सूर्य नमस्कार मंत्रोपचार म्हणजे – सूर्यासाठीचे ‘प्रेम गीत’

सूर्यनमस्काराचा सराव करताना त्याबद्दल सूर्यनमस्काराच्या मंत्राद्वारे कृतज्ञतेचा दृष्टीकोन ठेऊ या. कारण तुम्ही सूर्यनमस्कारामधून निव्वळ सुर्याचाच नाही तर संपूर्ण सृष्टीचा आदर करत असता. सृष्टीबद्दल आदर बाळगल्याने आपल्या योगाभ्यासाप्रती पवित्रता प्राप्त होते.

मी सूर्य नमस्कारचा सराव. सुरु करण्यापूर्वी माझ्या योगा मॅट वर उभा आहे, माझे दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीसमोर जोडलेले आहेत. मी सुर्यनमस्काराचा पहिला मंत्र उच्चारतो. दुसऱ्या स्थितीसाठी हात वर नेताना दुसरा मंत्र उच्चारत हात खाली नेत जमिनीला स्पर्श करतो – जणू मी त्या सर्वोच्च ऊर्जेसमोर सूर्यासमोर नतमस्तक होतोय. माझ्या चेहऱ्यावरील स्मित हास्य प्रत्येक सूर्यनमस्कारामधील आसनांसोबत आणखी पसरतेय. माझ्या सूर्यनमस्कारांचा संपूर्ण सराव पवित्र बनतो. मंत्रोच्चारामुळेच हे घडतेय, नाहीतर मंत्राशिवाय सूर्यनमस्कार म्हणजे निव्वळ वजन घटवणारा, स्नायू लवचिक आणि बळकट बनवणारा व्यायाम प्रकार बनला असता.

आहे- ठीक आहे. परंतु ते बारा सूर्यनमस्कार म्हणजे काय?

अक्षरे, त्यांचा समूह आणि ध्वनी यांचा संयोग म्हणजे मंत्र – जी उच्चारली जातात, गातात. सूर्यनमस्कारामध्ये ती सूर्याच्या स्तुतीबद्दल उच्चारतात. या मंत्रोच्चारामुळे सूर्यनमस्काराचे लाभ ; द्विगुणीत होतात. कारण ते आपल्या शरीर आणि मनामध्ये खोलवर जाऊन सूक्ष्म स्तरावर काम करत असतात – सूर्यनमस्कारामध्ये सूर्याच्या गुणांची स्तुती करणारे बारा मंत्र आहेत जे आपल्या सूर्यनमस्काराच्या सरावाला अध्यात्मिक स्वरूप देतात. 

सूर्यनमस्काराच्या मंत्रांचा उच्चार कसा करावा?

या उच्चारांचा एकमेव नियम आहे ‘त्यांचा उच्चार अत्यंत श्रद्धेने करणे’. या प्रत्येक मंत्राला एक विशिष्ट अर्थ आहे परंतू प्रत्येक मंत्राचा अर्थ आपल्याला ज्ञात असणे गरजेचे नाही. 

उदा. ओम भवाय नमः – म्हणजे जो आपल्या जीवनात प्रकाश प्रदान करतो !  या मंत्राचा उच्चार करत सूर्यनमस्कार करताना मनामध्ये ज्याच्यामुळे या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली त्या सूर्य प्रकाशाप्रती कृतज्ञता असू द्या. तसेच ओम मित्राय नमः चा उच्चार करताना, त्या तळपत्या गोलाला आपला मित्र मानून सूर्य नमस्कार करू या.

या मंत्रांना सूर्यनमस्कार मध्ये कसे समाविष्ट करू या ?

या मंत्रांचा उच्चार तुम्ही मोठ्याने किंवा मनातल्या मनात करू शकता.

आता सूर्यनमस्कार करताना मंत्रोच्चार कसे करावे जाणून घेऊया. एक सूर्यनमस्कारा मध्ये  सूर्य नमस्काराचे दोन संच असतात. एक उजव्या पायाने, दुसरा डाव्या पायाने. बारा सूर्यनमस्कार रोज . करणे योग्य. परंतु तुम्हाला योग्य अशी संख्या ठरवू शकता. जर तुम्ही सहा किंवा जास्त नमस्कार करणार असाल तर प्रत्येक नमस्काराची सुरवात एकेक मंत्राने करा. पहिल्या मंत्राचा उच्चार करून सुर्यनमस्काराचे दोन संच करू या. मग नवीन मंत्राच्या उच्चारानंतर दुसरा सूर्यनमस्कार. याप्रमाणे बारा मंत्रांच्या उच्चारानंतर बारा सूर्य नमस्कार.

प्रणामासन : नमस्कार स्थिती
 

 

मंत्र : ओम मित्राय नमः

अर्थ : जो सर्वांचा मित्र आहे.

हस्तउत्तानासन : हात वर खेचलेले
 

मंत्र : ओम रवाय नमः

अर्थ : जो तेजस्वी, चमकणारा आहे.

 

हस्त पादासन : हात पायांजवळ

मंत्र : ओम सूर्याय नमः

अर्थ : जो अंधकाराचा नाश करून सर्वांना कार्यरत बनवतो..

अश्व संचालनासन : घोड्याचा आकार

मंत्र : ओम भवाय नमः

अर्थ : जो प्रकाशाचा दाता आहे.

 

दंडासन : काठी सारखा ताठ आकार 

 

मंत्र : ओम खगाय नमः

अर्थ : ज्याने संपूर्ण आकाश व्यापले आहे.

 

अष्टांगासन : आठ ही अंगांनी नमस्कार करणे

 

मंत्र : ओम पुषणे नमः

अर्थ : जो पोषण आणि पूर्णता देतो.

 

भुजंगासन: (कोब्रा पोज)

 

मंत्र : ओम हिरण्यगर्भाय नम:

अर्थ : ज्याची बुद्धी सोनेरी सारखी चमकणारी आहे

पर्वतासन : पर्वताचा आकार

 

मंत्र : ओम मरिचाय नमः

अर्थ : अनंत किरणांद्वारा प्रकाश देणारा

 

अश्व संचालनासन : घोड्याचा आकार

 

मंत्र : ओम आदित्याय नमः

अर्थ : विश्व निर्माता

१०
 

हस्त पादासन : हात पायांजवळ
 

मंत्र : ओम सावित्रे नमः

अर्थ : जीवनदाता

 
११

हस्तउत्तानासन : हात वर खेचलेले
 

मंत्र : ओम आर्काय नमः

अर्थ : जो स्तुती आणि गौरवाला पात्र आहे.

१२

ताडासन:
 

 

मंत्र : ओम भास्कराय नमः

अर्थ : शहाणपणा आणि विश्वाची ओळख करून देणारा

 

या बारा सुर्यनमस्कारांच्या मंत्राचा उच्चार योग्य असणे गरजेचे आहे. व्हिडीओप्रमाणे योग्य मंत्रोच्चार तुम्ही शिकू शकता.

या बारा मंत्रांचा समावेश आपल्या दैनंदिन सूर्यनमस्कारांच्या सरावामध्ये करा आणि सूर्याशी तादात्म्य साधा.

(कृष्णन वर्मा आणि दिनेश काशीकर यांच्या मार्गदर्शनाने लेखिका प्रीतीका नायर)

Interested in yoga classes?