वैराग्य (Follow dispassion in Marathi)

श्री श्री रविशंकर :

वैराग्य आपोआप येऊ लागते. तुम्ही मोठे होत असता तसतसे तुमचे मन लहानसहान गोष्टीत अडकत नाही. जसे तुम्ही लहान असताना लॉलीपॉप मध्ये गुंतलेले होतात पण जसे तुम्ही शाळा, कॉलेज मध्ये जाऊ लागलात तसे ते बंध सुटले. तुम्ही मोठे होता तेव्हाही तुमचे मित्र असतातच पण तुम्ही त्या बंधनाच्या वर निघून जाता. आई आणि मुलाच्या बाबतीतही असेच आहे. अडकून रहाणे आपोआपच कमी होते. जर वैराग्य नाही आले तर दु:ख होते. “मी इतकं केलं. माझ्या मुलांसाठी, मी इतकं सगळं केलं आणि आता बघा ते कसे वागताहेत ?”  आपण त्या दु:खाच्या चक्रात अडकून रहातो.” तुमची जी जबाबदारी होती ती तुम्ही पार पाडलीत. तुमच्या मुलांच्या भावनेवर त्याचे काही बंधन नाही. आपण जबरदस्तीने कुणाला भावना व्यक्त करायला सांगू शकत नाही. मनात ज्या काही भावना येतात त्या स्वाभाविकपणेच उद्भवतात. भावना निर्माण होण्याआधी परवानगी मागत नाहीत. पण जर तुम्ही ज्ञानात असलात तर नकारात्मक भावाना जवळ येत नाहीत. आणि सकारात्मक भावना येतात त्या कशाची तरी वासना आहे म्हणून नाही तर प्रेम म्हणून येतात. लोक म्हणतात की ज्ञानी लोक भावना मारून टाकतात. नाही, तसे काही नाही. सद्भाव असतोच. श्रीकृष्णानेही भगवद्गीतेत म्हटले आहे की , “जो माझ्याशी-चेतानेशी, उच्च स्व शी  बांधलेला नाही त्याला बुद्धीही नाही आणि भावनाही नाही. बुद्धी आणि भावनेशिवाय शांती आणि आनंद शक्यच नाही.“वासना आणि तिरस्कार यांचे प्रेमात रुपांतर करणे म्हणजे वैराग्य.” श्री शंकराचार्यांनी देखील म्हटले आहे की,जगात असा कोणताही आनंद नाही जो वैराग्याने मिळवता येत नाही. वैराग्य याचा अर्थ जंगलात जाऊन रहाणे, असा नाही. त्याचा इतका चुकीचा अर्थ लावला गेला आहे. वैराग्यात परमानंद आणि आनंद आहेच. जसे कमळ पाण्यात असूनही कोरडेच रहाते. त्याचप्रमाणे संसारात राहूनही संसाराला मनात घुसू देता कामा नये. पक्षी तुमच्या वरुन उडतात ते ठीक आहे पण त्यांना तुमच्या डोक्यात घर करू देऊ नका. संन्यास म्हणजे स्वत:मध्ये स्थित होणे. जो कश्यानेही हादरून जात नाही तो संन्याशी. संन्यास म्हणजे १०० टक्के वैराग्य आणि १०० टक्के परमानंद आणि कहीही मागणे नाही.

वानप्रस्थाश्रम या चौथ्या अश्रामानंतर संन्यास घेतला तर फार चांगले आहे. इतके समाधान की ‘माझे स्वत:चे कुणी नाही’ आणि ‘दुसरे असे कुणी नाही.’ किंवा अगदी हे शरीरदेखील माझे नाही.’ ही संन्यासाची स्थिती आहे. संन्यास म्हणजे मनात संपूर्ण आनंद. कपडे काढून जंगलात जाणे म्हणजे संन्यास नाही. तुमचा खरा स्वभाव परमानंद हाच आहे. पण या परमानंदाची मजा घेण्याच्या नादात तुम्ही , ‘असे आहे’ कडून ‘मी आहे’ वर घसरता. ‘मी शांत आहे’, ‘मी अति आनंदी आहे.’ आणि त्यानंतर,’मी अतिशय दु:खी आहे’, 'मी...आहे’, हे वैराग्य.तुम्ही कुठेही राहून वैराग्यात असू शकता. वैराग्यात सगळ्याचे स्वागत असते. केंद्रित रहाण्याने ऊर्जा आणि स्फुलिंग वाढते. अत्यानंदाची मजा घेण्याने आळस वाढतो. जर तुम्ही वैराग्यात असाल तर तिथे आनंद असतोच. जेव्हा फ्रीझर आईस्क्रीमने भरलेला असतो तेव्हा तुम्ही त्याची चिंता करत नाही. वैराग्यामुळे टंचाईची भावना रहात नाही. अति ओढ ही सुबत्तेचा, समृद्धीचा अभाव असण्याची भावना आहे. आणि जिथे सगळ्याची सुबत्ता, समृद्धी असते तेथे वैराग्य निर्माण होते. आणि जेव्हा वैराग्य असते तेव्हा सगळे काही भरपूर प्रमाणात येते.  

श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य  www.artofliving.org

 

Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri