योगामुळे नैसर्गिकपणे पचनक्रिया सुधारते

चांगली पचन संस्था असणे म्हणजे निरोगी जीवनाचा एक आधारस्तंभ आहे. जर पचनसंस्था चांगली असेल तर बध्कोष्ट, पोटदुखी, अल्सर, गळू, तारुण्यपीटिका, पोट फुगणे या गोष्टी दूरच रहातील.

महत्वाच्या सूचना:

  • जेवणाच्या आधी आणि नंतर अर्धा तास पाणी पिणे टाळा.
  • रात्री जड जेवण घेणे टाळा.
  • जेवण झाल्यावर लगेच आडवे होऊ नका. 
  • योग साधना नियमितपणे करा.
  • अनारोग्यकारक आणि तेलकर आहार टाळा.
  • • आहारात तंतूमय पदार्थ असू द्या.

पचनाच्या तक्रारी:

गरजेपेक्षा जास्त खाणे, अवेळी जेवणे, अनारोग्यकारक जेवणाच्या सवयी आणि तणावपूर्ण जीवनशैली ही अपचनाची काही कारणे आहेत. जेव्हा अपचन होते तेव्हा जेवण टाळणे किंवा अँटासिडची गोळी घेणे असे उपाय परिणामकारक असतात पण हे उपाय तात्पुरतेच असतात.

दिर्घकालीन उपाय:

तुमच्या रोजच्या दिनचर्येत एकदम बदल घडवणे अवघड असले तरी काही उपायांनी पचनसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि त्याला बळकटी आणणे शक्य आहे. शरिर पुन्हा पूर्वीसारखे उत्तम स्थितीत आणायचे असेल तर योगासारख दुसरा चांगला उपाय नाही. योग हे कोणतेही दुष्परिणाम नसलेले आणि काळसिध्द आहेच त्याशिवाय आपल्या दिनचर्येत फारसा बदल न करता नैसर्गिकरीत्या शरिरच जीर्णोद्धार करणे यासाठी योगाचे महत्व सर्वमान्य आहे.

फक्त या साध्या सोप्या आसनांचा सराव करण्याने तुमच्या पचनसंस्थेच्या अवयवांना आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

उष्ट्रासनाने शरीराचा पुढील भाग ताणला जाऊन मोकळा होतो आणि त्यामुळे पचनक्रियेस मदत होते. या आसनाने शरीराची ढब सुधारते आणि पाळीचा त्रास कमी होतो.

पद्मासन हे एक पासून करण्याचे सोपे आसन आहे ज्याने पचन क्रियेत मदत होते. याने स्नायूंमध्ये असलेला ताण कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणाखाली रहातो.

 

धनुरासानाने पोटाचे स्नायू ताणले जातात आणि बळकटी येते. हे आसन केल्याने बद्धकोष्ठ, आणि पाळीचा त्रास दूर होतो.

नौकासन केल्याने पोटातील अवयवांना बळकटी येते आणि पचन क्रिया सुधारते. शरीरात साठलेला ताण कमी होतो आणि पाठीला बळकटी येते.

 

पोटातील अवयवांना व्यायाम मिळतो आणि पचन क्रियेस मदत होते. या आसनाने चिंता, ताण आणि नैराश्य दूर होते.

पवन मुक्तासनाने पोटातील अवयवांना मालिश होते आणि त्यांना बळकटी येते. या आसनाने पोटातील गॅस कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते.

 

 

आयुर्वेद : हा एक आरोग्यदायी दृष्टीकोन आहे.

 

योगाचा स्विकार करत असताना तुमच्या जीवनशैलीत आयुर्वेदाचाही समावेश करावा. आयुर्वेदामुळे आपल्या शरिर संस्थेचा नैसर्गिक समतोल राखला जावा यासाठी जीवनशैलीतील उपयुक्त सवयी समजतात. आयुर्वेदामुळे आपल्याला रोगाचा प्रतिकार कसा करायचा हे ही कळते. आणि जर आजार झाला तर तो मुळापासून कसा घालवायचा याची माहिती मिळते.

योग हे फक्त पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे असे नाही तर संपूर्ण शरीरासाठी आहे. तुम्ही जर इतर कुठलाही व्यायामप्रकार करत असलात तरी त्यासोबत तुम्ही योगासने अगदी सहज करू शकता. इतर कुठल्याही शारीरिक व्यायामाप्रमाणेच योगाचे परिणाम दिसून येण्यास काही काळ लागतो. नियमित सरावाने पाचक्रिया सुधारण्यास, शरीर बांधेसूद होण्यास आणि लवचिकपणा वाढण्यास मदत होते.

त्यामुळे योगासने करण्यासाठी रोज अर्धा तास द्या आणि तुमची पचनक्रिया पुन्हा पहिल्यासारखी उत्तम ठेवा.