दसऱ्या दिवशी ‘स्वच्छता अभियान’ (Dussehra cleaning drive in Marathi)

दिब्रुगढ, आसाम : ३ सप्टेंबर रोजी देशभर दसरा साजरा होत होता. ममोनी दत्ता, युवाचार्याने मात्र दसरा साजरा करण्याचा एक आदर्श मार्ग निवडला. ग्रामस्थ आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवकांद्वारे स्वच्छता अभियान करण्यात त्याने पुढाकार घेतला. बऱ्याच ग्रामस्थांनी पूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबीर केलेले असल्याने त्यांनी या अभियानामध्ये हिरीरीने भाग घेतला.

जवळ जवळ शंभर लोकांनी यात सहभाग घेऊन सुमारे तीन तास कुरेली गावाची स्वच्छता केली. या अभियानाचे समन्वयक सरपंच भूपेन देखा म्हणाले, “या अभियानामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता आणि सामुहीक कार्य करण्याचे संस्कार झाले.ज्यामुळे सुसंवाद निर्माण होणेस मदत होईल.”