सेतुबंधासन म्हणजे काय

सेतु – पूल

बंध – बांधणे

सेतुबंधासन करताना शरीराचा आकार पूलासारखा बनतो , म्हणून हे नांव दिले आहे.

Setu Bandhasana - inline

सेतुबंधासन कसे करावे

  • आपल्या पाठीवर झोपा.
  • आपले दोन्ही पाय गुडघ्यातून वळवा. दोन्ही पायांमध्ये कंबरेइतके अंतर असू द्या. गुडघे आणि घोटे एका सरळ रेषेत ठेवत पाय कमरेपासून १० – १२ इंच अंतरावर ठेवा.
  • आपले हात शरीराच्या बाजूला ठेवा. तळहात खालच्या दिशेने ठेवा.
  • श्वास घेत हळूवारपणे आपल्या पाठीचा खालचा भाग, मधला भाग आणि वरचा भाग अनुक्रमे वर उचला. सावकाश आपले खांदे आतल्या बाजूला घ्या. आपली हनुवटी खाली न करता, छाती हनुवटीला टेकवा. आणि आपले वजन खांदे, हात आणि पायांवर सांभाळा. शरीराचा खालचा भाग यावेळी स्थिर ठेवा. दोन्ही मांड्या परस्परांना आणि जमिनीला समांतर असतील.
  • आपली बोटे एकत्र गुंतवून, हाताच्या आधाराने शरीर आणखी वर उचलू शकता. किंवा आपल्या पाठीला तळहाताने आधार देऊ शकता.
  • सहजपणे श्वास घेत राहा.
  • एक ते दोन मिनिट आसनामध्ये स्थिर राहा. आणि श्वास सोडत आसनामधून बाहेर या.

दैनंदिन श्री श्री योग

श्री श्री योग शाळेमधील अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सोयीच्या वेळेनुसार दररोज योगाभ्यास शिका.

अधिक माहिती

सेतुबंधासन व्हिडिओ

सेतुबंधासनाचे फायदे

  • पाठीचे स्नायू मजबूत बनतात.
  • पाठीच्या स्नायूंना लगेच आराम मिळतो.
  • छाती, मान आणि पाठीच्या कण्याला चांगला ताण मिळतो.
  • मेंदू शांत होतो. चिंता, तणाव आणि नैराश्य कमी होते.
  • फुप्फुसे जास्त मोकळी होतात. कंठग्रंथी (Thyroid) चा त्रास कमी होतो.
  • पचन सुधारण्यास मदत होते.
  • मासिक धर्म आणि रजोनिवृत्तीच्या त्रासापासून मुक्ती मिळते.
  • अस्थमा, उच्च रक्तदाब, हाडांचा ठिसूळपणा (Osteoporosis) आणि सायनस (Sinusitis) मध्ये मदतकारक आहे.

सेतुबंधासन कोणी करू नये

  • मान किंवा पाठीला काही इजा झाली असल्यास सेतुबंधासन करू नये.
सर्व योगासने
आधीचे योगासन : नौकासन
पुढील योगासन : मत्स्यासन
art of living store logo white

गुरुदेवांचे कालातीत ज्ञान

पुस्तके, फोटो फ्रेम्स आणि भावपूर्ण ठेवा

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *