शिशु : बालक; आसन : शरीराची विशिष्ठ स्थिति
शिशुआसन
शिशुआसन कसे करावे
- आपल्या टाचांवर बसा. आपले नितंब टाचांवर ठेवून, पुढे वाका आणि आपले कपाळ जमिनीवर टेकवा.
- हात जमिनीवर, तळवे आकाशाच्या दिशेला ठेवून आपल्या शरीराजवळ ठेवा. (हे सोयीचे नसल्यास, आपण एक मुठ दुसऱ्या मुठीवर ठेवून त्यावर आपले कपाळ टेकवू शकता.)
- हळुवारपणे आपली छाती मांड्यांवर दाबा.
- या स्थितीत स्थिर होऊन थांबा.
- पाठीच्या एक एक मणक्याला सरळ करीत हळूहळू वर येत टाचांवर बसा.
शिशुआसनाचे फायदे
- पाठीला खोलवर आराम मिळतो.
- बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
- मज्जासंस्था शांत करते.
शिशुआसन कोणी करू नये
- पाठीच्या कण्याला किंवा गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्यास हे योगासन टाळा.
- गरोदर महिलांनी हे आसन करणे टाळावे.
- जर आपणास अतिसाराचा त्रास होत असेल किंवा अलीकडेच त्रास झाला असेल तर हे योगासन करणे टाळा.
View All – बसून करावयाची योगासने जी उत्साह आणि आराम देऊ शकतात
सर्व योगासने आधीचे योगासन : एक पाद राज कपोटासन पुढील योगासन : चक्की चलनासनशिशुआसनावर सतत विचारले जाणारे प्रश्न
गुडघा, नितंब आणि डोक्याच्या खाली आधार देणे शिशुआसनामुळे खूप सोपे होते. हात आपल्या समोर ठेवण्याऐवजी हात जमिनीवर, तळवे आकाशाच्या दिशेला करून आपल्या शरीरासोबत ठेवू शकता. हे कष्टदायक वाटत असल्यास एक मुठी दुसऱ्या मुठीवर ठेवून त्यावर आपले कपाळ टेकवू शकता.
पाठ आणि गुडघ्याला दुखापत होणे किंवा घट्ट नितंब किंवा पोटरींचे स्नायू घट्ट होणे किंवा गर्भधारणा किंवा अतिसार यामुळे शिशुआसन करणे अशक्य होऊ शकते.
शिशुआसन ताठर पाठ, मान, नितंब, पाठीचा खालचा भाग किंवा गुडघे यांकरिता आव्हानात्मक आहे.
आपल्या शरीरासाठी शिशुआसन: पाठीला खोलवर आराम देऊ करते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. मज्जासंस्था शांत करते.
ज्या लोकांना शिशुआसन आरामदायी वाटते ते ३ ते ५ मिनिटे चालू ठेवू शकतात. पण ज्या व्यक्ती हे आसन समतोल राखण्यासाठी म्हणून वापरतात त्यांनी एक मिनिट करा. जर आपणास कपाळ जमिनीवर टेकवणे कठीण वाटत असेल, तर आपणास जमेल तेवढेच आसन चालू ठेवा
गुडघ्याला वा पाठीला दुखापत झालेली असल्यास किंवा नितंब वा पोटरीच्या स्नायूंमध्ये तणाव जाणवत असल्यास किंवा गर्भधारणा किंवा अतिसार यापैकी कुठलाही त्रास असल्यास शिशुआसन करू नये.
प्रत्येक श्वास आत घेताना पाठीचा कणा सरळ करा आणि प्रत्येक श्वास सोडताना आपले नितंब खाली ढकला. आपले खांदे आपल्या कानांपासून दूर, जमिनीच्या दिशेने न्या. जर खांद्यांवर ताण येत असेल, तर खांद्यांना आराम देण्यासाठी हात समोर सरळ ठेवण्याऐवजी कोपर थोडे वाकवा.
शिशुआसन करताना पाठीचे खालचे आणि वरचे, मांड्या आणि नितंबांचे स्नायू ताणले जातात.
शिशुआसन पाठीच्या खालच्या भागासाठी उत्तम आहे कारण ते करताना या आणि आसपासचा भाग प्रसरण पावल्यामुळे वेदना कमी होतात.
शिशुआसन छातीच्या प्रदेशातील ताण मुक्त करते, तणाव आणि चिंतेची भावना कमी करते. हे आसन आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना वाकवते, पाठीच्या खालच्या भागातील आणि मानेमधील वेदना कमी करते आणि आपला रक्तदाब कमी करते. त्यामुळेच शिशुआसन केल्याने आपणास छान वाटते.