जल जागृती अभियान (Jal Jagruti Abhiyaan in Marathi)

आपल्याकडे असे म्हटले आहे की पाणी हेच जीवन आहे​

 

पाणी हेच जीवन आहे​’ या वाक्यावरूनच पाण्याचे महत्व लक्षात येते. पाण्याच्या उपलब्धतेवरच समस्त सजीव सृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, वृक्ष तोड, जल प्रदूषण, घटता पाऊसकाळ, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यांच्यामुळे पाणी प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

वाळवंटाचा ग्रह

“तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल,” या एकाच वाक्यावरून याची गंभीरता लक्षात येते. वेळीच योग्य पावले नाही उचलली तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. २००० सालापासून आजतागायत पृथ्वीवरील २३% नद्या आटल्या आहेत आणि सुपीक जमिनीपैकी १३% जमीन वाळवंट बनली आहे. हे असेच, या गतीने सुरु राहिले तर २०५० पर्यंत पृथ्वी ‘वाळवंटाचा ग्रह’ बनेल.

दरम्यान अनिश्चित आणि घटत्या पावसामुळे, भूगर्भजलाची पातळी घटून विहीरी, तलाव आणि कूपनलिकांमधील पाणी घटल्याने, सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण शेतकरी शेतीपासून दुरावत चालला आहे. रोजगारासाठी, उपजीविकेसाठी शहरांकडे जात आहे. (वाढत्या नागरीकरणाच्या समस्या वेगळ्याच आहेत.) त्यांचा कर्जबाजारीपणा वाढतच आहे. या सर्वामुळे नैराश्यापोटी आत्महत्या घडत आहेत.

यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांपैकी एक आहे, आटलेले जलस्त्रोत उदा : नद्या, पाणलोट क्षेत्र, ओढे, तलाव इत्यादींना पुनर्जीवित करणे आणि वाहून वाया जाणारे गोडे पाणी बंधारे घालून आडवणे, जिरवणे, साठवणे. कोणत्याही लोकोपयोगी योजनांसाठी आपण शासनाकडे पहातो. परंतु शासन आर्थिक प्राथमिकतांचा अभाव, अस्थिर सरकारे, इच्छाशक्तीचा अभाव अश्या विविध समस्यांमुळे या योजना प्रभावीपणे राबवू शकत नाही. तसेच शासनाच्या घोषित योजना गरजू व्यक्तींपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग? मग काय होणार? कोण घेणार ही जबाबदारी?

आर्ट ऑफ लिव्हींगची सरपंच परिषद २०१३’ :

‘आर्ट ऑफ लिव्हींग’. आर्ट ऑफ लिव्हींग जगातील सर्वात मोठी स्वयंसेवकांचा पाया असणारी अशासकीय, सामाजिक कार्यरत संस्था आहे. आर्ट ऑफ लिव्हींगने ही जबाबदारी उचलली. फेब्रुवारी २०१३ ला महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातून सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हापरिषद सदस्यांची ‘सरपंच परिषद – २०१३’ बेंगलोर आश्रमामध्ये झाली. ज्यामध्ये २५०० लोक सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजीनी इतर प्रकल्पांसोबत ‘जल जागृती अभियान’ बाबतीत मार्गदर्शन केले.

जल जागृतीमुळे परिवर्तन :

श्री श्री रविशंकरजी म्हणाले, “जनतेला त्यांचे अधिकार, सामर्थ्य आणि जबाबदारीची जाणीव करून द्या, त्यांच्या प्रगतीची जाणीव करून द्या, त्यांच्या खचलेल्या मनामध्ये विश्वास जागवा. मग परिवर्तन जन सामान्यातुनच घडेल.” तसेच त्यांनी  जल जागृती अभियानाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन मराठवाडा आणि विदर्भातील आर्ट ऑफ लिव्हींगच्या शेकडो प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांनी या जल जागृती अभियानला मूर्त स्वरूप देण्यास प्रारंभ केला.

आपापल्या गावांमध्ये जाऊन ‘युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबीर’ घेऊन, या माध्यमातून जल जागृती अभियानाचे महत्व, उपयोगिता, गरज पटवून देऊन, त्यांचा या अभियानामध्ये तन (श्रम), मन (विश्वास), आणि धन (आर्थिक) सहभाग वाढवला. त्यांना गुरुजींचा दृष्टीकोन समजावला आणि साकार होऊ लागले ‘जल जागृती अभियान.’
 

जल जागृती अभियान :

आर्ट ऑफ लिव्हींग चे प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी तसेच काही गावांमध्ये लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी श्रमदानाच्या माध्यमातून, लोक वर्गणीद्वारे आटलेल्या नद्या, ओढे, तलाव यांचा गाळ उपसला. त्यांची पात्रे खोल आणि रुंद केली. त्यामुळे जे नैसर्गिक जलस्त्रोत गाळाखाली बंद झाले होते ते पुन्हा वाहू लागले. उपसलेला गाळ नापीक शेतीमध्ये टाकल्याने त्या जमिनी सुपीक बनल्या. पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याला या पात्रांमध्ये अडवण्यासाठी ठिकठिकाणी गैबियन पद्धतीचे बंधारे घालून पाणी आडवले. गाळामुळे पाणी जिरत नव्हते, ते गाळ उपसल्यामुळे पाणी जिरू लागले.

श्री अभिजित पाटील, कनिष्ठ अभियंता, बी&सी, पेठ म्हणतात,

“आमच्या जमिनीची पातळी मुळातच उंचावर असल्याने आणि इतर जलस्त्रोत फारसे नसल्याने, आम्ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून होतो. तसेच पावसाचे पाणी देखील उंचीमुळे वाहून जायचे. परंतू या प्रकल्पामुळे नद्यांचे पाणी जमिनीत मुरल्याने उन्हाळ्यात देखील पाणी टंचाई जाणवणार नाही.”

एका दिवसांत भूगर्भ जलाची पातळी वाढली. ‘लक्ष्मी तरू’ सारखी जमिनीची धूप टीकवून ठेवणाऱ्या कल्पतरुंची तसेच इतर वृक्षांची लागवड आणि संगोपण सुरु केले. शासकीय अंदाजपत्रकाच्या रकमेपेक्षा निम्म्या कमी खर्चाने लोक वर्गणीतून, हे प्रकल्प पूर्ण झालेत. आसपासच्या जनतेला आर्ट ऑफ लिव्हींगच्या ‘जल साक्षरता अभियान’ बाबतीत प्रशिक्षित केले. या सर्वांचा एकत्रित परिणाम दिसू लागला.

श्री किसनराव जाधव, माजी आमदार, पेठ  सांगतात :

“या प्रकल्पाच्या सुरवातीलाच, आपल्या जमिनी गमवाव्या लागतील या भीतीने शेतकरी नाराज होते, त्यांचा सहभाग कमी होता. परंतु प्रकल्प सुरु झाला, आणि त्याची उपयोगिता आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रतिनिधींकडून माहिती झाल्यावर शासनाच्या मदतीची वाट न पहाता सर्व गावकरी आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे स्वयंसेवक यांच्या सहभागामुळे पूर्णत्वास आला. राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप यात नसल्याने हा प्रकल्प कमी वेळेत आणि कमी खर्चात पूर्णत्वास आला.”

 

पाणी नव्हे कृपा -

नद्या, ओढे आणि तलावांमध्ये कोट्यावधी लिटर पाणी साठले, पाणी अडले, पाणी जिरले. आजूबाजूच्या विहिरी आणि कूपनलिकांना पाणी आले. शेतकऱ्यांनी ऊस, कापूस, ज्वारी, तूर, मुग, फळे आणि भाजीपाला यांची शेती केली. शेती जोमात पिकली. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या हातात आता पुढील सुगीच्या लागवढीसाठी पैसे शिल्लक राहू लागले. शहरांकडे उपजीविकेसाठी जाणारा लोंढा थांबला आणि शेतीत राबू लागला. गावांमध्ये जनावरे, गुरे-ढोरे, दुध-दुभते वाढले. मानवी जीवन बहरू लागले. जल साक्षरतेमुळे पाण्याचा अपव्यय टळला.

जल-जागृती अभीयानामुळे लाभान्वित सर्व सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर विश्वास आणि कृतज्ञतेचे भाव होते. सर्वजण कृतज्ञतेने म्हणताहेत, “हे आम्हांसाठी पाणी नाही तर श्री श्री रविशंकरजींची कृपाच आहे, जिच्यामुळे आमचे संपूर्ण जीवन अमुलाग्र बदलून गेले.”

आणखी एका ग्रामस्थाची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया, “आमच्या गावातील तरुणांना आता मुली मिळतील आणि त्यांचे विवाह होतील. गावांत प्रथमच सोनाराचे दुकान सुरु झाले आहे.”

हे सर्व साकारले आहे आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टीमुळे. जल जागृती अभियानाची उपयोगिता लक्षात आल्यावर असेच प्रकल्प कर्नाटक आणि केरळमधील दुष्काळग्रस्त भागांमध्ये सुरु झाले आहेत. संस्थेने हे अभियान वर्षभरात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या दुष्काळी गावांमध्ये राबवण्याचा विडा उचलला आहे.

श्री सुनील निवृत्ती बेंबडे, शेतकरी, उंबडगा म्हणतात

“शासनाने जल प्रकल्पांवर करोडो रुपये खर्च केले आहेत, परंतु त्यांचा खर्च आणि कार्यपद्धती वादग्रस्त असतात. परंतु आर्ट ऑफ लिव्हींग सारख्या अशासकीय संस्थांच्या पुढाकाराने हा प्रकल्प खूपच कमी खर्चात पूर्ण झाला आहे. शासन आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या कार्य पद्धतीमध्ये खूप मोठा फरक आहे.”

 

सर्व जनतेला आणि उद्योग समूहांना आम्ही आवाहन करतो कि ह्या उदात्त कार्यात आपला हातभार असू द्या. आपण दिलेल्या योगदानामुळे दुष्काळ मुक्त क्षेत्र निर्माण होतील, ज्या मध्ये प्रत्येक घरात आणि शेतात भरपूर पाणी उपलब्ध असेल.

श्री श्री रविशंकर जी म्हणतात  "मानवी मूल्ये जपली जात नसतील, तर तुम्ही समृद्ध आहात म्हणणे निरर्थक आहे."

“आनंदी रहाण्यासाठी ‘देणे’ हाच योग्य मार्ग आहे - जेंव्हा तुमची कोणाकडून कसलीच अपेक्षा नसते व तुम्हाला फक्त द्यायचं असतं त्या वेळी तुम्ही आनंदी असता. जेंव्हा 'मागणे' संपते आणि 'देणे' सुरु होते आणि तुम्ही आनंदी राहू लागता"

जल जागृतीचे अनेक उपक्रम महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये चालू आहेत. सध्या हे प्रकल्प महाराष्ट्रात बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, नांदेड, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यामध्ये चालू आहेत. तरी आपल्याला ह्या उपक्रमात सहभागी होण्याची किंवा हातभार लावण्याची इच्छा असल्यास, खाली दिलेल्या माहिती अंतर्गत संपर्क साधावा:

टेलीफोन क्र. ०८२७५००५४९१

ईमेल: vvkilatur@gmail.com

लातूर येथील जल जागृती अभियाना अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा तख्ता:

गाव

तालुका मिटर

लांबी मिटर

रुंदी मिटर

खोल

गाळ (क्यू.मिटर)

क्षमता

(क्र. लिटर)

पाझर

सिंचन क्षेत्र

(एकर)

लाभार्थी

२०१४ मध्ये झालेले नाल्याचे काम

भादा

औसा

८०००

१०

१,६०,०००

२४

९६.००

२०००

६०००

नागरसोगा

औसा

६०००

९६,०००

१४.४०

५७.६०

१०००

४०००

गंगापूर

लातूर

१५००

१०

३०,०००

४.५०

१८.००

२००

६०००

सम्सापूर

रेणापूर

१५००

६,०००

.६०

२.४०

१००

१५००

एकूण

 

१७,०००

  

,९२,०००

४४

१७४

,३००

१७,५००

          

२०१४

तावरजा नदी       
          

शिऊर

लातूर

२०००

६०

२,४०,०००

३६.००

१४४.००

८००

२४००

आलमला

औसा

६०००

६०

७,२०,०००

१०८.००

४३२.००

२४००

४७००

उम्बडगा गंगापूर

औसा

१५००

६०

१,८०,०००

२७.००

१०८.००

६००

७८००

पेठ बुलढाणा

लातूर

२५००

६०

३,००,०००

४५.००

१८०.००

१०००

६६००

बुसनी बाभळगाव

औसा

७००

६०

८४,०००

१२.६०

५०.४०

२८०

९,६००

एकूण

 

१२,७००

  

१५,२४,०००

३१७

९१४.४०

५०८०

३१,१००

एकूण २०१३

 

३२,३६०

६०

२०,८०,२००

३१७

,२६९

९४८०

८२,१००