शव – प्रेत; आसन – शरीराची मुद्रा / पवित्रा
संस्कृत शब्द ‘शव’ चा अर्थ ‘प्रेत’ असा होतो. शवासनाला ‘मृत-आसन’ असेही म्हटले जाते. मृत शरीराप्रमाणे आडवे पडून केले जात असल्याने त्याला हे नाव मिळाले आहे. शरीराला शिथील करण्याचे आणि विश्राम देणारे हे आसन आहे. योग वर्गाच्या शेवटाला या आसनाचा सराव केला जातो. योग वर्गाची सुरुवात क्रियाशील गोष्टींपासून होऊन विश्राम करत शेवट होतो. थोडा विश्राम किंवा अवकाश शरीराला मिळाला की शरीराची झीज भरून निघते.
शवासन कसे करावे
- पाठीवर झोपा. आपले पाय एकत्र ठेवा परंतु ते एकमेकांना स्पर्श करत नसावे. हात शरीराच्या जवळ ठेवा. तळहात आकाशाकडे उघड़े ठेवा.
- डोळे हळूवारपणे बंद करा. चेहऱ्याचे स्नायू शिथिल करा. नाकावाटे हळूवार दीर्घ श्वास घ्या.
- पायापासून सुरुवात करून डोक्यापर्यंत आपले लक्ष आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाकडे घेऊन जा. जाणीवपूर्वक प्रत्येक अवयव ढिला सोडत पुढे जा.
- शवासनामध्ये ३ ते ५ मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त राहा. जर शवासन करताना झोप येत असेल तर खोल आणि जलद श्वास घ्या.
कालावधी / पुनरावृत्ती:
आपल्या योगासन सरावाची सुरुवात किमान ३ ते ५ मिनिटांच्या शवासनाने करावी अशी आम्ही शिफारस करतो. योगासनांचा सराव करत असताना तुमचे शरीर आणि मन यांना आराम देण्यासाठी आणि ताजेतवाने करण्यासाठी थोड्या अवधीच्या अंतराने हे आसन करत जा. सरावाच्या शेवटी ३ ते ५ मिनिटे शवासन करत जा.
शवासनाचे फायदे
- या आसनामुळे खोल, ध्यानाची स्थिती प्राप्त होते. त्यामुळे शरीरातील पेशी आणि ऊती यांची हानी भरून निघते आणि तणाव मुक्त होतो. तसेच योगासनामुळे झालेला फायदा शरीरात खोल उतरायला वेळ मिळतो.
- शवासनामुळे आपल्या शरीराचे पुनर्नवीकरण होते. योग सराव समाप्त करण्याचा, विशेषत: जलद योग सराव समाप्त करण्याचा हा योग्य मार्ग आहे.
- रक्तदाब, चिंतातूरपणा आणि निद्रानाश कमी करण्यात मदत करते.
- शरीराला शांत करण्याचा हा अतिशय उत्तम मार्ग आहे. शवासन शरीरातील वात दोष कमी करते.
अपवाद
या आसनास कोणताही अपवाद नाही. (जर आपणास डॉक्टरनी पाठीवर झोपण्यास बंदी केली असेल तर हे आसन करू नये)
सर्व योगासने आधीचे योगासन : विष्णूआसन नंतरचे योगासन : नौकासनशवासनाबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न
शवासनाचे फायदे: पेशी आणि ऊतींची दुरुस्ती करते.शरीरातील तणाव मुक्त करते. शवासन करताना योगासनामुळे निर्माण झालेली ऊर्जा शरीरात खोलवर जाते. रक्तदाब, चिंतातुरपणा, निद्रानाश कमी करते. वातदोष कमी करते.