अधोमुख श्वानासन
अधो – पुढे; मुख – चेहरा; श्वान – कुत्रा
आसनाचा उच्चार अधोमूख श्वानासन असा होतो
अधोमुख श्वानासन हे आसन पुढे वाकलेल्या कुत्र्याच्या प्रतिकृतीप्रमाणे असते, म्हणून त्याचे नाव पुढे वाकलेले श्वान असे आहे.
या आसनाचा सराव कोणालाही अगदी एखाद्या नवशिक्यालाही करता येतो आणि या आसनाच्या असलेल्या सर्व फायद्यांमुळे रोजच्या योगाभ्यासामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे.
अधोमुख श्वानासन करण्याची पद्धत
- गुढगे आणि हात जमिनीवर टेकवून पाठीचे टेबल आणि हात व पाय हे टेबलाचे पाय बनतील अशा स्थितीत या.
- तुम्ही श्वास बाहेर सोडताना, गुडघे आणि कोपर सरळ करून, नितंब वर उचला, शरीराचा आकार इंग्रजीचे अक्षर व्ही ( V ) उलटे दिसेल असा करा.
- हात खांद्याच्या रुंदी इतक्या अंतरावर असावेत, पाय नितंबाच्या रुंदी इतक्या अंतरावर असावेत आणि एकमेकांना समांतर असावेत. पायाची बोटे सरळ समोरच्या दिशेने असावीत.
- आपले हात जमिनीवर दाबा. स्कंधास्थींना रुंदवावे. दंडांचा कानांना स्पर्श होईल अशाप्रकारे मान लांब ठेवा.
- अधोमुख श्वानासनाच्या स्थितीत स्थिर राहा आणि दीर्घ श्वास घ्या. नाभीकडे पहा
- श्वास सोडा. गुडघे वाकवा, टेबलाच्या स्थितीत पुन्हा या. आराम करा.
नवशिक्यांसाठी टिप्स
- हे आसन करण्यापूर्वी तुमच्या पोटऱ्या आणि हात यांचा हलका व्यायाम करून आसनासाठी तयार करा.
- अधोमुख श्वानासनापूर्वी धनुरासन आणि दंडासन करावे.
- हे आसन सूर्यनमस्काराचा भाग म्हणूनही करता येते.
पूर्वतयारीची आसने
- धनुरासन
- दंडासन
अधोमुख श्वानासन केल्यानंतर करावयाची आसने
- अर्ध पिंच मयुरासन
- चतुरंग दंडासन
- उर्ध्व मुख श्वानासन
अधोमुख श्वानासनाचे फायदे
- या योगासनामुळे आपणास ऊर्जा मिळते आणि शरीराचा कायाकल्प घडतो
- हे मणक्याची लांबी वाढवते, छातीचे स्नायू मजबूत करते आणि फुफ्फुसाची क्षमता वाढवते.
- यामुळे संपूर्ण शरीरात विशेषत: हात, खांदे, पाय, पाय यांमध्ये ताकद येते.
- स्नायूंना सुडौल करण्यास मदत करते
- त्यामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढते
- मन शांत करते आणि डोकेदुखी, निद्रानाश आणि थकवा दूर करण्यास मदत करते
हे आसन कोणी करू नये
जर आपणास उच्च रक्तदाब, कार्पल टनेल सिंड्रोम, डोळयातील पडदा विलग झाला असेल, डोळ्यांच्या कमकुवत कोशिका, खांद्याला दुखापत झाली असेल किंवा अतिसार झाला असेल तर हे आसन करणे टाळा.
सर्व योगासने मागील योगासन : वसिष्ठासन पुढे योगासन : मकर अधोमुख श्वानासनअधोमुख श्वानासनावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अधोमुख श्वानासनामध्ये ३० सेकंदांनी सुरुवात करा. आसनाच्या नियमित सरावाने ३ मिनिटांपेक्षा जास्त काळ आसन धरून ठेवू शकता. आसनात स्थिरतेसाठी अधोमुख श्वानासनापूर्वी धनुरासन आणि दंडासन करा.
जर आपणास उच्च रक्तदाब, कार्पल टनेल सिंड्रोम, डोळयातील पडदा विलग झाला असेल, डोळ्यांच्या कमकुवत कोशिका, खांद्याला दुखापत झाली असेल किंवा अतिसार झाला असेल तर हे आसन करणे टाळा.
अधोमुख श्वानासन हे कुत्र्याचे सामर्थ्य आणि धैर्य याची नक्कल आहे. हे आसन पुढे वाकलेल्या कुत्र्याची प्रतिकृती बनवते, म्हणून कुत्रा खाली वाकलेले आसन (अधोमुख श्वानासन) असे नाव देण्यात आले आहे.
अधोमुख श्वान: हे मणक्याची लांबी वाढवते, छातीचे स्नायू मजबूत करते आणि फुफ्फुसाची क्षमता वाढवते; यामुळे संपूर्ण शरीरात विशेषत: हात, खांदे, पाय, पाय यांमध्ये ताकद येते; स्नायूंना सुडौल करण्यास मदत करते; शरीराचा कायाकल्प घडतो.











