तुमच्या दिवसाचा प्रारंभ ध्यानाने करा (Yoga for Beginners in Marathi)

व्यायामशाळेत जाऊन उठ्याबश्या काढणे, चालण्याचा व्यायाम करणे किंवा कदाचित वजन उचलून स्नायू सुडौल बनवतानाच तुम्ही आनंदी रहायला शिकलात तर? जर दिवसभर आनंदी राहण्याचे आपल्याला स्वतःला प्रशिक्षण देता आले तर? आणि हे सतत आनंदाचे स्रोत आपण डोळे बंद करून मिळवू शकलो तर? ध्यान हे स्वतःच्या आत खोलवर जाण्याची कला आहे. आणि ध्यान हे कधीही न संपणाऱ्या उत्साह आणि आनंदाचे स्रोत आहे. सकाळच्या वेळेत ध्यान सामील केल्याने दिवसभराकरिता भरपूर उर्जा मिळते आणि आपल्याला इतके आनंदित आणि शांत वाटते की आपण दिवसभर हसतमुख असतो.

दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडत असतात म्हणून सकाळी ध्यान करण्यास स्वाभाविकतः सर्वात उत्तम वेळ आहे. भारतात बंगलोरमध्ये कोमल कपूर ही तरुण उद्योजक आहे आणि स्वीट म्युसिंगस अँन्ड लिटील बाईटस याची मालकीण. ती म्हणते, “जेव्हा मी सकाळी ध्यान करते तेव्हा मी खूप कमी वेळात बरेच काम करू शकते. दिवसभर मी अधिक शिथिल आणि शांत असते”. मानसिक स्पष्टता, आंतरिक शांती आणि दिवसभराची प्रसन्नता असा अनुभव आल्याचे अनेकांनी सांगितले. म्हणूनच सकाळी ध्यान करणे ही दिवस यशस्वी करण्याची गुरुकिल्ली आहे.

सकाळी ध्यानाच्या सरावाकरिता खाली दिलेल्या काही सोप्या सूचना आहेत:

१. ध्यानाकरिता तुमच्या घरात एक खास जागा निर्माण करा.

तुमच्या घरातील एक खास कोपरा रिकामा करा जो तुम्ही विशेषतः ध्यानासाठीच वापराल. तिथे सजावट करा किंवा सुंदर चित्रे लावा. जवळच्या टेबलवर तुमची आवडती फुले किंवा सुवासिक रोपे ठेवा. या जागेची सजावट हलका पिवळा, हलका निळा किंवा हिरवा अश्या शांत रंगांनी करा. आराम खुर्ची किंवा सोफा आणि त्यावर उश्या ठेवून जागा सुशोभित करा आणि तुमच्या खांद्यांवर ठेवायला म्हणून एका हलक्या ब्लँकेटची त्यात भर घाला.

२. तुमचे सकाळचे ध्यान झाल्यानंतरच सकाळची न्याहारी घ्या.

तुमचे सकाळचे ध्यान होईपर्यंत अन्न ग्रहण करणे टाळावे कारण भरल्या पोटामुळे जडत्व येते.

३. सकाळच्या फेर-फटक्याने दिवसाची सुरुवात करावी

आपण निसर्गाच्या सान्निध्यात असलो की आपला जीवनाच्या स्रोतासोबत पुन्हा जोडल्या जातो. ध्यान करण्याच्या आधी सकाळी फिरून आल्याने गवतांवरचे दवबिंदू यांचा अनुभव उल्हासित करतो. आणि आपल्याला सकाळची शांतता आणि स्तब्धता अनुभवायला वेळ मिळतो.

४. ध्यान करण्याआधी तुमचा सकाळचा व्यायाम करा

जर तुम्हाला सकाळी जॉगिंग करणे किंवा व्यायाम करणे आवडत असेल तर सर्वप्रथम जोशपूर्ण व्यायाम करावेत आणि नंतर ध्यान करण्यास बसावे. तुमचे ध्यान हे तुमच्या शरीराला थंडावा देणारी शिथिलता देते आणि त्याचवेळी तुमच्या मनालासुद्धा शांत करते.

५. ध्यान करण्याची पूर्वतयारी करा शिथिलता देणारी योगासने

मॉर्निंग वॉक किंवा सकाळच्या व्यायामांनंतर, योगासने केल्याने शरीर शिथिल होते आणि स्नायू सुडौल होतात. खाली योग आसनांचा क्रम दिलेला आहे तो तुम्ही करू शकता:

सूर्य नमस्कार

सूर्य नमस्कार ही योगासनांची मालिका आहे ज्यामध्ये एका पाठोपाठ एक आसनांचा संच आहे जो सर्व जीवांना आधार देणाऱ्या सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या तंदुरुस्त होण्याबरोबर आणि मनाला शांत करण्याबरोबर सूर्यदेवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा ह्याच्या पेक्षा सोपा मार्ग असू शकतो का? सूर्य नमस्कारांचा संच हा सकाळच्या योगाच्या परिपाठासाठी सर्वोत्तम प्रारंभ आहे.

"हा" श्वास

तुमच्या पायांमध्ये खांद्यांइतके अंतर ठेवून उभे राहा. तुमच्या हातांना शरीराच्या बाजूला लोंबते राहू द्या. दीर्घ श्वास हळूहळू आत घेत, हात डाव्या बाजूला फिरवा. जसा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा मोठ्याने “हाः” आवाज करा आणि तुमच्या हातांना उजव्या बाजूला उडवा.याच सूचनांचे पालन करीत हाः हातांची दिशा बदलून डावीकडे करा.

जीवनाचा श्वास

तुमच्या पायांमध्ये खांद्यांइतके अंतर ठेवून उभे राहा. श्वास आत घेत, तुमचे हात बाहेरच्या दिशेने बाजूला न्या, हाताचे तळवे वरच्या दिशेने असावेत. श्वास सोडा. तुमचे डोके व हात मागच्या दिशेने झुकवा, डोके वर उचलावे आणि वरती पाहात दीर्घ श्वास घ्यावेत. श्वास सोडत डोके खाली वाकवत छातीवर आणावे आणि हात समोर घेऊन स्वतःला मिठी मारीत आहात अशाप्रकारे ठेवावेत. श्वास आत घ्यावा आणि हा जीवनाचा श्वास अजून दोन ते तीन वेळा पुन्हा करावा.

हे योगासन शरीराचे संतुलन सुधारते आणि जोम वाढतो. या आसनामुळे मांगल्य, धैर्य आणि शांतात हेसुद्धा निर्माण होते.

हे योगासन मानसिक आणि शारीरिक संतुलन वाढवते. यामुळे पचन सुधारते आणि अस्वस्थता कमी होते.

हे आसन पाठीच्या सर्व स्नायूंना ताण देते आणि रक्त पुरवठा वाढवून मज्जासंस्थेला तरतरी आणते.

 

 

हे आसन पाठीचा खालचा भाग, गुढघ्याच्या मागचे स्नायू आणि नितंब यांना ताणते. तसेच हे ओटीपोट आणि कटिभागातील इंद्रियांना मालिश करते आणि सुडौलसुद्धा बनवते.

हे आसन पाठीच्या कण्याला लवचिक बनवते.हे छातीलासुद्धा मोकळे करते आणि फुफ्फुसांना प्राणवायूचा पुरवठा वाढवते.

 

योग निद्रा

या योगासनांच्या सरावानंतर, योग निद्रेचा अनुभव घेण्यासाठी, पाठीवर झोपावे. स्वतःला शिथिल करावे आणि तुमचे डोळे बंद करावे. कदाचित तुम्हाला काही मिनिटे गाढ झोप लागू शकते.

 

६. ध्यानाकरिता बसण्याच्या आधी शरीर आणि मनाला तरतरी येण्याकरिता प्राणायाम करा.

संस्कृतमध्ये प्राणायाम म्हणजे “जीवन शक्तीचा विस्तार”. ध्यानाच्या आधी थोडे प्राणायामाचे व्यायाम करण्याने टवटवीत वाटण्यात आणि शरीर आणि मनाला ध्यानाच्या तयारीसाठी अविचल करण्यासाठी फारच चांगले आहे.”

७. जेव्हा तुम्ही ध्यान करण्याकरिता तयार असाल तेव्हा तुमच्या ध्यान करण्याच्या खास जागेवर सुखासनात बसा.

मार्गदर्शित ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी इथे क्लिक करा.

८. ध्यान करून झाल्यानंतर काही मिनिटे स्वतःला शांतता अनुभवू द्या. लगेचच दिवसभराच्या कामाला लागू नका.

तुम्ही आंतरिक शांती आणि आनंदाच्या दिशेने एक पाउल उचलले आहे हे जाणून दिवसभर हसतमुख राहा.

 

ध्यानाच्या नियमित सरावामुळे मन शांत होते, कार्यक्षमता वाढते आणि आत्मविश्वासाला चालना मिळते. तर, मग दररोज स्वतःबरोबर काही शांत वेळ घालवण्याचा डोस घ्या आणि दिवस आपल्या नियंत्रणात ठेवा.

नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी नाही. आर्ट ऑफ लिव्हिंग योगाप्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा  सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबीराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमचा प्रतिक्रिया नोंदवायची आहे का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf