विपरीत शलभासन हे हवेत उंच उडणाऱ्या सुपरमॅनसारखे आहे. यामुळेच या आसनाला सुपरमॅन आसन हे टोपणनाव मिळाले.
विपरीत = उलट; शलभ = टोळ; आसन = आसन
याचा उच्चार विपरीत-श-ल-भा-सन असा होतो.

हे आसन पाठीच्या खालच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी विशेषतः उपयुक्त आहे.
विपरीत शलभासन कसे करावे
- जमिनीवर आपल्या पायाची बोटं सपाट ठेवून पोटावर झोपा; हनुवटी जमिनीवर ठेवावी.
- आपले पाय एकमेकांना हलके स्पर्श करून जवळ ठेवा.
- आता शक्य तितके आपले हात समोरच्या बाजूला पसरवा.
- दीर्घ श्वास घ्या आणि आता आपली छाती, हात, पाय आणि मांड्या जमिनीवरून वर उचला. अपण उडणाऱ्या सुपर हिरो-सुपरमॅनसारखे दिसत आहात! आपल्या चेहऱ्यावरील हास्य अजून मोठे करा, कारण सुपरहीरो नेहमी आनंदी असतात, विशेषत: उडत असताना. आपले हात आणि पाय अधिक खेचून धरायचा प्रयत्न करण्याऐवजी, आपले हात आणि पाय आपल्या धडापासून दूर ताणण्याचा सौम्य प्रयत्न करा. आणि दोन्ही टोकांना बसणाऱ्या ओढीला अनुभवा. आपले कोपर आणि गुडघे वाकलेले नाहीत याची खात्री करा.
- जागरुकतेने श्वास घेत राहा; आपले लक्ष शरीरावर पडणाऱ्या ताणावर ठेवावे.
- श्वास सोडत असताना, आपली छाती, हात आणि पाय हळूवारपणे खाली करा.
विपरीत शलभासनाचा व्हिडिओ
विपरीत शलभासनाचे फायदे
- छाती, खांदे, हात, पाय, पोट आणि पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंना ताणते आणि मजबूत करते.
- पोट आणि पाठीचा खालचा भाग सुडौल करते.
- मणक्याला मसाज करते आणि पाठ लवचिक ठेवते.
- छाती ताणण्यास मदत करते.
- रक्ताभिसरण सुधारते.
- मनाच्या पातळीवर देखील कार्य करते – जेव्हा आपण उड्डाण करता तेव्हा आपण निव्वळ वर्तमान क्षणातच राहू शकता. आपली इच्छा असली तरी आपण कोणत्याही समस्येबद्दल विचार करू शकत नाही!
- पोट आणि पोटासाठी चांगली कसरत असू शकते.
पद्म साधना क्रमामध्ये, विपरीत शलभासन हे भुजंगासनानंतर पाचवे आसन असते.
हे आसन कोणी करू नये
नुकतीच आपल्या पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा आपण गरोदर असाल तर या आसनाचा सराव करू नका.
सर्व योगासने मागील योगासन : सालंब भुजंगासन पुढील योगासन: शलभासन










