त्रिकोनासन म्हणजे काय
संस्कृत शब्द “त्रि” म्हणजे तीन आणि “कोन” म्हणजे कोपरा. अशा प्रकारे “तीन कोपरे किंवा तीन कोन मुद्रा” यालाच त्रिकोणी मुद्रा म्हणतात. या आसनाला “उत्थित” त्रिकोणासन” असेही म्हणतात. “उत्थित” म्हणजे ताणलेली किंवा विस्तारलेली अशा प्रकारे ही विस्तारित त्रिकोण स्थिती आहे.
बहुतेक योगासनांपेक्षा वेगळे म्हणजे शरीराचा समतोल राखण्यासाठी त्रिकोणासनामध्ये डोळे उघडे ठेवणे आवश्यक असते.
त्रिकोनासन कसे करावे
- पाय एकत्र जुळवून आणि हात बाजूला ठेवून उभे रहा (ताडासन पहा).
- नंतर खांद्याच्या अंतरापेक्षा थोडे जास्त अंतर ठेवत दोन्ही पायात अंतर घ्या.
- श्वास घ्या आणि तळवे खालच्या दिशेने ठेवत दोन्ही हात वर करत खांद्याच्या बाजूला सरळ जमिनीच्या समांतर ठेवा.
- धड डावीकडे वळवताना हळू हळू श्वास सोडा, कंबर वाकवा आणि उजवा हात खाली डाव्या घोट्यापर्यंत आणा. उजव्या हाताचा तळवा डाव्या घोट्याच्या बाहेरील बाजूने ठेवला जातो. डावा हात वरच्या दिशेने ताणला पाहिजे. दोन्ही पाय आणि हात, गुडघे आणि कोपर न वाकवता सरळ ठेवले जातात.
- डोके वरच्या दिशेने डावीकडे वळवा आणि डाव्या हाताच्या बोटांच्या टोकाकडे पहा. श्वास घ्या आणि हात बाजूला पसरलेल्या स्थितीत परत येत उभे रहा.
- सोडलेल्या श्वासाच्या कालावधीसाठी ही स्थिती धरुन ठेवा. श्वास सोडा आणि ४ ते ६ हे टप्पे विरुद्ध बाजूने पुन्हा करा.

पुनरावृत्ती:
श्वास सोडण्याच्या कालावधीसाठी पुढे वाकलेल्या स्थितीत रहा. दोन किंवा तीन पुनरावृत्ती करा (एका पुनरावृत्तीमध्ये दोन्ही बाजूंनी पुढे वाकायचे असते).
त्रिकोनासन व्हिडिओ
त्रिकोनासनाचे फायदे
त्रिकोणासन हे आपल्या दिनक्रमात सकाळी लवकर करण्यासाठी एक उत्कृष्ट आसन आहे. पुढे वाकणे आणि परत वर येणे यामुळे रक्त प्रवाह उत्तेजित होतो आणि पाठ, खांदे, पाय आणि हात ताणले जातात आणि त्यांना आराम मिळतो तसेच डोक्याकडे जाणारा रक्त प्रवाह वाढतो. मांड्या आणि पायाचे स्नायू तसेच हॅमस्ट्रिंग्स ताणले जातात. मणक्याला थोडा पिळ मिळाल्याने पाठीच्या कण्यामध्ये लवचिकता निर्माण होते आणि पाठीच्या खालच्या भागातल्या त्रासापासून आराम मिळतो.
श्वास रोखून ठेवण्याऐवजी नाकातून हळूवार श्वास घेत आणि सोडत हे आसन दीर्घ वेळ धरून ठेवता येते. आणखी एक फरक म्हणजे त्रिकोणासन वेगाने केल्यास त्याचा थोडा एरोबिक व्यायामासारखा परिणाम होतो.
सरावासाठी सूचना
- आसन करण्यापूर्वी आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला वॉर्म अप व्यायाम नक्की करा.
- पुढे वाकताना ते मंद गतीने आणि हळूवारपणे करा जेणेकरून तोल जाऊ नये.
पूर्वतयारीची आसने
- कटिचक्रासन
- कोनासन
- वृक्षासन
नंतर करावयाचे आसन
त्रिकोनासन कोणी करू नये
जर आपणास मायग्रेन, डायरिया, कमी किंवा उच्च रक्तदाब किंवा मान आणि पाठीच्या दुखापतीचा त्रास असेल तर हे आसन करणे टाळा. ज्यांना उच्च रक्तदाब आहे ते हे आसन करू शकतात परंतु हात वर न करता, कारण यामुळे रक्तदाब आणखी वाढू शकतो.
सर्व योगासने मागील योग मुद्रा : अर्ध चक्रासन पुढील योगासन : वीरभद्रासनत्रिकोनासन बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
त्रिकोनासनाचे तोटे: जर आपणास मायग्रेन, अतिसार, कमी किंवा उच्च रक्तदाब किंवा मान आणि पाठीला दुखापत असेल तर हे आसन करणे टाळा. ज्यांना उच्च रक्तदाब आहे ते हे आसन हात वर न करता करू शकतात नाहीतर यामुळे रक्तदाब आणखी वाढू शकतो.
त्रिकोनासनाचे विरोधाभास: जर आपणास मायग्रेन, अतिसार, कमी किंवा उच्च रक्तदाब किंवा मान आणि पाठीला दुखापत असेल तर हे आसन करणे टाळा. ज्यांना उच्च रक्तदाब आहे ते हे आसन हात वर न करता करू शकतात नाहीतर यामुळे रक्तदाब आणखी वाढू शकतो..