सर्वांगासन हे एक असे योगासन आहे की ज्यामध्ये संपूर्ण शरीर खांद्यावर संतुलित केले जाते. ‘सर्व’ म्हणजे सर्व, ‘अंग’ म्हणजे शरीराचा भाग आणि ‘आसन’ म्हणजे आसन. नावाप्रमाणेच, सर्वांगासन तुमच्या शरीराच्या सर्व भागांच्या कार्यावर प्रभाव टाकते. हे आसन मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि त्याला ‘आसनांचा राजा’ असेही म्हटले जाते.

या शब्दाचा उच्चार सऱ्-वांग-आ-स-न असा होतो.

हा पद्म साधना योग क्रमाचा देखील एक भाग आहे.

सर्वांगासन कसे करावे

  • आपले हात आपल्या बाजूला ठेवून आपल्या पाठीवर झोपावे.
  • पाय, नितंब आणि पाठ हे भाग एकदम उचलावेत जेणेकरून आपल्या खांद्यावर शरीराचा भार येईल. आपल्या पाठीला हातांनी आधार द्यावा.
  • आपली दोन्ही कोपरं एकमेकांच्या जवळ आणावीत आणि आपले हात खांद्याच्या दिशेने सरकवत आपल्या पाठीमागे आणावेत. कोपरं खाली जमिनीवर आणि हात पाठीमागे दाबून पाय आणि पाठीचा कणा ताठ करत रहा. तुमचे वजन तुमच्या डोक्यावर आणि मानेवर नव्हे तर तुमच्या खांद्यावर आणि हाताच्या दंडांवर असले पाहिजे.
  • पाय स्थिर ठेवावे. तुमची टाच उंच करा जसे काही तुम्ही खोलीच्या छतावर तळपायांचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करीत आहात. पायाचा अंगठा आपल्या नाकासमोर असावा. आता पायाची बोटे वरच्या दिशेला करावी. आपल्या मानेकडे लक्ष द्या. जमिनीवर मान दाबू नका. त्याऐवजी मानेचे स्नायू थोडेसे घट्ट करण्याच्या भावनेने मान मजबूत ठेवा. छातीचे हाड हनुवटीच्या दिशेने दाबा. जर तुम्हाला मानेला काही ताण जाणवत असेल तर हे आसन सोडून द्यावे.
  • दीर्घ श्वास घ्यावे आणि ३०-६० सेकंद या स्थितीत राहावे.
  • आसन सोडताना, गुडघे कपाळापर्यंत खाली आणावे. आपले हात जमिनीवर आणावे, तळवे खाली करावे. डोके न उचलता हळू हळू तुमचा एकएक मणका खाली टेकवत यावे, अशाप्रकारे पूर्णपणे जमिनीवर यावे.
  • पाय जमिनीवर खाली करावे. किमान ६० सेकंद आराम करावा.
  • सर्वांगासन आपल्या कुवतीनुसार एक ते पाच मिनिटांपर्यंत धरून ठेवू शकता. हे आसन दोन किंवा तीन वेळा पुन्हा करावे.

सर्वांगासनाचे फायदे

  • थायरॉईड आणि पॅराथायरॉईड ग्रंथी उत्तेजित होतात आणि त्यांचे कार्य नियमित होते.
  • हात आणि खांदे मजबूत होतात आणि पाठीचा कणा लवचिक रहातो.
  • मेंदूकडे जास्त रक्तपुरवठा होतो त्यामुळे मेंदूचे पोषण होते.
  • शिरांमधून हृदयाकडे जादा रक्त वाहून नेले जाते त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ताण मिळतो.
  • बद्धकोष्ठता, अपचन आणि शिरा सुजणे, ताठर होणे (व्हेरिकोज व्हेन्स) यासारख्या विकारांपासून आराम मिळतो.

हे आसन केव्हा करु नये

खालीलपैकी कोणतीही आरोग्य स्थिती असल्यास सर्वांगासन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या:
गरोदर असणे, मासिक पाळी, उच्च रक्तदाब, हृदयाशी निगडीत समस्या, काचबिंदू, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलोसिस, मानदुखी आणि तीव्र थायरॉईड समस्या.

सर्व योगासने
मागील योगासन : पवनमुक्तासन
पुढील योगासन : हलासन

सर्वांगासनाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नवशिक्याने या पायऱ्यांचे अनुसरण करुन सर्वांगासनाचा सराव करावा: पाठीवर झोपा. आपले हात आपल्या बाजूला शरीराबरोबर . आपल्या हातांनी आपल्या पाठीला आधार देण्यासाठी तयार रहा. एकाच वेळी तुमचे पाय, नितंब उचला जेणेकरुन तुमच्या खांद्यावर तुमच्या शरीराचा भार येईल. आपल्या पाठीला हातांनी आधार द्यावा.. तुमचे पाय स्थिर ठेऊन, तुमची टाच उंच करा. तुमची मान जमिनीवर दाबू नका. ती स्थिर ठेवा. ३० सेकंद किंवा ३ मिनिटांपर्यंत आसनामध्ये राहून श्वास घ्या. आपले गुडघे, पाय, हळू हळू तुमचा एकएक मणका टेकवत खाली आणत जमिनीवर खाली या. हात आपल्या शरीराच्या बाजूला आणा. एक मिनिट विश्रांती घ्या.
सर्वांगासनामध्ये ३० सेकंद रहा. जर तुम्हाला सुसह्य वाटत असेल तर हळूहळू आसनाचा कालावधी 3 मिनिटांपर्यंत वाढवू शकता. आसनानंतर एक मिनिट विश्रांती घ्या.
हातपाय बळकट होतात, पाठीचा कणा लवचिक होतो , बद्धकोष्ठता, शिरा सुजणे किंवा ताठर होणे हा त्रास (व्हेरिकोज व्हेन्स) कमी होतो , थायरॉईड आणि पॅरा थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होतात, मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते : यासाठी सर्वांगासन चांगले आहे.
रक्तदाब, हृदयाच्या समस्या, काचबिंदू, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलोसिस आणि गरोदरपणातील तीव्र थायरॉईड समस्या आणि मासिक पाळी: अशा लोकांनी सर्वांगासन करु नये.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *