योगाद्वारे सृजनशील बना, योग्य लाटेवर आरूढ व्हा Yoga and Creativity: Catch the wave in Marathi

तुम्ही पाय फळीवर उभे राहून समुद्रावर आरूढ होणारा स्वार पाहिलाय नां? समुद्रावर तरंगता तरंगता तो लाटेवर स्वार होण्यासाठी योग्य लाटेची प्रतीक्षा करत असतो, तशी लाट कधी मिळतेय आणि कधी आरूढ होतोय आणि किनाऱ्यापर्यंत कसा तिच्यावर स्वार रहातोय. तसेच अनंत कल्पनांमधूनच सृजनशीलता प्रकट होत असते. योगा अशा कल्पनांमधून योग्य पर्यायांची निवड करण्याची क्षमता देतो. योगाच्या माध्यमातून अश्या योग्य पर्यायांची निवड करा आणि येत असलेल्या दुसऱ्या योग्य पर्यायाची वाट पहा आणि सृजनशील बना.

योगा करून दिवसाची सुरवात करा.

पहाटेमधून नवीन दिवस निर्माण होतो. दिवसाची सुरवात तासभर योग आणि ध्यान करून शांतपणे करा. योगासनानंतर आर्ट ऑफ लिविंगमध्ये शिकलेली श्वसन प्रक्रिया ‘सुदर्शन क्रिया‘ करा. सुदर्शन क्रियेमुळे तणाव कमी होतो, मन शांत होते. असे शांत मन नैसर्गिकदृष्ट्या सृजनशील बनण्यासाठी मदत करते. योग साधनेनंतरचा ताजा तवाना दिवस म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीचे रंग उतरवण्यासाठी मिळालेला कोरा कागद होय. योगसाधना संपल्यावर नोंदवहीत त्यावेळी सुचलेल्या सृजनशील कल्पना लिहून काढा.

स्वतःच्या कल्पनेतील योगा स्थळ बनवा.

कामाच्या ठिकाणी आणि घरी स्वतःला सुचेल अशी योग करण्यासाठी जागा बनवा. यासाठी मार्गदर्शक ध्यानाच्या ध्वनी मुद्रिका, आरामदायक खुर्ची, चटई आणि काही उश्यांचा वापर करू शकता. आणखी सृजनशीलतेसाठी काही कला कृती, मंद संगीत यांचा वापर करा. या स्वतः बनवलेल्या जागेत दररोज कमीतकमी पंधरा मिनिटे लिखाण करा, चित्रे काढा, संगीत वाजवा.

सृजनशीलता आणि ध्यान यांची सांगड घाला. 

मोठ्या आणि सक्षम लाटेवर स्वार होण्यासाठी तो स्वार जसे खोल पाण्यात सूर मारतो तसे तुम्हीदेखील तुमच्या सृजनशीलतेमध्ये खोल उतरा. काही रोमांचक खेळ शिका, जुनी कला जोपासा. नियमित ध्यानाच्या सरावाने तुमच्यातील सुप्त गुण जागे होतील जे तुमच्यात आहेत याची तुम्हाला देखील माहिती नाही. यासाठी सूचना : सृजनात्मक काम सुरु करण्यापूर्वी ध्यान करा आणि मग ते काम सुरु करा.

निसर्गापासून प्रेरणा घ्या.

कधी कधी दुपारच्या वेळेला मला जाणवते की माझी कल्पकता थकतेय. हीच निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारण्याची वेळ आहे. जवळच थोडी घनदाट झाडी असणारा पदपथ आहे जेथे छाती भरून ताजी हवा आणि डोक्यात नव नवीन कल्पना भरून घेऊ शकतो. तेथे माझी एक आवडती जागा आहे जेथे बसून मी निसर्ग न्याहाळत बसतो. कोणती फुले उमलली आहेत, कोणत्या पक्षांचे आवाज ऐकू येतात? दहा पंधरा मिनिटे निसर्गात फिरल्याने माझे मन ताजे तवाने होते आणि नवीन कल्पना सुचु लागतात.

दिवसभरात ध्यान करा.

लाटांवर स्वार होणारे दिवसभरात एखाद्या तरी अविस्मरणीय लाटेवर आरूढ झाल्याशिवाय परतत नाहीत. मधे मधे स्वार होण्यासारख्या लाटा नसतात, लाटा शांत असतात. ही संधी असते त्या स्वाराला आपली ऊर्जा गोळा करण्याची. या वेळेत तो आजूबाजूची निसर्ग दृश्ये पाहतो. दुपारच्या वेळी केलेले ध्यान हे ओहोटीच्या लाटेप्रमाणे असते. त्यावेळी अस्ताव्यस्त भटकलेले मन परत शांत होण्यासाठी विश्राम करते. जेंव्हा मन बेचैन होते, मन आपली प्रसन्नता गमावते, जेंव्हा सृजनशील विचार थांबतात तेंव्हा वीस मिनिटांच्या ध्यानामुळे मन शांत होऊन पुन्हा सृजनशील बनण्यास मदत होते. दुपारच्या जेवणापूर्वी किंवा सायंकाळी केलेल्या ध्यानामुळे तुम्ही ताजेतवाने होऊन पुन्हा कामाला लागता.

योगामुळे प्रवाहात रहाल.

लाटेवर आरूढ होणारा स्वार अत्युत्तम लाट निवडतो, तिच्यावर स्वर होतो, लाटेची भयावह सुरळी त्याच्याभोवती असते. त्याची तमा न बाळगता तो लाटेचा प्रवाह शोधतो आणि सहजपणे दुसऱ्या टोकाला पोहोचतो. आपल्या उत्तम कल्पनांचा प्रवाह देखील सहज असतो - अगदी श्वासासारखा. एक प्राणायाम जाणून घेऊया ज्यामुळे आपल्याला आपल्या श्वासाचा प्रवाह जाणून घेता येईल. डोळे मिटून आरामात बसा. दीर्घ आणि खोल श्वास घ्या आणि सोडा. श्वासाच्या प्रवाहाकडे लक्ष घेऊन चला. त्यात कंप आहे की संथ आणि स्थिर आहे? पूर्ण श्वास घेण्यासाठी मध्ये थांबून श्वास घ्यावा लागतो कां? संथ आणि खोल दहा श्वास घेत राहा.

आत्ता तुमची नोंदवही काढा. त्यात एका पानावर एक कल्पना लिहा, तिच्या भोवती वर्तुळ काढा. आत्ता या कल्पनेशी संबंधित ज्या कल्पना सुचतील त्या लिहायला सुरु करा. प्रत्येक नवीन शब्दाभोवती वर्तुळ काढा आणि रेषा मारून त्याला मूळ कल्पनेशी जोडा. जेंव्हा थांबावेसे वाटेल सोडून द्या. तुमचा सराव संपला.

योगामुळे तुम्ही तुमच्या ‘प्रिय’ गोष्टी करू लागता. 

योगसाधनेमुळे आपल्या सृजनशीलतेप्रती सजगता वाढू लागते. आपण मग आपल्या प्रिय गोष्टी करू लागतो. योग आणि ध्यानामुळे आपले लक्ष मनाकडे जाऊ लागते. एकाग्र आणि शांत मनामुळे आपल्याला नेमके काय हवे आहे कळते, आत्मिक सुख काय आहे ते कळते, आपण ते प्राप्त करू लागतो. हा प्रवास त्या लाटेवर आरूढ स्वाराच्या प्रवासासारखाच आहे, लाटेच्या सुरळीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे.

लेखिका मरिलीन गॅलन

(लेखिका स्वतः योगतज्ञ असून योगासने आणि अध्यात्मिकतेवर लिहिणे हा त्यांचा छंद आहे.)