नौका = नाव, होडी. आसन = मुद्रा किंवा स्थिती
या आसनाचे नांव, ही स्थिती नावेचा आकार घेते यावरून पडले आहे.
नौकासन कसे करावे
- आपले पाय एकत्र जुळवून आणि हात शरीराच्या बाजूला ठेवून आपल्या पाठीवर झोपा.
- दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत आपली छाती आणि पाय जमिनीवरून वर उचला, आपले हात पायांच्या दिशेने ताणा.
- आपली नजर, हाताची आणि पायाची बोटे एका रेषेत असावीत.
- ओटीपोटाचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे नाभीच्या भागात थोडा ताण जाणवतो कां, हे बघा.
- या स्थितीमध्ये दीर्घ आणि सहज श्वास घेत रहा.
- श्वास सोडत हळूहळू हात,पाय, पाठ खाली घेत जमिनीला टेकवा आणि आराम करा.
- हे आसन पद्म साधनेतील एक आसन देखील आहे, जे धनुरासन नंतर हे योगासन केले जाते.
नौकासन व्हिडिओ
नौकासनाचे फायदे
- पाठीच्या आणि पोटाच्या स्नायूंना बळकट आणते.
- पायाच्या आणि हाताच्या स्नायूंना टोन करते.
- हर्निया असलेल्या लोकांसाठी उपयुक्त.
नौकासन कोणी करू नये
- जर आपणास कमी रक्तदाब, तीव्र डोकेदुखी, मायग्रेन असेल तसेच काही जुनाट आजार किंवा पाठीच्या विकाराने अलीकडच्या काळात ग्रासले असेल तर या योगाभ्यासाचा सराव करू नका.
- अस्थमा आणि हृदय विकाराच्या रुग्णांना हे आसन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
- महिलांनी गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळीच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये नौकासन करणे टाळावे.
नौकासनावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न
नौकासन – संस्कृत शब्दापासून आला आहे, नौका म्हणजे नाव, होडी आणि आसन म्हणजे मुद्रा किंवा स्थिती. या आसनात आपले शरीर नावेचा आकार घेते.
नौकासनाचे फायदे – ओटीपोटाचे, हात, मांड्या आणि खांद्याचे स्नायू बळकट करते. यकृत, स्वादुपिंड आणि मूत्रपिंड यांसारखे पोटाचे अवयव उत्तम कार्य करतात, रक्तप्रवाह नियंत्रित करते. हर्निया असलेल्या लोकांसाठी उपयुक्त.
नवासन किंवा परीपूर्ण नवासन किंवा बोट पोझ किंवा फुल बोट पोझ.
आपले दोन्ही पाय एकत्र आणि हात शरीराच्या बाजूला ठेवून पाठीवर झोपा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत असताना, छाती आणि पाय जमिनीवरून एकत्र उचला, आपले हात पायाकडे ताणा. आपली नजर, हाताची आणि पायाची बोटे एका रेषेत असावीत. आपल्या नाभीच्या भागात ताण येतोय याची जाणीव ठेवा. या स्थितीत स्थैर्य कायम ठेवत खोल आणि सहज श्वास घेत राहा, श्वास सोडताना हळू हळू असं सोडत जमिनीला टेका आणि आराम करा.
पाठीच्या दुखापती आणि पाठीतील विकार, गोठलेले खांदे आणि संधिवात यामध्ये पर्वतासन करू नका.
चक्कर येणे हे व्हर्टिगोचा त्रास किंवा योग्यरित्या योगासन न केल्यामुळे किंवा वेगाने सराव केल्यामुळे किंवा निर्जलीकरणामुळे होते.
होय, या आसनांच्या नियमित सरावाने पोटात घट दिसून येते कारण ते पोटाला व्यायाम देते.