्यक आहे. जेव्हा खूप क्रियाकलापांचा समावेश असतो, तेव्हा आपण जे करतो त्यामध्ये अधिक कार्यक्षम होण्यासाठी आपल्याला उच्च दर्जाच्या विश्रांतीची आवश्यकता असते.
कोणत्याही आसन क्रमाच्या शेवटी योग निद्रा समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे कारण शरीर आणि मनाला आसनांचे परिणाम आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
योग निद्रा करताना काही मुद्दे लक्षात ठेवा
- शिथिल राहा. योग निद्रा करण्यापूर्वी, जर काही इच्छा किंवा संकल्प असेल तर ते फक्त २-३ वेळा मनात आणा आणि नंतर पूर्णपणे सोडून द्या.
- हळुवारपणे या तीन गोष्टी लक्षात ठेवा- मला काहीही नको आहे, मी काहीही करत नाही, मी काहीही नाही. आणि मग पूर्णपणे सोडून द्या.
- सरावात नियमित रहा. बराच काळ शिस्तबद्ध पद्धतीने करा.
- या सरावाचा देखील सन्मानाने स्वीकारा. जेव्हा आपण ही साधना सन्मानाने करतो, तेव्हा अनुभव गहन होतो आणि त्याची गुणवत्ता वाढते.











