Dhanurasana in Marathi | धनुरासन

शरीराला धनुष्याचा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला धनुरासन नाव प्राप्त झाले आहे. हे आसन  पद्म साधना मधील एक आसन आहे.

धनुरासन कसे करावे? | How to do Dhanurasana

  • पायात थोडे अंतर ठेऊन पोटावर झोपा. हात शरीरालगत असू द्या.
  • गुडघ्यातून पाय घडी करून हाताने घोटे पकडा.
  • श्वास घेत जमिनीपासून छाती वर उचला आणि पाय वर आणि मागे ढकला.
  • चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत सरळ पुढे पहा. शरीरातील ताण वाढेल तसे हास्य देखील वाढू द्या.
  • श्वासावर लक्ष ठेऊन अंतिम स्थितीमध्ये स्थिर रहा. तुमचे शरीर धनुष्याप्रमाणे ताठ बनले आहे.
  • या स्थितीमध्ये विश्राम करत खोल दीर्घ श्वास घेत रहा. परंतु खूप ताण देऊ नका.
  • पंधरा-वीस सेकंदानंतर श्वास सोडत पाय आणि छाती जमिनीवर आणा. घोटे सोडून विश्राम करा.

धनुरासनाचे ८ लाभ | 8 benefits of Dhanurasana

  • पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट होतात.
  • जननेंद्रियांना संजीवनी मिळते.
  • छाती, गळा आणि खांदे मोकळे होतात.
  • पाय आणि हातांचे स्नायू बळकट होतात.
  • पाठीची लवचिकता वाढते.
  • तणाव आणि आळस निघून जाण्यास उत्तम.
  • मासिक पाळीमधील अस्वस्थता आणि बद्धकोष्ठता दूर होते.
  • मूत्र रोगांवर उपयोगी.

धनुरासनाबाबत खबरदारी |Contraindications of Dhanurasana

  • उच्च /कमी रक्त दाब असणाऱ्यांनी धनुरासनाचा सराव करू नये. हर्निया, मानेचे विकार, पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे, डोकेदुखी, अर्धशिशी, पोटाची शस्त्रक्रिया झालेल्यांनी धनुरासन करू नये.
  • स्त्रियांनी गर्भारपणामध्ये हे आसन करू नये.

<< कोब्रा पोझ                                                                               Mill Churning Pose >>

योग पवित्रा

योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे लाभ प्राप्त होत असले तरी ते औषधोपचाराला पर्याय ठरू शकत नाही. तज्ञ श्री श्री योगा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. काही उपचार सुरु असतील तर डॉक्टरांच्या आणि श्री श्री योग प्रशिक्षकाच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा.जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मधून श्री श्री योगा शिबिराचा तपशील मिळवा. शिबिरांची माहिती आणि आपले अनुभव कळवण्यासाठी info@srisriyoga.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.