वीरभद्रासन म्हणजे काय

केवळ हे एकच आसन केल्यामुळे हात, खांदे, मांड्या आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. या आसनाचे नाव वीरभद्र, एक बलाढ्य योद्धा, भगवान शिवाचा अवतार यांच्या नावावर आहे. योद्धा वीरभद्राची कथा उपनिषदातील सर्व कथांप्रमाणेच, आपल्या जीवनात मूल्य वाढवणारी नैतिकता आहे.
वीर – जोमदार, योद्धा, शूर; भद्रा – चांगला, शुभ; आसन – योगासन
आसनाचा उच्चार वी-र-भ-द्र-आसन असा होतो.

वीरभद्रासन कसे करावे

वीरभद्रासन हे सर्वात सुंदर योगासनांपैकी एक आहे आणि ते आपल्या योगाभ्यासात सौंदर्य आणि लालित्य वाढवते.

  • कमीत कमी ३-४ फूट अंतर ठेवून पाय रुंद करून सरळ उभे रहा.
  • तुमचा उजवा पाय ९० अंशांनी व डावा पाय सुमारे १५ अंशांनी वळवा.
  • खात्री करा : उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मध्यभागी सरळ रेषेत आहे नां?
  • दोन्ही हात दोन्ही बाजूला खांद्याच्या उंचीपर्यंत उचला आणि हाताचे तळवे वरच्या दिशेने करा.
  • खात्री करा : आपले हात जमिनीला समांतर आहेत नां?
  • श्वास सोडत, उजवा गुडघा वाकवा.
  • खात्री करा : आपला उजवा गुडघा आणि उजवा घोटा सरळ रेषेत आहे नां? आपला गुडघा घोट्याच्या बाहेर जाणार नाही याची खात्री करा.
  • आपले डोके वळवा आणि आपल्या उजवीकडे पहा.
  • आसनाच्या या स्थितीत स्थिरावल्यावर आपले हात पुढे पसरवा.
  • आपला कटिभाग खाली ढकलण्याचा सौम्य प्रयत्न करा. योद्ध्याच्या निश्चयाप्रमाणे हे आसन करा. आनंदी हसऱ्या योद्ध्याप्रमाणे हसा. खाली जाताना श्वास घेत राहा.
  • श्वास आत घ्या, वर या.
  • श्वास सोडताना, आपले हात आपल्या बाजूला खाली आणा.
  • डाव्या बाजूसाठी योगासनाची पुनरावृत्ती करा (तुमचा डावा पाय ९० अंशांनी वळा आणि उजवा पाय सुमारे १५ अंशांनी वळवा).

वीरभद्रासनाचे फायदे

  • हात, पाय आणि पाठीचा खालचा भाग मजबूत आणि सुडौल करते.
  • शरीरातील संतुलन सुधारते, जोम वाढवण्यास मदत करते.
  • बैठी किंवा टेबलावर बसून करण्याची नोकऱ्या असलेल्यांसाठी फायदेशीर.
  • फ्रोझन शोल्डर्समध्ये अत्यंत फायदेशीर.
  • एकदम कमी वेळात खांद्यावरील ताण अतिशय प्रभावीपणे मोकळा करते.
  • मांगल्य, धैर्य, कृपा आणि शांती आणते.

वीरभद्रासन कोणी करू नये

  • आपणास मणक्याचे विकार नुकतेच झाले असतील किंवा एखाद्या दीर्घकालीन आजारातून बरे झाले असाल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वीरभद्रासनाचा सराव करा.
  • उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे आसन टाळावे.
  • जर गर्भवती महिलांनी नियमितपणे योगाभ्यास केला असेल, तर त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत वीरभद्रासनाचा विशेषत: फायदा होतो. भिंतीजवळ उभे असताना वीरभद्रासनाचा सराव करा जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही स्वतःला आधार देऊ शकता. तथापि, हे योगासन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • आपणास कोणताही त्रास होत असल्यास किंवा नुकतेच अतिसाराचा त्रास झाला असल्यास हे आसन करणे टाळा.
  • जर आपणास गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर गुडघ्याला काही आधार देऊन हे योगासन करा.
सर्व योगासने
मागील योगासन : त्रिकोनासन
पुढील योगासन : प्रसारित पदहस्तासन

वीरभद्रासनावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वीरभद्रासनाचे फायदे: हे खांद्यावरील ताण कमी कालावधीत अतिशय प्रभावीपणे सोडवते. हात, पाय आणि पाठीचा खालच्या भाग मजबूत आणि सुडौल करते. हे शरीराचे संतुलन सुधारते आणि जोम वाढवण्यास मदत करते. बैठे किंवा सतत टेबलावर बसून नोकरी असलेल्यांसाठी हे फायदेशीर आहे. फ्रोझन शोल्डर्सबाबतीत हे फायदेशीर आहे. इतर कमीत कमीत खांद्यावरील ताण अत्यंत प्रभावीपणे मोकळा करते.
वीरभद्रासनाच्या व्हिडिओमध्ये दर्शविलेल्या चरणांचे अनुसरण करा. योद्ध्याच्या निश्चयाप्रमाणे हे आसन करा. आपला उजवा गुडघा आणि घोट्याची सरळ रेषा आहे नां, ते तपासा. आपला गुडघा घोट्याच्या बाहेर जाणार नाही याची खात्री करा.
वीरभद्रासनाचे ५ प्रकार आहेत: वीरभद्रासन-१. वीरभद्रासन-२. वीरभद्रास -३. विपरित वीरभद्रासन । बध्द वीरभद्रासन.
दररोज दोन मिनिटे शरीराची खुली स्थिती ठेवल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. दररोज फक्त दोन मिनिटे वीरभद्रासन करून योद्ध्याचा आत्मविश्वास मिळवा.
जर आपण या चुका करत असाल तर वीरभद्रासन करणे अवघड आहे: खूप छोटा पवित्रा – जर आपली पुढची मांडी जमिनीबरोबर समांतर नसेल तर, आपण आपला पवित्रा रुंद करू शकता. वीरभद्रासन २ मधील चुकीची प्रमाणबद्धता म्हणजे मागच्या पायाचा गुडघा मुरगळला जाऊन बंदिस्त झाला तर नितंब पुढे ढासळते. आपले दोन्ही पाय गुंतवून ठेवले नाही – आपण पुढच्या पायाशी न्याय करतो पण आपल्या पायाच्या मागील भागाचा मागोवा घ्यायला विसरतो. आपल्या ओटीपोटापासून खाली मागच्या टाचेपर्यंत घट्टपणे स्थिर राहा. आपला पुढचा गुडघा ९० अंशांच्या दिशेने वाकवताना आपल्या मागच्या टाचेला जोरात दाबा. नितंबाला चौरस करणे – आपले नितंब चौरस करणे टाळा कारण आपल्या सांगाड्याची रचना अशी आहे की तो मांडीपर्यंत पूर्ण ९० अंश फिरू शकत नाही.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *