या आसनाचा उच्चार “श-ल-भा-सा-न” असा होतो.
शलभ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘टोळ’ किंवा ‘नाकतोडा’ असा होतो.

या आसनाचा एक प्रकार आहे ज्याला ‘विपरित-शलभासन’ म्हणतात. संस्कृत शब्द “विपरित” म्हणजे “उलट”. हा प्रगत प्रकार आहे ज्याचा या लेखात समाविष्ट केलेला नाही.
शलभासन कसे करावे
- डोके एका बाजूला वळवून पोटावर झोपा आणि हात शरीराच्या बाजूला ठेवा आणि तळवे वरच्या दिशेने ठेवा.
- डोके वळवा आणि आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. आपले हात आपल्या मांड्याखाली सरकवा, तळवे आपल्या मांडीच्या वरच्या बाजूस हळूवारपणे दाबून घ्या.
- हळू हळू श्वास घ्या आणि नंतर डोके, छाती आणि पाय जमिनीवरून शक्य तितक्या उंच करा. आपले डोके शक्य तितके मागे न्या. आपले पाय, गुडघे आणि मांड्या एकत्र दाबून ठेवा.
- डोक्याच्या वरच्या भागापासून सुरुवात करून आणि पायांच्या तळव्यापर्यंत आपले लक्ष आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाकडे घेऊन जा, पुढील भागावर जाण्यापूर्वी आधीच्या भागाला जाणीवपूर्वक शिथिल करा.
- श्वास रोखून धरून या आसनात रहा. आपल्या मांड्यांवर हात वरच्या दिशेने दाबून आपल्या पायांना आधार देऊ शकता.
- जोपर्यंत आपण घेतलेला श्वास रोखू शकता तोपर्यंत आसनात राहा आणि नंतर श्वास सोडताना पाय, छाती आणि डोके हळूहळू जमिनीवर परत आणा.
- आपल्या मांड्याखालील हात काढा आणि हात शरीराच्या बाजूला ठेवा. आपले डोके एका बाजूला वळवा आणि विश्रांती घ्या.
कालावधी / आवर्तने:
जोपर्यंत श्वास रोखून ठेवता येईल तोपर्यंत हे आसन करावे. शलभासन तीन वेळा करावे.
शलभासनाचे फायदे
- संपूर्ण पाठीची लवचिकता आणि ताकद वाढवते
- खांदे आणि हात मजबूत करते
- मज्जातंतू आणि स्नायूंना, विशेषत्तः मान आणि खांदे सुडौल करते
- ओटीपोटाच्या अवयवांना मालिश आणि सुडौल करते आणि पचन सुधारते
- हे पोट आणि आतड्यांना उत्तेजित करते जे जठर व आतड्यांतील गॅस मुक्त होण्यास मदत करते, मूत्राशय मजबूत करते आणि मणक्याला ताणते.