मत्स्य – मासा; आसन – शरीराची विशिष्ठ स्थिति
या आसनाचा उच्चार मत् – स् – या – सा – न असा होतो. मत्स्य या संस्कृत शब्दाचा अर्थ मासा आहे, त्यामुळे ही माशाची मुद्रा आहे. मत्स्य (डावीकडे चित्रित) हा एक दैवी प्राणी आहे, जो हिंदू पौराणिक कथांमध्ये आढळतो, ज्याने मानवजातीला सार्वत्रिक प्रलयापासून वाचवले.
मत्स्यासन कसे करावे

१. शवासनाप्रमाणे पाठीवर सपाट झोपावे.
२. नितंब जमिनीवर ठेवून, श्वास घेऊन डोके, खांदे, पाठ आणि हाताचा वरचा भाग जमिनीपासून वर करा आणि पाठीला कमानदार आकार द्या आणि छाती वर करा. डोके मागे टेकवा आणि डोक्याचा वरचा भाग जमिनीवर सपाट ठेवा.
३. कोपर जमिनीपासून वर उचला, आपले हात छातीच्या खालीच्या बाजूला आणा आणि बोटांची टोके आकाशाच्या दिशेने ठेवत तळहातावर जोडा (अंजली-मुद्रा किंवा नमस्कार याप्रमाणे हातांना जोडलेले ठेवा). श्वास घेण्याच्या कालावधीपर्यंत धरून ठेवा किंवा नाकपुड्यांमधून हळूवारपणे श्वास घ्या जेणेकरून आसनात जास्त काळ राहता येईल.
४.पुन्हा शवासनात परत या.
कालावधी/पुनरावृत्ती: हे अवघड आसन नसल्यामुळे, दोन ते चार मिनिटे धरून श्वास घेण्याचा सल्ला दिला जातो. जर आपणास श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, श्वास घेण्याच्या कालावधीपुरतेच आसन करा. असे दोन किंवा तीन वेळा पुन्हा करा.
मत्स्यासनाचे फायदे
- छाती आणि मान ताणले जाते.
- मान आणि खांद्यावर तणाव कमी करण्यास मदत करते.
- दीर्घ श्वास घेण्यास उत्तेजन मिळत असल्यामुळे श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो.
- पॅराथायरॉइड, पिट्यूटरी आणि पाइनल ग्रंथींची कार्यक्षमता सुधारते.
कोणी करू नये
जर आपणास उच्च किंवा कमी रक्तदाब असेल तर हे आसन करणे टाळावे. अर्धशिशी आणि निद्रानाशाच्या रुग्णांनी देखील मत्स्यासन वर्ज्य केले पाहिजे. ज्यांच्या पाठीला किंवा मानेला गंभीर दुखापत झाली आहे त्यांनी या आसनाचा सराव अजिबात न करण्याचा सल्ला आहे.
सर्व योगासने
मागील योगासन: सेतू बंधासन
पुढील योगासन: पवनमुक्तासन