योगाद्वारे आपल्या संशयावर मात करा Clear your doubts through yoga in Marathi

जीवनात सतत अनिश्चितता आणि प्रश्नावल्या नसून जेंव्हा विविधता असते तेंव्हा आपण पूर्वीपेक्षा उत्तम लढा देत नसतो का? दैनंदिन जीवनात आपल्या पैकी बहुतेकजण या वैविध्यतेला चांगले हाताळत आलोय. तरीदेखील काही वेळा आपले मन “शक्य नाही, जमणार नाही“ सारख्या त्रासदायक विचारांनी ग्रासले जातेच ना. अशावेळी “हो ! करू शकतो !” हा विचार कसा येऊ शकतो?

योग कडे अशा संशयातून मुक्त होण्याचा दृष्टीकोन आहे. संशय म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या सूक्ष्म ऊर्जेचा- प्राणशक्तीचा अभाव. ही प्राणशक्ती आपणास चार स्त्रोतांपासून मिळते- अन्न, निद्रा, श्वास आणि ध्यान. म्हणूनच चाणाक्ष योगी आपल्या जीवनात या चार ऊर्जा स्त्रोतांचा अंगीकार करून निःसंशय जीवन जगत असतात. जेंव्हा तुम्हाला जाणीव होईल कि नकारात्मक विचार येत आहेत. उठा आणि या चार ऊर्जा स्त्रोतांच्या वाढीसाठी काहीही करा. या नकारात्मक विचार शृंखलेमध्ये न अडकण्यासाठी सरावाची गरज आहे, मात्र या छोट्या छोट्या गोष्टी काम करतात.

निःसंशय जीवन जगण्याची माझी पद्धती :

  • योगासने : योगासानांमुळे खूप आराम मिळते आणि त्यामुळे माझे लक्ष विचारांकडून श्वासावर जाते. काही उभे राहून आणि बसून केलेल्या आसनांमुळे भविष्याची चिंता नाहीशी होऊन मन वर्तमानात येते.
  • सूर्य नमस्कार : सूर्याची उपासना असलेल्या सूर्य नमस्कारानी आपले जीवन तेजाने आणि उबदारपणाने भरून जाऊन अज्ञानाचा नाश होतो.
  • पद्मसाधना : हा परिपूर्ण योग प्रकार मी येस+  शिबिरात शिकला. याच्या दोन फेऱ्यांमुळे सर्व चंचलता नाहीशी होऊन दिवसभर मसाज केल्याचा लाभ मिळतो. पद्मासाधना मध्ये उज्जवी श्वास घ्यावा. संस्कृत मध्ये उज्जवी श्वास म्हणजे “विजय मिळवून देणारा श्वास”. काही क्षण उजज्वी श्वास घेतल्याने मला शौर्य आणि विजयी असल्याचा भाव येतो.
  • झोपी जा. रात्री पुरेशी झोप झाली असली तरी बिछान्यावर एक डुलकी काढणे ठीक आहे नां.
  • ताजे आणि रसाळ सफरचंद खा. आपण जे खातो ते आपण बनतो. व्यक्तीशः माझा असा अनुभव आहे की पिझ्झा, आईस क्रीम आणि बिस्कीटांमुळे आळस येतो तर सॅलड आणि फळांच्या रसांमुळे ऊर्जावान वाटते.
  • संशय नेहमी सकारात्मक गोष्टींवरच येतो. आपल्या कमकुवत बाबींवर आपण कधीही सवाल करत नाही. “तुम्ही खरेच माझा द्वेष करता कां?“ आपल्या शत्रूंना कधीतरी विचारतो कां? म्हणून जेंव्हा पण मला कशावर तरी संशय येऊ लागतो, मला जाणीव होते की माझ्या जीवनात काहीतरी सकारात्मक आहे आणि मग मी त्या संशयाप्रती कृतज्ञ होतो.

हे केल्याने त्वरित तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही प्राणशक्तीचा स्तर टिकऊन ठेऊ लागाल. प्राणशक्ती घटवणाऱ्या कृती उदा: तास न तास दूरदर्शन पहाणे वैगेरे करायच्या की योग आणि प्राणायाम करून प्राण शक्ती वाढवायची? निवड तुमच्या हातात आहे.

तुमचा दिवस उच्च प्राणशक्तीचा असो !