(हे आसन असे उच्चारले जाते: गोमुखा-सन)

गोमुखासन या संस्कृत शब्दाचा अनुवाद: गायीच्या चेहऱ्यासारखे आसन असा होतो (गो – गाय, मुख – चेहरा, आसन – आसन). गोमुखासन हे बसून करावयाचे हे योगासन आहे. ते बसून करावयाच्या विविध आसनांच्या संचासह करता येते. हे हात, दंडाचे स्नायू (ट्रायसेप्स), खांदे आणि छाती ताणण्यास मदत करते. सराव करणाऱ्या व्यक्तीने ताठ बसणे आवश्यक आहे, यामुळे या आसनाची गुणवत्ता वाढते.

वर्णन : दोन्ही बाजूंचे हात गाईच्या कानांचे प्रतिनिधित्व करतात आणि एका पायावर दुसरा पाय ठेवलेले हे गायीच्या चेहऱ्यासारखे दिसतात.

गोमुखासन कसे करावे

  1. योगा मॅटवर बसा. आपली पाठ सरळ आणि पाय समोर सरळ ठेवा. आपले पाय एकत्र ठेवा आणि आपले हाताचे तळवे आपल्या नितंबांच्या पुढे ठेवा.
  2. आपला उजवा पाय वाकवा आणि उजवा तळपाय आपल्या डाव्या नितंबाखाली ठेवा.
  3. आपला डावा गुडघा आपल्या उजव्या गुडघ्यावर ठेवा.
  4. डावा हात डोक्याच्या वर उचला आणि कोपर वाकवा. त्याच बरोबर उजवा हात पाठीमागे आणा आणि दोन्ही हात एकमेकात अडकवा.
  5. खोल उज्जयी श्वास घ्या आणि जोपर्यंत सुखकारक असेल तोपर्यंत हे आसन करा.
  6. आता, श्वास सोडत असताना, आपले हात सोडा.
  7. आपले पाय मोकळे करा आणि दुसऱ्या पायाने हे आसन पुन्हा करा.
  8. आपण एकतर श्वास रोखून धरून ठेवू शकता किंवा नाकपुड्यांमधून हळूवारपणे श्वास घेताना आसन धरून ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. जर श्वास घेणे निवडले असेल तर तीस सेकंद ते एक मिनिटापर्यंत आसन धरा. गोमुखासन प्रत्येक बाजूने दोन ते तीन वेळा करावे.

गोमुखासनाचा व्हिडिओ

नवशिक्यांकरिता टीप

सुरुवातीला आपल डावा हात उजव्या हातापर्यंत आणि उजवा हात डाव्या हातापर्यंत पोहोचू शकणार नाही. या बाबतीत जास्त ताकद लावू नका. सरावाने, दोन्ही हात दुसऱ्या हाताला धरून ठेवण्यास सक्षम होतील.

गोमुखासनाचे फायदे

  1. सायटिका बरा करते
  2. उच्च रक्तदाबात मदत होते
  3. नियमित सरावाने प्रजननाचे अवयव सुडौल होतात आणि त्यांना मालिश होते.
  4. ताठर खांदे बरे करते.
  5. पाठीचा कणा लांबवतो.
  6. खराब अंगस्थिती असलेल्यांसाठी फायदेशीर.
  7. तणाव आणि चिंता कमी करते.
  8. पाठीचे स्नायू मजबूत करते.
  9. मूत्रपिंडांना उत्तेजिन देते.
  10. घोट्याचे, नितंब, मांड्या, खांदे,दंड (ट्रायसेप्स), आतील बगले आणि छातीचे स्नायू यांना मजबूत करते.

हे आसन कोणी करू नये

  1. खांदे दुखणे किंवा दुखापत: जर आपणास तीव्र खांदेदुखी असेल तर गोमुखासन करणे टाळा. खांद्याला जास्त दुखत नसेल तर प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली हे आसन करावे.
  2. शरीराच्या कोणत्याही महत्त्वाच्या अवयवांमध्ये वेदना: आसन करताना शरीराचा कोणताही भाग ताणलेला असताना तीव्र वेदना होत असताना आसन न करण्याचा सल्ला दिला जातो.
  3. पायाच्या मऊ उतींना (सॉफ्ट टिश्यू) दुखापत: पायाच्या मऊ उतींना (सॉफ्ट टिश्यू) दुखापत म्हणजे स्नायू, अस्थिबंध (लिगामेंट्स) आणि स्नायूबंध (टेंडन्स) यांना अपाय होणे. हे सामान्यतः ताण पडल्यामुळे किंवा लचक भरल्यामुळे उद्भवते
  4. स्नायू फाटणे किंवा मांड्यांमध्ये वेदना
  5. मूळव्याधीतून रक्तस्त्राव
  6. मणक्यातील संधिवात (स्पॉन्डिलायटिस)

वरील स्थितींमध्ये गोमुखासन केल्याने प्रकृती आणखी बिघडू शकते. म्हणून या परिस्थितीत आसन करणे टाळणे महत्वाचे आहे.

सर्व योगासने
मागील योगासन : वज्रासन
पुढील योगासन : जनू शिरासन

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *