प्राचीन भारतीय परंपरेनुसार ग्रहण काळात काय करावे | What to do during eclipse according to Indian tradition

ग्रहणाची पौराणिक कथा और रहस्य

महापराक्रमी देव आणि असुरांच्या मध्ये शेकडो वर्षे चाललेल्या समुद्र मंथनातून,स्वतः भगवान विष्णू धन्वंतरीच्या रुपात अवतरले आणि त्यांनी आपल्या सोबत अमरत्व प्रदान करणारा  अमृताचा घडा आणला. तिथेच त्यांच्यातील लढाई संपुष्टात आली आणि भगवान विष्णूनी त्रिलोक सुंदरी मोहिनीचे रूप धारण करीत मोठ्या चलाखीने त्या अमृताचे सर्व देवांत वितरण केले. हे माहीत होताच स्वरभानू नावाच्या असुराने देवाचे रूप धारण करीत सूर्य आणि चंद्र देवांच्या मध्ये जाऊन बसकन मांडली. त्या आख्यायिकेत पुढे सांगण्यात येते की, सूर्य आणि चंद्र देवांनी विरोध करूनही त्या असुराने आपला अमृताचा वाटा पटकाविला होता, आणि मग विष्णूने सुदर्शन चक्राचा वापर करीत त्या असुराचे दोन तुकडे केले. डोक्याचा भाग राहू झाला आणि धडाचा भाग केतू. आणि तेव्हापासून ते दोघेही अधूनमधून सूर्य आणि चंद्राला गिळंकृत करून सूड उगवित असतात.

श्री श्री गुरुकुलचे समन्वयक श्री.मानक शर्माजी ह्या बाबतीत स्पष्ट करतात, "आपल्या पुराणात राहू आणि केतू बद्दल अनेक कथा आहेत. पण वास्तवात ते गणितीय पद्धतीने मोजलेले दोन बिंदू आहेत, जे ग्रहण कधी होणार हे दर्शवितात.पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाचे प्रतल आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणाचे प्रतल ह्यांत ५ अंशाचा फरक असतो. ते प्रतल ज्या बिंदूंवर एकमेकांना छेदतात त्यांना राहू आणि केतू अशी नावे दिली आहेत. चंद्र जेव्हा ह्या बिंदूंवर येतो, केवळ तेव्हाच ग्रहण घडून येते, प्रत्येक पोर्णिमा/अमावास्येला नव्हे.”

तुमची आजी ग्रहणाच्या वेळी उपवास करायची, किंवा अन्नाच्या भांड्यांवर दुर्वा ठेवायची किंवा ग्रहणानंतर स्नान करायची ह्याचे तुम्हाला नेहमी आश्चर्य वाटले असेल. नवल म्हणजे, आपल्या पूर्वजांकडे आकाशातील ग्रहताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करून ग्रहणाची तारीख आणि वेळ सांगण्याचे गणितीय नैपुण्य होते, ते सुद्धा कोणत्याही किचकट उपकरणांशिवाय. २७ जुलै रोजी येणाऱ्या ह्या शतकातील सर्वात दीर्घकाळपर्यंत टिकणारे चंद्रग्रहण भारतातील सर्व भागातून दिसणार आहे. त्या निमित्ताने आम्ही काही वैज्ञानिक, डॉक्टर्स, आजींसोबत बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केला की, का बरं ग्रहणाच्या वेळी आपण हे काही रिवाज पाळत असतो.

ग्रहण खरेच अशुभ असतात काय?

आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री दिनेश काशीकर सांगतात की, खरे पाहता ग्रहणकाळ हा अध्यात्मात रुची असणाऱ्यांसाठी पवित्र काळ असून जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, तेव्हा ध्यान किंवा मंत्रपठन करणे अशा साधकांसाठी अतिशय लाभदायी असते.

ध्यानाचे फायदे सर्वांना माहिती आहेतच, त्याचवेळी नुकत्याच झालेल्या संशोधनात मंत्रपठणाचे आपल्या मेंदूवर होणाऱ्या सकारात्मक प्रभावांबद्दल नवी माहिती हाती आली आहे. सायंटिफिक अमेरिकनद्वारा प्रकाशित केलेल्या संशोधनात असे आढळून आले की प्राचीन संस्कृत मंत्र पाठ केल्यास मेंदूच्या आकलन विषयक क्षेत्राचा भाग आकाराने वाढतो. BITS हैद्राबाद येथे झालेल्या संशोधनात सिद्ध झाले की जे लोक मंत्रांचे पठण किंवा श्रवण करतात, ते अधिक आनंदी आणि शांत होतात. तुम्ही ‘ओम नमः शिवाय’चे दहा मिनिटांसाठी उच्चारण करा आणि स्वतःच बदल अनुभवा. तसेच तुम्ही ललिता सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनाम ह्या मंत्रांचे श्रवण करू शकता.

ग्रहणकाळात उपवास करायला का सांगितले जाते?

ग्रहणकाळात पृथ्वीवरील प्रकाशाची तरंगलांबी आणि तीव्रता बदलत असते. विशेषतः अतिनील आणि अवरक्त किरणे, जी नैसर्गिकरित्या निर्जंतुकीकरणाचे काम करतात, ती ग्रहणकाळात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. ह्यामुळे अन्नात सूक्ष्म जीवजंतूंची अनियंत्रित वाढ होते आणि त्यामुळे ते अन्न सेवनास योग्य राहत नाही.

ग्रहणकाळात उपाशी राहण्यास सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या काळातील तुमचे ध्यान/मंत्रपठन अधिक प्रभावी होते, जे भरल्यापोटी केल्यास तेवढे उपयोगी ठरत नाही. म्हणून ग्रहण लागण्यापूर्वी दोन तास तरी अन्नसेवनास मनाई केली जाते, जेणेकरून ध्यानास बसते वेळी तुमचे अन्न पूर्णपणे पचलेले असेल.

ग्रहणकाळातील अन्नसेवना बद्दल काही नियम

  • ग्रहण लागण्यापूर्वी दोन तासापासून अन्न सेवन बंद करावे.
  • ग्रहण लागण्यापूर्वी शिजविलेले अन्न नंतर वापरू नका, कारण घातक उत्सर्जित किरणे त्या अन्नाद्वारे शोषली गेली असू शकतात.
  • म्हातारे, आजारी व्यक्ती आणि गरोदर स्त्रिया ग्रहणकाळात अन्न सेवन करू शकतात.
  • ह्या काळात पाणी पिणे सुद्धा टाळावे. जर खूप तहान लागलीच तर वाहते पाणी अथवा नारळ पाणी घेऊ शकता.

ग्रहण काळात अन्नाच्या भांड्यात दुर्वा का ठेवल्या जातात?

ग्रहण काळात जे अन्न आंबू शकते अशा अन्नाच्या भांड्यात दुर्वा ठेवतात आणि ग्रहण संपल्यावर त्या काढल्या जातात. कारण वर सांगीतल्या प्रमाणे अन्नात सूक्ष्म जीवांची खूप वाढ होते. दुर्वा नैसर्गिकरित्या जंतू रोधक म्हणून कार्य करीत असल्याने त्यांना साठवलेल्या अन्नात ठेवले जाते.

वैज्ञानिक म्हणतात की दुर्वाना नैसर्गिक अन्न परीरक्षक म्हणून घातक रासायनिक परीरक्षकां ऐवजी वापरले जाऊ शकते. दुर्वांच्या पृष्ठभागावरील श्रेणीय अतिसूक्ष्म रचना ज्याची नक्कल कृत्रिम पृष्ठभागाद्वारे केली जाते, त्याला आरोग्य क्षेत्रात निर्जंतुकीकरणाची गरज पडते, तिथे वापरले जाऊ शकते.

ग्रहण संपल्यावर स्नान करणे का आवश्यक आहे?

ग्रहण काळात आपल्या भोवतालच्या वातावरणात सूक्ष्म जंतूंचे प्रमाण खूप वाढलेले असल्यामुळे, नंतर आपल्याला डोक्यावरून स्नान करायला सांगितले जाते.

गुरुदेव श्री श्री रवि शंकर जी म्हणतात

"तुम्ही चंद्रग्रहण पाहू शकता. ती एक खगोलीय घटना आहे. फक्त सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका. त्याची किरणे अपायकारक असल्याने काचेच्या माध्यमातून पाहायला हवे.

प्राचीन काळातील लोकांनी ग्रहणावेळी किंवा आधी खाऊ नये असे सांगितले आहे, कारण खाल्लेले अन्न चांगले पचले तर तुम्ही त्या काळात ध्यान करू शकता.

ग्रहणाच्या वेळी आपण जप, ध्यान आणि प्रार्थना केल्यास त्याचे फल शंभर पटीने
वाढते – म्हणून तसे सांगितले आहे.

ग्रहणादरम्यान सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात. यामुळे खगोलीय किरणे अशी निघतात कि त्यावेळी केलेल्या साधनेचा लाभ अनेक पटीने वाढतो. म्हणून ग्रहणामध्ये ध्यान करा, “ओम नमः शिवाय ” किंवा ”ओम नमो नारायणाय ” जप करा.

यावेळी १०८ वेळा जप केलात तर दहा हजार वेळा केल्यासमान आहे. साधकांच्या साठी हि फार अमुल्य संधी आहे. हि अशुभ वेळ नाही आहे. करमणूक आणि ऐश आरामासाठी अयोग्य वेळ
आहे."

 

चंद्रग्रहणाच्या वेळा:

चंद्रग्रहण २७ जुलैला रात्री १ ते २ वा. ४३ पर्यंत असेल, आणि ते १ तास ४३ मिनिटे इतका वेळ राहणार असून ते ह्या शतकातील सर्वात दीर्घ काळाचे ग्रहण ठरेल.