जानू शीर्षासन कसे करावे
- पाठीचा कणा ताठ ठेवून पाय समोर सरळ ठेवा.
- डावा गुडघा वाकवा आणि डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा, डावा गुडघा जमिनीवर ठेवा.
- श्वास घेताना, दोन्ही हात डोक्याच्या वर न्या आणि वर सरळ करा आणि कंबरेपासून उजवीकडे थोडेसे वळवा.
- श्वास सोडताना, पाठीचा कणा सरळ ठेवत नितंबाच्या सांध्यापासून पुढे वाकून, आपली हनुवटी पायाच्या बोटांकडे वळवा.
- आपणास शक्य असेल तर पायाची बोटे धरून ठेवा आणि आपले कोपर जमिनीकडे न्या, पायाची बोटे ओढत असताना पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
- या स्थितीत स्थिर राहून दीर्घ श्वसन सुरु ठेवा.
- श्वास घेत वर या आणि श्वास सोडत हात बाजूला करा.
- हीच कृती दुसऱ्या बाजूने करावे.
जानू शीर्षासन व्हिडीओ
जानू शीर्षासनचे फायदे
पाठीच्या खालच्या भागाला ताण मिळतो
ओटीपोटाच्या अवयवांना मालिश होते आणि खांदे सुडौल होतात.