केरळमधील बालसुधार गृहामधील युवतींमध्ये अध्यात्मिक ऊर्जा जागृत (Spiritual Programs for juveniles in Kerala Marathi)

नव्वद युवतींना लाभ
उन्निक्रीष्णन विजयन पिल्लई ०९७४५९२५११६
कालिकत, केरळ : वेल्लीमादुकुन्नू शासकीय बालसुधार गृहामधील मुली आता योगामुळे अध्यात्मिक ज्ञान आणि लाभ प्राप्त करू शकल्या. जिल्ह्याभरातील आणि समाजातील विविध स्तरातील जवळपास नव्वद मुलींनी यात सहभाग घेतला.
निव्वळ पाच दिवसाच्या नवचेतना शिबिराने त्यांना आणखी ऊर्जावान आणि चैतन्यदायी बनवले. युवाचार्य सुरेंद्रन यांनी त्यांच्याशी संवाद साधता साधता त्यांचे हृदय काबीज केले, ते म्हणाले, “त्यांचा गतकाळ खूप कष्टदायी असल्याने त्यांच्यावर शिबिराचा परिणाम होणे अवघड होते. परंतु शिबिरानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला बदल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.”
राज्य शासनाचे सामाजिक कल्याण विभाग अनाथाश्रम चालवतात. सतरा वर्षाच्या आतील मुलींना दैनंदिन सुविधा आणि शिक्षण दत्तक घेतल्यानंतर मिळते. त्यांचे गतायुष्य विसरायला लावणे हे मोठे आव्हानच आहे. सुरेंद्रननी समाजातील तळागाळातील या अनाथ मुलींना शोधून काढले आणि योगा व ध्यानधारणेच्या  माध्यमातून मदत केली.
सुरेंद्रन म्हणाले, “आपणाला सर्व सोई-सुविधा मिळतात, ही कृपाच आहे, परंतु आपण त्यांचा गैरवापर करतो. त्यांना त्यांची गरज आहे, ते त्यांच्यापासून वंचित आहेत, आपणाला हे बदलावे लागेल. हा बदल आपण एका जरी बालकाच्या आयुष्यात करू शकलो तरी खूप होईल.”
स्वयंसेवकांनी पुन्हा या सुधार गृहाला भेट द्यायचे ठरवले आहे.
सुरेंद्रन यांचा संपर्क : ०९३८८४६९९१४