गहऱ्या विश्रांतीसाठी श्वसन प्रक्रिया | Breathing Exercises for Relaxation

श्वास । Breath

आयुष्याची पहिली कृती -  श्वास घेणे. 

आयुष्याची शेवटची कृती - श्वास सोडणे.

या दोन कृत्यांमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वसतं. ‘ श्वास ’ आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. श्वासाविना जगणं  अशक्य आहे. तुम्ही कधी याचा विचार केला आहे? श्वास घेणे आणि श्वास सोडणे या प्रक्रियेकडे लक्ष दिले आहे? खरं म्हणजे हे काही करण्याची कधी गरजच पडत नाही कारण श्वास घेणे आणि सोडणे आपल्यासाठी सामान्य गोष्ट आहे. श्वासावर लक्ष दिल्यास स्वास्थ्य संबंधित फायदे मिळतात. जसे : रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन स्थिर होते आणि प्रसन्न रहाते.

श्वासासंबंधी शिकण्यासारखं काय असू शकते?  हाच विचार यावेळी बरेच लोक करत असतील. ही प्रक्रिया आपोआप सुरु नसते काय? श्वसन ही एक स्वाभाविक प्रक्रिया असली तरी प्राणायाम  (श्वासांचे व्यायाम) केल्याने श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेऊ शकतो. प्राणायाम केल्याने शरिरातील सर्व नाड्या खुल्या आणि शुध्द होऊन मनाला आणि शरिराला ऊर्जा प्राप्त होऊन स्वास्थ्य लाभते. 

योग आणि श्वास हे परस्पर संलग्न कसे आहेत हे आत्ता जाणून घेऊ.

प्राणायामामुळे आपण आपली मानसिक स्थिती बदलू शकतो | Your Breath Determines Your State Of Mind

श्वास आपला सर्वात जवळचा सोबती आहे. आपल्या मनोभावनांची त्याला खबर असते. पहा नां - जेंव्हा तुम्हाला राग येतो तेंव्हा श्वासाची गती वाढते.  जेंव्हा तुम्ही शांत असता तेंव्हा श्वास संथ असतो. मनानाजेच श्वासाचा फक्त शरीराशीच नव्हे तर मनाशी देखील संलग्न आहे. आपल्या सर्वाना आनंदी मन हवे आहे नां?  इथे प्राणायामाची गरज आहे.

प्राणायाम  हा शब्द दोन शब्दांनी बनला आहे – प्राण म्हणजे जीवन शक्ती आणि आयाम म्हणजे नियमात बांधणे. प्राणायामात आपण श्वासाच्या सामान्य गतीला खंडित करून त्यावर लक्ष देतो. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन प्रभावित होते. प्राणायाम केल्याने शरिरात भरपूर प्राण शक्तीचा संचार होतो आणि  मन ताजेतवाने होते. 

 

श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने आपण अवघड आसनांमध्ये देखील विश्राम करू शकतो | You can relax in difficult asanas by being aware of your breath

विपरीत शलभासन किंवा नौकासनासारख्या अवघड आसनात विश्राम करण्याचा विचार तरी करू शकता कां? नाही नां. पण आत्ता हे शक्य आहे. आसने करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मन शांत होतं आणि कोणत्याही आसनात तुम्ही विश्राम करु शकता.

मन आणि श्वासामध्ये  समन्वय प्राप्त करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे योग करताना मन वर्तमान क्षणामध्ये आणता येते. बऱ्याच वेळा असे होते की योगासन करताना मन इकडे तिकडे भरकटत जाते. अशावेळी मनाला वर्तमानात आणून योगाभ्यास सुधारु शकता. श्वासावर लक्ष देण्याने योगासनात तुम्ही तुमचे शंभर टक्के देऊ शकता. तसेच योग करताना चेहऱ्यावर एक स्मित हास्य असुद्या. जेणेकरून तुम्ही योगाभ्यासात विश्राम करु शकता आणि योगाचा आनंद घेऊ शकता. 

योगासन आणि श्वसन यामध्ये समन्वय कसा साधावा? How To Coordinate Your Breath With Postures?

  • योगासन करताना जर शरीर प्रसरण पावत असताना श्वास आंत घेऊया. म्हणजे समजा तुम्ही योगासन करताना हात पसरवता किंवा मागे झुकत आहात तेंव्हा श्वास आंत घ्यायचा.
  •  योगासन करताना शरीर आकुंचन पावत असताना श्वास बाहेर सोडूया. म्हणजे योगासन करताना पुढे वाकत आहात किंवा वळत आहात, शरीराला पीळ देताना श्वास सोडूया.
  • योगासन करताना कोणतीही सूचना नसेल तर श्वसन थांबवू नका. योगासन करताना श्वास थांबवत असाल तर याचा अर्थ तुम्ही आसनात विश्राम करत नाही आहात.

- योगामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो. योगाचे शारीरिक आणि मानसिक लाभ असले तरी योग कोणत्याही औषधोपचारांना पर्याय होऊ शकत नाही. योग प्रशिक्षित  श्री श्री योग (Sri Sri Yoga)  प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकणे आणि करणे योग्य आहे. आपणास काही शारीरिक किंवा मानसिक त्रास असेल तर योग शिक्षण सुरु करण्यापूर्वी प्रशिक्षकांना त्याची कल्पना द्या. श्री श्री योग शिबीर करण्यासाठी आपल्या जवळच्या  आर्ट ऑफ़ लिविंग सेण्टर  ला भेट द्या. आर्ट ऑफ लिविंगच्या इतर शिबिरांची माहिती मिळवण्यासाठी  info@artoflivingyoga.org  येथे संपर्क साधा.

सुदर्शन क्रिया अद्वितीय आणि अमुल्य कां आहे? | Why is Sudarshan Kriya unique

सुदर्शन क्रियेमुळे शारीरीक, मानसिक आणि भावनिक समन्वय साधला जातो आणि आपण पुन्हा नैसर्गिक लयीशी जोडले जातो. सुदर्शन क्रियेतील लयबद्ध श्वसनामुळे ९०% पेक्षा ज्यादा विषारी द्रव्ये बाहेर पडतात.

सुदर्शन क्रिया हि फक्त आर्ट ऑफ लिविंगमध्ये शिकवली जाते. जगातील करोडो लोकांना सुदर्शन क्रियेचा फायदा होऊन त्यांचे जीवन एक उत्सव बनले आहे.

श्री.गिरीश शाह, निवृत्त मुख्याध्यापक, कोरोची, कोल्हापूर आपला अनुभव सांगतात, “ कित्येक वर्षापासूनच्या पचनाच्या तक्रारीसाठी किती डॉक्टर आणि औषधोपचार झाले पण काही उपयोग होत नव्हता. सुदर्शन क्रियेच्या दररोज सरावामुळे ती तक्रार संपली, मन प्रसन्न राहू लागले. ६९व्या वर्षी देखील मी दिवसभर ताजातवाना आणि कार्यक्षम राहतो.”

सुदर्शन क्रियेबध्दल आणखी जाणून घेण्यासाठी सोबतचे आर्टिकल अवश्य वाचा:

https://www.artofliving.org/in-mr/what-sudarshan-kriya