महाराष्ट्रातील मद्यपी बनले समाजसुधारक (Alcoholics turn into social reformers in Maharashtra)

महाराष्ट्रातील सात हजार पेक्षा जास्त मद्यपींनी त्यांचे व्यसन सोडले.
प्रेरणादायी मार्गदर्शन : महाराष्ट्रातील अकोले येथील शाळकरी मुले आणि गावकऱ्यांमध्ये गौतम बिडवे यांनी जागृती निर्माण केली.
संजीवनी वरकडे : ०९८२२१८४७९१

अकोला, महाराष्ट्र : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक गौतम बिडवे (९८९००१२००९) यांनी आपली प्रेरणादायी भाषा आणि नैसर्गिक वनौषधींमुळे ७००० पेक्षा जास्त व्यक्तींचे आयुष्य बदलून टाकले आहे. जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी गांव ऐंशी टक्के व्यसनमुक्त झाले आहे. गौतमजींच्या पाच वर्षांच्या या सेवेबद्दल धन्यवाद.

गौतम यांनी जाणले की व्यसन ही सर्व जनजाती साठी मोठी चटक आहे, खास करून सणासुगीच्या दिवसात. सर्वजण कष्टाने कमविलेले पैसे व्यसनात घालवून दयनीय जीवन जगतात. आपण याच जनजातीचे एक सदस्य आहोत हे जाणून त्यांनी ह्या व्यसनांचे उच्चाटन करण्यासाठी सन २००४ मध्ये युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीर (YLTP) साठी आपले नांव नोंदवले. त्यांना समाजात बदल आणण्यासाठी स्फूर्ती मिळाली आणि पुढे जाऊन त्यांनी हाच पेशा अवलंबला.

गौतमना आजोबांकडून वनौषधींबाबत घेतलेल्या ज्ञानाचा त्याला आर्ट ऑफ लिव्हिंगची मोफत शिबीरे शिकवताना आणि कृतीत आणताना लाभ झाला. लवकरच ते मद्य विकार आणि व्यसन मुक्ती बाबत मार्गदर्शन करण्यात प्रवीण बनले. त्यांनी याबाबतीतील व्यावसायिक प्राविण्य, पंचकर्म उपचार पद्धती, नाडी परीक्षा यांचे ज्ञान घेऊन संबंधित आजार मोफतपणे बरे केले. जरी त्यांना आर्थिक अडचणी आणि कुटुंबातून विरोध झाला असला तरी नाउमेद न होता त्यांनी आपले सेवा कार्य सुरु ठेवले.

२०१० साली एका सुताराने त्यांना यामधून काहीही मिळकत होणार नाही असे सांगून नाउमेद केले असले तरी त्यांनी व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले. सुरवातीला कोणीही फिरकले नाही. मात्र आठवड्याभरात ते केंद्र प्रसिद्ध झाले. गेल्या चार वर्षात ७००० पेक्षा जास्त व्यक्तींनी याचा लाभ घेतल्याने याचा परिणाम खूपच चांगला आला आहे.

दर सोमवारी, देशभरातून व्यसनी व्यक्ती या केंद्रात येतात आणि स्वतःचे अनुभव दोनेक तास सांगतात. खासकरून मुंबई,पुणे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि राजस्थान मधून येतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक गौतम रुग्णांना मार्गदर्शक सल्ले देतात. रुग्णांशी त्यांचे वैयक्तिक संबंध बनवतात. त्यांना वाढदिवस आणि महत्वाच्या सणा-वारांना शुभेच्छा देतात. त्यांचेच काही रुग्ण आता त्यांचे स्वयंसेवक बनले आहेत.

गौतमचे पहिले रुग्ण एक गरीब, बेघर व्यक्ती होती, जो पुढे जाऊन त्यांच्या ग्रामपंचायतीचा सरपंच बनला. व्यसन मुक्त झाल्यावर तो एका आईसक्रिम कारखान्याचा मालक बनला आहे. सायकल रिक्षा खेचणारा आणखी एक रुग्ण, व्यसनमुक्त होऊन आता त्याच्या स्वतःच्या सहा रिक्षा घाऊक भाजी मंडईत चालतात. गौतमचा उद्देशच आहे की, जास्तीत जास्त व्यसनी व्यक्तींपर्यंत पोहोचून, त्यांना बदलण्यासाठी मदत करणे. या सेवेमध्येच त्यांना अत्यंत समाधान मिळते.

तांदळवाडीचा निवासी, योगेश्वर कोळी, जो दहा वर्षे मद्यपी होता. तो म्हणतो, “ मी समाजामध्ये आदर गमाऊन बसलो होतो आणि भयंकर आर्थिक अडचणीत होतो. मी तीस लोकांच्या शिबिरात सहभागी झालो होतो. आता आम्ही सर्वजण निरोगी आयुष्य जगतोय. गौतम आमच्या आयुष्यात देवदुताप्रमाणे आले आणि आमचे आयुष्य वाचवले, नाहीतर आम्ही आमचे आयुष्य दारूमध्ये गमावले होते.”

वाकी खेड्यातील रुग्ण, धीरेंद्र सगभोर, शेतकरी म्हणतो, “अकरा वर्षे मी व्यसनी होतो. माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असलो तरी माझे त्यांच्याशी संबंध खूपच बिघडले होते. पाच वर्षांपूर्वी मी गौतमना भेटलो. त्यांनी मला या व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी क्रियाशील सामाजिक कार्यकर्ता बनलो आणि आता मी माझ्या गावचा सरपंच आहे. मी दर आठवड्याला गौतमना भेटतो आणि गरजू व्यक्तींना मदत करतो. बऱ्याच व्यक्तींना तुमच्या  सानिध्यात आणून त्यांना व्यसनाच्या विळख्यातून मुक्त केले आहे.”