मकरासन (मकर – मगर मुद्रा) हे एक गहिरे ताजेतवाने करणारे आसन आहे, तसेच हे पद्म साधनेतील एक आसन आहे. मगरीची स्थिती संपूर्ण मज्जासंस्थेला आराम देते आणि पाठ मजबूत करणाऱ्या स्थितीसाठी एक उत्कृष्ट आसन आहे. त्याचे संस्कृत नांव, मकर म्हणजे मगर आणि आसन यावरून पडले आहे.
मकरासन कसे करावे
- पोटावर झोपा.
- आपला उजवा पाय वाकवा, आपल्या मांडी आणि पायाच्या पोटरीसह ४५ अंशाचा कोन तयार करा.
- डावा पाय खालच्या भागाकडे सरळ ठेवा.
- आपला डावा गाल आपल्या चटईवर ठेवा आणि उजवीकडे पहा.
- आपले हात आपल्या डाव्या गालाच्या खाली उशीसारखे ठेवा.
- या स्थितीत १५ मिनिटांपर्यंत विश्रांती घ्या. गहिरे श्वास घेत रहा.
मकरासनाचे फायदे
- खोल विश्रांती प्रदान करते.
- पाठीचा ताण कमी होतो.
- तणावमुक्त होतो.
सावधगिरी
- गरोदरपणात याचा सराव करणे टाळा.
बदल आणि फरक
- बदल करण्यासाठी: आपल्या गुडघ्यामध्ये समस्या असल्यास दोन्ही पाय खाली सरळ ठेवून झोपा.
पूर्वतयारीची आसने आणि नंतरची आसने
- पद्म साधना
- भुजंगासन (पूर्वतयारीसाठी)
- शलभासन (पूर्वतयारीसाठी)
- विपरित शलभासन (पूर्वतयारीसाठी)
- शिशु मुद्रा (नंतरचे आसन)
- शवासन (नंतरचे आसन)
योग ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे सराव सुरू ठेवा! आपण आपल्या योगाभ्यासात जितके प्रवीण होऊ, तेवढे त्यात प्रगल्भ होत जाल. मकरासनाचा सराव करण्याचा आनंद घ्या आणि लाभ मिळवा.
योगाभ्यास शरीराचा आणि मनाचा विकास करण्यास मदत करते आणि बरेच आरोग्याचे फायदे देते तरीही ते औषधाला पर्याय नाही. प्रशिक्षित श्री श्री योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली योगासने शिकणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. कोणत्याही वैद्यकीय समस्येच्या बाबतीत, डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला घेतल्यानंतरच योगासनांचा सराव करा.











