पूर्वोत्तनासन म्हणजे काय
या आसनाचा शाब्दिक अर्थ पूर्वेकडे ताणणे असा आहे. तथापि याचा पूर्व दिशेला ताणण्याशी काहीही संबंध नाही. पूर्वोत्तानासन हे विशेषत: “पूर्वेकडील”, पुढील दिशेच्या प्राणाच्या सूक्ष्म शक्तींच्या प्रवाहाचा संदर्भ देते.
पूर्वा = पूर्व + उत्तन = जास्तीत जास्त ताण, आसन = शारीरिक स्थिती
या आसनाचा उच्चार पूर्व-ओत्ताना-सन असा होतो.
पूर्वोत्तानासन कसे करावे
- समोर सरळ पाय पसरून बसा, पाय एकत्र आणि पाठीचा कणा ताठ ठेवा.
- तळवे जमिनीवर कमरेभोवती किंवा खांद्याच्या रेषेत ठेवा, बोटांच्या टोकांची दिशा आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेला ठेवा. हात वाकवू नका.
- मागे झुका आणि आपल्या हातांवर आपल्या शरीराचे वजन पेला.
- श्वास घेत नितंब वर करा, संपूर्ण शरीर सरळ ठेवा.
- आपले गुडघे सरळ ठेवा आणि पाय जमिनीवर पसरलेले असू द्या. पायाची बोटे जमिनीवर ठेवा आणि तळवा जमिनीवर असला पाहिजे. डोके परत जमिनीच्या दिशेने पडू द्या.
- आसन धरा आणि श्वास सुरू ठेवा.
- श्वास सोडत असताना बसलेल्या स्थितीत परत या आणि आराम करा.
- आपल्या बोटांनी विरुद्ध दिशेला निर्देश करून आसनाची पुनरावृत्ती करा.
पूर्वोत्तनासनाचे फायदे
- मनगट, हात, खांदे, पाठ आणि पाठीचा कणा मजबूत करते.
- पाय आणि नितंब यांचे प्रसरण होते.
- श्वसन कार्य सुधारते.
- आतडे आणि ओटीपोटाच्या अवयवांचे प्रसरण होते.
- थायरॉईड ग्रंथींना चालना देते.
पूर्वोत्तनासन कोणी करू नये
शरीराच्या संपूर्ण वजनाचा भार प्रामुख्याने हात आणि मनगट यांच्यावर घ्यायचा असल्याने मनगटाच्या दुखापती असणाऱ्यांनी हे आसन टाळावे. तसेच ज्यांना मानेला कोणतीही दुखापत झाली आहे त्यांनी एकतर हे आसन करणे पूर्णपणे टाळावे किंवा आसनाचा सराव करताना खुर्चीचा आधार घ्यावा.
सर्व योगासने मागील योगासन : पश्चिमोत्तानासन पुढील योगासन: अर्ध मत्स्येंद्रासन