या आसनाचा उच्चार न-ट-राज-आ-स-न असा होतो. संस्कृत शब्द नट म्हणजे नर्तक आणि राज म्हणजे राजा. नटराज म्हणजे नृत्याचा देव. हे शिवाचे दुसरे नांव आहे ज्याचे वैश्विक नृत्य हे विश्वाची निर्मिती आणि विनाश आहे.
नटराजसन कसे करावे
१. पाय एकत्र ठेवून आणि हात बाजूला ठेवून उभे रहा. (ताडासन पहा)
२. श्वास घ्या आणि उजवा पाय मागे वाकून डाव्या हाताने डाव्या पायाला पकडा आणि त्याच वेळी उजवा हात सरळ समोर पसरवा.
३. डाव्या हाताने डावा पाय शक्य तितक्या उंच उचलताना उजवा हात जमिनीपासून सुमारे ४५ अंशापर्यंत येईपर्यंत वर उचलणे सुरू ठेवा.
४. हळूवारपणे श्वास घेताना आसनामध्ये स्थिर राहा. आपली नजर क्षितिजाच्या किंचित वर स्थिर ठेवा.
५. सुमारे एक मिनिट नटराजासनात रहा आणि नंतर हळूहळू उभ्या स्थितीत परत या. हात आणि पाय यांची अदलाबदल करीत हे आसन पुन्हा २-४ करा.
कालावधी/पुनरावृत्ती:
सुरुवातीला नटराजासन सुमारे एक मिनिट करा आणि जसजसे आपणास सुखावह होईल तसतसे हळूहळू वेळ वाढवत न्या. उजवीकडून डावीकडे अशी हात आणि पाय यांची अदलाबदल करीत या आसनाची तीन वेळा पुनरावृत्ती करा.
नटराजसनाचे फायदे
- नटराजासन लालित्यपूर्ण करा जणू नाचत आहोत, अशाप्रकारे, आणि तरीही दृढपणे लक्ष केंद्रित करा.
- या आसनामुळे आपला समतोल आणि आपली एकाग्रता मजबूत होण्यास मदत होते. मागच्या आणि ताणलेल्या पायांनी तयार केलेली कमान पाठीच्या मणक्यांना हळुवारपणे पंक्तिबद्ध करते ज्यामुळे लवचिकता पुनःस्थापित होते आणि खराब अंगस्थितीमुळे किंवा बराच वेळ बसल्यामुळे पडणारा ताण कमी होतो. हे नितंब आणि पाय यांच्या स्नायूंना सुडौल करते तसेच छातीच्या स्नायूंना उत्तेजित करते.
हे आसन कोणी करू नये
पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यास हे आसन करणे टाळावे.
सर्व योगासने मागील योगासन : हलासन पुढील योगासन : विष्णुआसन










