योगाच्या सहाय्याने श्वासाची दुर्गंधी घालवा. (Bad Breath Solution in Marathi)

कल्पना करा:अलीकडेच मिळविलेल्या यशाबद्दल कंपनीत एक स्नेहभोजन आयोजित केले आहे.त्यामध्ये तुमचे सर्व सहकारी,बोर्डाचे सदस्य हजर आहेत.तुम्ही सुद्धा छानसे भपकेदार कपडे,उंच टाचांचे बूट घातलेले आहेत. तुमचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक दिसतेय की,सर्वजण तुमच्याशी सलगी करण्यासाठी,बोलण्यासाठी आपण होऊन येत आहेत.

तुमचा पेहराव छान असला,तुमचे व्यक्तिमत्व सुंदर दिसत असले तरी एक गोष्ट लक्षात आल्यावर तुम्ही अस्वस्थ होता,ती म्हणजे तुमच्या श्वासास येणारी दुर्गंधी.तुम्ही खाल्लेल्या पदार्थांमुळे तसे झाले असेल आणि होत असेल असे तुम्हाला वाटते.त्या श्वासाच्या दुर्गंधीमुळे तुमच्याशी आपण होऊन बोलायला आलेले तुमचे सहकारी तुमच्या पासून लांब जायला लागतात किंवा संभाषण आवरते घेतात.

या निमित्ताने तुमच्या वरिष्ठांवर प्रभाव टाकण्याची नामी संधी हुकलेली असते.तुमचे व्यक्तिमत्व,पेहराव कितीही खुलून सुंदर दिसत असला तरी श्वासाच्या दुर्गंधीमुळे या सगळ्यावर पाणी पडते.ती संध्याकाळ खराब जाते.

तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास सूचना :

१.नैसर्गिक दंतमंजनाने दोन वेळा दात घासा.

२.जिभेवर साठलेले अन्नकण काढण्यासाठी 'टंग क्लीनर'वापरावा.

३.काही खाल्ले असल्यास गुळण्या करून तोंड स्वच्छ करा.

४.जास्तीत जास्त पाणी प्या.

५.मद्यपान आणि तंबाखू यांना दूरच ठेवा.

६.जेवण मोजकेच करा,आणि जो घास घ्याल तो व्यवस्थित चावून खा.

७.लसूण,कांदा यांचे प्रमाण अन्न पदार्थात जास्त असल्यास असे पदार्थ कमी खा.

८.शिळे अन्न खाऊ नका.

९.रोज योगाचा नियमित सराव करा.

आपल्या जीवनात अशा प्रकारच्या प्रसंगांना आपण कधी ना कधी सामोरे गेलेलो असतो.वैद्यकिय परिभाषेत श्वासाला येणाऱ्या दुर्गंधीला “हॅलिटोसिस’ (halitosis) म्हणतात.त्यामुळे आपण अस्वस्थ होतो, आपण आत्मविश्वास हळूहळू गमवायला लागतो.दात स्वच्छ न घासल्यामुळे श्वासाला दुर्गंधी येते असा बऱ्याच जणांचा समज असतो.परंतु तो सर्वार्थाने खरा नसतो,श्वासाला दुर्गंधी येण्याची इतरही कारणे असतात.जसे अनियमित खाण्याच्या सवयी,अपचन,कमी प्रमाणात पाणी पिणे आणि कोणत्या तऱ्हेचे आपण अन्न पदार्थ खातो,इत्यादि गोष्टी श्वास  दुर्गंधीला कारणीभूत ठरतात.

संशोधकांच्या मते,ज्यांचे तोंड आतून ओलसर असते त्यांना श्वास दुर्गंधीचा त्रास नसतो.परंतु ज्यांचे तोंड आतून कोरडे रहाते त्यांना श्र्वास दुर्गंधीचा त्रास होतो.

धुम्रपान किंवा दारू पिल्याने सुद्धा श्वासाला दुर्गंधी येते.तसेच जीभेवर धरलेल्या पांढऱ्या साक्यामुळे तिथे अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू निर्माण होतात आणि श्वासास दुर्गंधी येऊ लागते.

तोंडाच्या स्वच्छतेची नेहमीच प्राधान्याने खबरदारी घ्यावयास हवी.परंतु काही वेळा सर्व उपाय करूनसुद्धा श्वास दुर्गंधी जात नाही.तेंव्हा दुसरा उपाय म्हणून योगाची मदत घ्यायला हरकत नाही.योगाकडे एक शारीरिक व्यायाम म्हणूनच बघितले जाते.परंतु श्वास दुर्गंधी योगामुळे जाऊ शकते.योगासनांमुळे तुमचे शरीर अंर्तबाह्य स्वच्छ होते,ताण कमी होण्यास मदत होते आणि मनही शांत होते.

“श्री श्री योगा” हा एकूण १० तासांचा कोर्स (शिबीर) आहे.थोड्याच दिवसाच्या कालावधीत पुरा होतो.ह्यामुळे शारीरिक ताण तणाव,शारीरिक दुखणे कमी होण्यास मदत होते.योग प्राविण्य असलेल्या तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेतले जाते.जरूर पडल्यास वैयक्तिक स्तरावर आणि तुमच्या दिनचर्ये नुसार तुम्हाला  मार्गदर्शन केले जाते.हे शिबीर प्रथमच योगा शिकणाऱ्यांसाठी योग्य असावे अशा तऱ्हेनेच शिबिराची आखणी केली असल्याने तुम्ही घरीसुद्धा नियमित सराव चालू ठेवू शकता.

श्वास दुर्गंधी घालवण्यासाठी उपयुक्त आसने :

कपाल भाती प्राणायाम

पाठीचा कणा ताठ ठेवून आरामात बसा. दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने उघडे ठेवा.पंजे गुडघ्यावर ठेवा.श्वास आत घ्या आणि श्वास जोरात बाहेर सोडताना पोट आत खेचून घ्या.थोडासा वेळ पोट सैलसर सोडा. म्हणजे आपोआप श्वास आत घेतला जाईल. पुन्हा पोट आत खेचून श्वास सोडा,अशी एकूण २० आवर्तने करा.

योग मुद्रा

 

पद्मासनात अथवा सुखासनात बसा.डोळे बंद करा.मागील बाजूस उजव्या हाताचे मनगट डाव्या हाताने धरा.शरीर पुढे झुकवून कपाळ जमिनीला टेकवा.या अवस्थेत शरीर सैल ठेवा आणि परत पूर्वस्थितीत या.असे ५ ते १० वेळा करा.

 

शितकारी प्राणायाम (श्वासोच्छ्वासास थंड करण्यासाठी)

ओठ विलग करा.तोंड उघडे ठेवा.दातावर दात दाबा.आतून जीभ दातांवर घट्ट दाबून धरा. तोंडाने श्वास आत घ्या आणि नंतर तोंड मिटून नेहमी सारखा श्वास नाकपुड्याने श्वास बाहर सोडा.अशा तऱ्हेने ५ ते १० आवर्तने करा.डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा.

शितली प्राणायाम (श्वासोच्छ्वासास थंडावा येण्यासाठी)

जीभ बाहेर काढा.जिभेच्या दोन्ही बाजूच्या कडा जीभेच्या मध्यभागी आणा आणि तोंडाने श्वास आत घ्या.थोडावेळ श्वास रोखून धरा आणि मग नाकाने श्वास सोडा.असे ५ ते १० वेळा करा.

 

शंख प्रक्षालन

हे तंत्र श्री श्री योगाच्या लेव्हल २ च्या शिबिरात शिकवले जाते.

पद्मसाधना

दिव्य समाज निर्माण (DSN) शिबिरामध्ये पद्मसाधना शिका.

 

सिंहासन (सिंह स्थिती)

गुडघे टेकून योगाच्या चटईवर बसा.उजवे पाऊल डाव्या पार्श्वभागाखाली आणि डावे पाऊल उजव्या पार्श्वभागा खाली ठेवा.दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.हाताची बोटे पसरून ठेवा. पुढच्या बाजूला झुका. शरीराचे सर्व वजन दोन्ही हातांवर आले पाहिजे.दोन्ही हात सरळ ठेवा.तोंड उघडा.जीभ बाहेर काढा.डोळे उघडे ठेवून चेहऱ्याच्या स्नायूंना ताण द्या.तुमची दृष्टी नाकाच्या शेंड्यावर किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवा.

 

श्वासास दुर्गंधी येणे हे सर्व स्तरातील व्यक्तीमध्ये आढळते.तणाव ग्रस्त जीवनशैली,धावपळीचे जीवन यामुळे शारीरिक संतुलन बिघडते आणि मग निद्रानाश,डोकेदुखी,श्वासास दुर्गंधी यासारखे आजार संभवतात.यातून बाहेर पडून स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी श्री श्री योगाचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.वर दिलेल्या सूचनांमुळे तुमच्या अनेक शारीरिक व्याधी बऱ्या होऊन जीवनाचे अनेक पैलू उजळतील.वर दिलेल्या क्रियांच्या बरोबरीने आणखी काही योगासने करून योगिक जीवनाचा आनंद सर्वार्थाने उपभोगा.

शारीरिक दुखण्यामुळे तुमची प्रगती खुंटत आहे.तुमच्या वैयक्तिक जीवनावर आणि कामावर भावनांचा जास्त पगडा आहे कां?दैनंदिन जीवनात फार बदल न करता योगा करून प्रश्न सोडवा.

 

Interested in yoga classes?