Shavasana in Marathi | शवासन

Shavasana in Marathi

शव – पार्थिव; आसन – स्थिती

मृत शरीराच्या स्थितीवरून या आसनाला नाव देण्यात आले आहे. ही विश्रांती देणारी अवस्था असून सर्व योगासने झाल्यानंतर केली जाते. हालचाली नंतर आराम करणे क्रमप्राप्तच असते. हा एक असा अवकाश असतो ज्याच्यामध्ये रोग निवारण करण्याचे सामर्थ्य आहे.

शवासन कसे करावे | How to do the Savasana

  • सपाट भागावर पाठीवर झोपा, शक्यतो गादीवर नको किंवा कशाचा आधार न घेता. अगदीच अशक्य असेल तर छोटी उशी मानेखाली घेऊ शकता. डोळे झाका.
  • सुखकर वाटेल इतके पाय एकमेकांपासून दूर ठेवा. पाय व गुडघ्यांना पूर्ण आराम मिळू द्या. पायाची बोटे बाहेरील बाजूला ठेवा.
  • दोन्ही हात शरीराच्या बाजूला परंतु शरीराला स्पर्श न करतील असे ठेवा. हाताचे तळवे छताकडे उपडे करून ठेवा.
  • शरीराच्या प्रत्येक भागाकडे एका मागून एक लक्ष न्या आणि संपूर्ण शरीराला आराम द्या.
  • प्रथम उजव्या पायाच्या तळवयाकडे लक्ष न्या व नंतर उजव्या गुडघ्याकडे (अशा प्रकारे संपूर्ण पायावर लक्ष राहू द्या व नंतर डाव्या पायाकडे लक्ष न्या). अशा प्रकारे हळूहळू डोक्याकडे वर सरकत प्रत्येक भागाला आराम द्या.
  • हे करत असताना श्वास सावकाश, हळू व दिर्घ घ्या. तुमच्या श्वासाला तुमचे संपूर्ण शरीर विश्रांती अवस्थेत नेण्यास मदत करा. आत घेतलेला श्वास शरीराला उर्जा देतो तर सोडलेला श्वास शरीराला विश्रांती देतो. इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये किंवा विचार करू नये.
  • आपल्या शरीरा सोबत रहा आणि श्वासोश्वास करत रहा. शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर सोपवून द्या व मुक्त व्हा. पण झोपी जाऊ नका !
  • साधारण १०-२० मिनिटांनी जेंव्हा तुम्हाला पूर्ण आराम वाटेल तेंव्हा डोळे बंदच ठेऊन उजव्या कुशीवर वळा. एक मिनिट याच स्थितीत रहा. नंतर तुमच्या डाव्या हाताचा आधार घेत हळुवारपणे उठून सुखासनात बसा.
  • डोळे बंदच ठेऊन काही दिर्घ श्वास घ्या व सोडा. हळूहळू आपल्या शरीर व वातावरणाबद्दल जागरूक व्हा. जेंव्हा तुम्हाला पूर्णतेचा अनुभव येईल तेंव्हा डोळे सावकाश उघडा.

शवासनाचे फायदे |Benefits of the Savasana

  • हे आसन तुम्हाला सखोल ध्यानात घेऊन जाते ज्यामुळे तुमच्या शरीरातील पेशींची झीज भरून निघते. तणाव कमी होतो. योगाभ्यासाचा खोलवर परिणाम होण्यास अवधी मिळतो.
  • पुनरुज्जीवनाचा अनुभव होतो. योगासनांचा शेवट करण्यास उत्तम आसन. विशेषकरून जलदगतीने आसने केल्यास हे आसन जरूर करावे.
  • रक्तदाब, चिंता आणि निद्रानाश कमी करण्यास मदत करते.
  • शरीराला स्थिर करण्याचा व वातदोष कमी करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

शवासन केंव्हा करू नये |Contraindications of the Shavasana

तसे काही नाही. पण तुमच्या डॉक्टरांनी जर काही कारणासाठी पाठीवर न झोपण्याचा सल्ला दिला असल्यास करू नये.

<< Lying-down on sides                                                                          Lying-down Body Twist >>

(लाभदायक योगासने)

योगाभ्यासाने शरीर व मनाचे स्वास्थ्य खूपच सुधारत असले तरी ती औषधांना पर्यायी होऊ शकत नाहीत. योगासने ही श्री श्री योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच शिकली पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचार घेणाऱ्या व्यक्तींनी योगासने डॉक्टरांचा व श्री श्री योगशिक्षकांच्या सल्ल्यानंतरच करावीत. आपल्या भागातील जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रावर श्री श्री योग शिबिर कधी आहे ते शोधा. अभ्यासक्रमांविषयी माहिती हवी असेल अथवा तुम्हाला काही सांगायचे असेल तर ह्या इमेल आयडी वर लिहा: info@srisriyoga.in