हस्त – हात; पाद – पाय; आसन – शरीराचा पवित्रा;

हस्तपादासन कसे करावे

  1. दोन्ही पाय एकत्र ठेवत ताठ उभे राहा. हात शरीराच्या बाजूला असू दया.
  2. आपल्या दोन्ही पायांवर आपल्या वजनाचे संतुलन करा.
  3. श्वास घेत आपले हात डोक्याच्या वर घेऊन जा.
  4. श्वास सोडत पुढे आणि खाली झुकत पायांकडे वळा.
  5. याच अवस्थेत दीर्घ श्वास घेत २० ते ३० सेकंद राहा. हस्तपादासन योगासन – उभ्याने पुढे आणि खाली वाकून करावयाचे आसन.
  6. पाय आणि पाठीचा मणका सरळ ठेवा. हात जमिनीवर पायांच्या बाजूला किंवा पायांवर असू दया.
  7. श्वास सोडत छाती गुडघ्याजवळ न्या. नितंब आणि माकडहाड वर उचला. टाचा खाली दाबा.डोक्याला विश्राम दया आणि हळूवारपणे पायांजवळ न्या. दीर्घ श्वास घेत राहा.
  8. श्वास घेत आपले हात पुढे आणि वर ताणा.सावकाशपणे उभ्या स्थितीत या.
  9. श्वास सोडत हात शरीराच्या बाजूला घेऊन या.

हस्तपादासनाचे फायदे

  • पाठीच्या सर्व स्नायूंना ताण मिळतो.
  • मज्जासंस्थेचा रक्तपुरवठा वाढवून त्याला तरतरी आणते.
  • पाठीच्या कण्याला लवचिक बनवते.
  • पोटाच्या अवयवांना सुडौल बनवते.

हस्तपादासन कोणी करू नये

पाठीची इजा: ज्या व्यक्तींना पाठीच्या खालच्या भागाला इजा झाली असेल, स्पॉन्डिलायटिस, मानेचे दुखणे (Cervical pain) किंवा पाठीला आणि मणक्याचा कोणताही त्रास असेल त्यांनी हे आसन करू नये.

सर्व योगासने
आधीचे योगासन : कटीचक्रासन
पुढील योगासन : अर्ध चक्रासन

हस्तपादासनाविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होय. उत्तनासन, पश्चिमोत्तानासनाप्रमाणे हस्तपादासन हे पुढे वाकून करण्याचे आसन आहे.
त्यामुळे पाठीचे सर्व स्नायू ताणले जातात. मज्जासंस्थेला रक्तपुरवठा वाढवून तरतरी आणते.पाठीच्या कण्याला लवचिक बनवते. पोटाच्या अवयवांना सुडौल बनवते.
हस्तपादासन पाठ आणि गुडघ्याच्या स्नायूंवर (Hamstrings) लक्ष केंद्रीत करते. मज्जासंस्थेला रक्तपुरवठा वाढवून तरतरी आणते.मेंदूला रक्तपुरवठा वाढवते. गुडघ्याचे स्नायू ताणते. पोटाच्या अवयवांना सुडौल बनवते.
पर्वतासनामुळे पोटाचा घेर, पोट आणि नितंब ताणल्या जातात. नियमित सरावाने तुम्हाला पोटाचा घेर बराच कमी होऊ शकतो. यामुळे तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. यामुळे तुमच्या मनगटाचे आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.
होय. जर आपणास पाठीची इजा, स्पॉन्डिलायटिस, मानेचे दुखणे किंवा मणक्याचे त्रास नसतील तर पुढे वाकून करण्याची आसने तुमच्यासाठी चांगली आहेत.
हे पाठीचा खालचा भाग, हॅमस्ट्रिंग्ज आणि कंबरे ताणते हे पोट आणि ओटीपोटातील अवयवांना मालिश करते आणि सुडौल करते. हे खांद्यांना सुडौल करते.
ज्या व्यक्तींना पाठीला इजा आहे.स्पॉन्डिलायटिस, मानेचे दुखणे किंवा मणक्याचा त्रास आहे त्यांनी पुढे वाकायची आसने करू नयेत.
आपल्या पाठीला इजा झालेली असेल, स्पॉन्डिलायटिस, मानेचे दुखणे किंवा मणक्याचा काही त्रास असेल तर पुढे वाकण्याची आसने करता येणार नाही. ही आसने केल्यामुळे आपला त्रास वाढू शकतो.
हस्तपादासन हे सूर्यनमस्कारामधील १२ आसनांपैकी एक आसन आहे. त्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
थायरॉईड, अंतःस्त्रावी (Endocrine) ग्रंथी, पियुषिका (pitutary) ग्रंथी, तृतीयनेत्र ग्रंथी (Pineal gland), अधिवृक्क (Adrenal) ग्रंथी हयांना उत्तेजित करते. मांडी आणि पाठीच्या खालच्या भागातल्या स्नायूंना लवचिकता प्रदान करून ताण कमी करते. वाताचे संतुलन करते. तमस कमी करून सर्जनशीलता आणते. शरीराच्या वरच्या भागातील रक्तप्रवाह सुधारतो. चयापचय सुकर करते. यकृत (Liver) आणि प्लीहा (Spleen) अधिक चांगल्या प्रकारे काम करु लागतात. मणक्याची लांबी वाढवून चांगली अंगस्थिती बनवतो.
हस्तपादासनाचा व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे करा. पाठीची इजा, स्पॉन्डिलायटिस, मानेचे दुखणे, मणक्याचे त्रास असलेल्या व्यक्तींनी हे आसन करु नये.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *