खुर्चीवर बसणे खूप सोपे आणि आरामदायक वाटू शकते. पण काल्पनिक खुर्चीत बसणे थोडे आव्हानात्मक असू शकते! आणि उत्कटासनामध्ये आपण हेच करतो. उत्कट याचा शाब्दिक अर्थ तीव्र किंवा शक्तिशाली असा आहे.
(उत्कट = तीव्र, शक्तिशाली; आसन = आसन; उ-त्-कट- आसन असे उच्चारले जाते).
उत्कटासनामध्ये जास्त काळ राहण्यासाठी आपणास थोडासा दृढनिश्चय आवश्यक आहे. आपण सुरुवात करण्यापूर्वी प्रतिबंधात्मकता आवश्यक वाचावे.
उत्कटासन कसे करावे
- आपल्या पायामध्ये थोडे अंतर ठेवून ताठ उभे राहा.
- हाताचे तळवे खालच्या दिशेने ठेऊन आपले हात पुढच्या बाजूला पसरवा. हात कोपरातून वाकवू नका.
- गुडघे वाकवा आणि हळुवारपणे कटिभाग खालीच्या दिशेने करा जणू काही आपण एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसला आहात.
- आरामदायक व्हा किंवा निदान तसे होण्याचा प्रयत्न करा! उत्कटासनाचा चांगला अनुभव घेण्यासाठी, आपण बसलेले असताना वर्तमानपत्र वाचत आहात किंवा लॅपटॉपवर टाइप करत आहात अशी कल्पना करा.
- आपले हात जमिनीला समांतर आहेत याची खात्री करा.
- जागरुकतेने, सरळ बसा आणि पाठीचा कणा ताठ करा. शिथिल राहा.
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आनंद घेत श्वास घेत राहा आणि वर्तमानपत्राची पाने फिरवा.
- हळू हळू खाली जात खुर्चीत खोलवर जा पण आपले गुडघे पायाच्या बोटांच्या पुढे जाणार नाहीत याची खात्री करा.
- हळू हळू खाली जात राहा आणि नंतर सुखासनात बसा. इच्छा असल्यास पाठीवर झोपू शकता आणि आराम करू शकता.
श्री श्री योग तज्ञाकडून टीप: आरंभापासून शेवटपर्यंत प्रसन्न राहा. यामुळे हे आसन अधिक काळ धरून ठेवण्यास मदत करेल. इतर सर्व उभ्याने करावयाची योगासने झाल्यानंतर उत्कटासन करणे योग्य आहे. त्यानंतर बसून करावयाची योगासने किंवा झोपून करावयाच्या योगासनांची सुरुवात करू शकता.
उत्कटासनाचे फायदे
- पाठीचा कणा, नितंब आणि छातीच्या स्नायूंचा व्यायाम होतो.
- पाठीचा खालचा भाग आणि धड मजबूत होण्यास मदत होते.
- मांडी, घोटा, पाय आणि गुडघ्याचे स्नायू सुडौल होतात.
- शरीराचा समतोल राखते आणि मनात दृढनिश्चय आणते.
उत्कटासन कोणी करू नये
- गुडघेदुखी, सांधेदुखी, घोटा लचकला असेल, गुडघ्याची कोणतीही समस्या किंवा खराब झालेले अस्थिबंध, डोकेदुखी किंवा निद्रानाश असेल तर या योगासनाचा सराव करू नये.
- मासिक पाळीच्या दरम्यान किंवा पाठीच्या खालच्या भागात दुखत असेल तर हे योगासन करताना विशेष काळजी घ्या आणि हळूवारपणे पुढे जा.
सर्व पहा – उभ्याने करायची योगासने
सर्व योगासने मागील योगासन: गरुडासन पुढील योगासन: कोनासन










