दहा गावांतून ७०० पेक्षा जास्त ग्रामस्थ जाणार विश्व सांस्कृतिक महोत्सवाला !!

     दि.११, १२ आणि १३ मार्च २०१६ ला दिल्ली येथे श्री श्री रविशंकरजी संस्थापित ‘आर्ट ऑफ लिव्हींग’च्या  ‘विश्व सांस्कृतिक महोत्सव’ मध्ये १५५ देशातील ३३००० सांस्कृतिक कलाकार आपले कलाविष्कार सादर करतील. जगभरातून अनेक नेते, महात्मे आणि  ३५ लाख पेक्षा जास्त प्रेक्षक या महोत्सवाचे साक्षीदार होतील. या जागतिक वारीसाठी छोट्या छोट्या गाव-खेड्यातून हजारो ग्रामस्थ दिल्लीला निघाले आहेत. निव्वळ १० छोट्या गावांमधून ७०० च्या वर लोक दिल्लीला निघाले आहेत. उत्सुकतेपोटी आम्ही फक्त १० गावांबद्दल माहिती घेतली. पहायला मिळाला चार जिल्ह्यातील नऊ-दहा ग्रामीण, दुर्गम,आदिवासी गावामधील आर्ट ऑफ लिव्हींगचा

‘हेल्दी इंडिया कार्यक्रम’ हा प्रकल्प. ज्याचे घोष वाक्य आहे, ‘एक पाऊल स्वच्छतेकडे.’

१० गावांमध्ये ३ टीम काम  करत आहेत. जालना जिल्ह्यात  ४ गावांत पुरुषोत्तम वायाळ यांच्या नेतृत्वाखाली, अमरावती व वाशीम मध्ये २ गावांत वेंकटेश यांच्या नेतृत्वाखाली आणि अहमदनगर जिल्ह्यात ४ गावांत सोमनाथ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प होत आहेत. या सर्वांनी केलेले कार्य खरोखरीच प्रेरणा दायक आहे. निव्वळ तीन महिन्यात या गावांमध्ये ६६२ पक्की शौचालये यांनी बांधून दिली आहेत.

हेल्दी इंडिया कार्यक्रम

    या प्रकल्पाबद्दल बोलताना सौ. संगीता माधव उईके, सरपंच, धानोरा, जिल्हा-अमरावती  म्हणतात,

सर्वत्र ग्रामीण भागात एक चित्र समाईक आहे की लोक उघड्यावर शौचाला बसलेले दिसतात. महिलांची तर भयंकर कुचंबणा होते.  या प्रकल्पाबद्दल ऐकले आणि आर्ट ऑफ लिविंग च्या स्वयंसेवकांसोबत कामाला लागले. गाव-वाड्यांवर गेले. लोकांचेप्रबोधन केले, आज अभिमानाने सांगू शकते की या भव्य प्रकल्पामध्ये माझा देखील खारीचा वाटा आहे. याचे श्रेय मी देते  गुरुजींना आणि वेंकटेश सरांना"

संदीप बळीराम जाधव, सरपंच, यदलापुर, जि. जालना म्हणतात

" ९०० लोकसंख्येचे आमचे गाव. एकूण ६९ उत्तम शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गावातील युवा वर्गाला श्रमाचे महत्व समजले.आर्ट ऑफ लिविंग, गुरुजी, वायाळ सर आणि परमेश्वर सरांचा मी आभारी आहे . गावातील ८० % लोक दररोज क्रिया करतात. गाव तनावमुक्त झाला आहें आता सर्व मिळून व्यसनमुक्त करू."

     या गावांमध्ये ६६२ पक्की शौचालये, पाण्याची टाकी, लाईट, व्यवस्थित शोष खड्ड्यासह उभारलेली आहे. काही ठिकाणी तर गांडूळ खताच्या प्रकल्पांसह शौचालये उभारली आहेत त्यामुळे सेंद्रिय खत निर्मिती पण होत आहे.

प्रशिक्षकांना काही गावांची निवड करून प्रशिक्षणासाठी बेंगलोर आश्रमामध्ये बोलावले. हा प्रकल्प इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन वॅल्युज् (IAHV), या संस्थेमार्फत घेतला होता. IAHV ही संस्था आर्ट ऑफ लिव्हींगशी संलग्न संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक प्रकल्प राबवते. आश्रमच्या ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’च्या समन्वयिका रुक्मिणी प्रभाकरन आणि प्रकल्प समन्वयक श्री पंकज यादव यांच्यांसह गुरुजींनी या प्रकल्पाची निकड आणि कार्यप्रणालीबाबत आठ दिवस प्रशिक्षण दिले.

आता येथे थांबणे नाही.

१० गावातील २५००० पेक्षाजास्त गावकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ झाला आहे. आता गुरुजींचे प्रकल्प उदा. जल जागृती अभियान, गांडूळ खत, बी-बियाणे, बायोगॅस-गोबरगॅस  इत्यादी अनेक प्रकल्पांच्या माध्यमाने गावे स्वयंपूर्ण करणे हा संकल्प सर्वांनीच घेतला आहे .

या काही लाभार्थींच्या बोलक्या प्रतिक्रिया :

श्री नाथा कदम, उपसरपंच, जायगाव, जिल्हा-अहमदनगर   :

     “ शौचालये बनवण्यासाठी आम्ही ग्रामस्थ एकत्र आल्यावर गावातील भांडण-तंटे संपले. सारा गाव एकजूट झाला. एकीचे सामर्थ्य कळाले. गावातील राजकारण संपले-समाजकारण सुरु झाले. प्रगतीचा विचार सुचला. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने स्वावलंबी आणि आदर्श गांव बनवायचे आहे.”

श्री. सचिन जंगम, जायगाव, जिल्हा-अहमदनगर :

     “सुरवातीला या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या व्यक्तीदेखील यामध्ये हिरीरीने सहभागी झाल्या. दैनंदीन साधना आणि सत्संग मुळे गावातील व्यसनाधीनता कमी झाली, आळशी लोक क्रियाशील झाले, आर्थिक प्रगती दिसू लागली, चोऱ्या- माऱ्या कमी झाल्या. एक उत्साहाचे वातावरण गावांमध्ये साकारले आहे. गुरुजींच्या दर्शनासाठी आम्ही शेकडो ग्रामस्थ दिल्लीला जागतिक वारीसाठी निघालो आहोत."

प्रशिक्षकांचे मनोगत

वेंकटेश मंगलाचरण -  “नोव्हेंबर २०१५ मध्ये गुरुजींनी आशिर्वाद दिला – ‘प्रामाणिकपणे काम करा, सर्वकाही होईल.’ या आशीर्वादाने प्रेरित होऊन मी येथे सेवा सुरु केली. मला ग्रामस्थांसह दिपक तपासे, परमेश्वर राजबिंडे यांचे अमुल्य सहकार्य लाभले. नवचेतना शिबीर, नुक्कड नाटक, गाठभेटीमुळे ग्रामस्थांची मानसिकता बदलली आणि हे शक्य झाले. १ डिसेंबर २०१५ ते २९ फेब्रुवारी २०१६ या तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प गुरुजींच्या आशीर्वादामुळे पूर्ण झाला”

पुरुषोत्तम वायाळ :  "ग्रामीण भागामध्ये सेवा करत असताना शौचालया अभावी महीलांचे हाल पहावत नव्हते. काही महिला म्हणाल्या - "तुमच्या गुरुजींनीआम्हाला या जीवनातील सर्वात सुंदर भेट दिली आहे. आमचा आत्मविश्वास परत मिळवून दिला आहे" हे ऐकले की जाणीव होते गुरुजींच्या सामाजिक समस्यांच्या जाणीवेची आणि तळमळीची. आणि आम्ही आपसूक नतमस्तक होतो."

सोमनाथ सोनावणे -  “ गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन वॅल्युज् (IAHV) बरोबर ‘केंट’ आणि ‘गुड इयर’ या दोन संस्थांच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहिला. यामध्ये माझ्या खांद्याला खांदा लाऊन मंगेश खेडकर, यशदा इत्यादी चमूने हे भव्य कार्य पूर्णत्वास नेले. चार जिल्ह्यातील दहा गावांमध्ये चाललेल्या या प्रकाल्पाबाबतीत ग्रामस्थांची मानसिकता, हेवे दावे, अश्या अनेक आव्हानावर मात करत हे यश साधले. आता संपुर्ण गावांचा कायापालट करायची तयारी आम्ही करत आहोत “

परमेश्वर राजबिंदे : "गुडईयर कंपनीने हा  प्रकल्प मार्च २०१६ पूर्वी पूर्ण करणेची मुदत दिली होती. आपण तो एक महिना आधीच पूर्ण केला आहे . आपण निर्माण केलेल्या शौचालयांची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी युवकांना वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

 या सर्वांचे अनुभव नोंद करताना जाणवली ती कृतज्ञता, आणखी काही चांगले करण्याचा उत्साह आणि खरोखरीच जाणवते ग्रामीण भारत बदलत चालला आहे.

स्वयंसेवक आणि गावे

जिल्हा

गावे       उभारलेली  शौचालये

रूरल मॅनेजरअसिस्टंट रूरल मॅनेजर
जालना

यद्लापूर              ६९

नांद्रा                    ६२

खडकी                 ४८

खांडवेवाडी           ५५

सिद्ध मरळ

भगवान मुजमुले

प्रकाश काळे

गजानन वायाळ

परमेश्वर मरळ

कृष्णा काळदाते

अर्जुन काळे

प्रल्हाद शिंदे

वाशिमहिवरा-रोहिला       ७५अमोल कदमनरेश वळवी
अमरावतीधानोरा                 ३२   अशोक नानवटकरपवनकुमार शर्मा
अहमदनगर

त्र्यंबकपूर             १००

शिरदगाव             ८४

जायगाव              ७७

पिंपळगाव            ६०

डॉ. संदीप कोळसे

मिलिंद नागवाडे

सुभाष कदम

अमर कळमकर

मिलिंद शिंदे

विनेश वायव्हासे

अमोल टिपरे

गणेश खेडकर

 

प्रोजेक्ट इनचार्जडॉक्युमेंटेशन हेड

परमेश्वर राजबिंडे

प्रदीप बांदलकर