उत्कटासन | Chair Pose - Utkatasana

खुर्चीत बसणे आरामदाई आहे. परंतु काल्पनिक खुर्चीत बसणे थोडे आव्हानात्मक आहे. आपण नेमके हेच उत्कटासनमध्ये करतो. उत्कट याचा शब्दशः अर्थ आहे सामर्थ्यदाई, तीव्र.

तुम्हाला या आसनात स्थिर राहण्यासाठी थोड्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. हे आसन करण्यापूर्वी खालील सूचना जाणून घ्या.

Utkatasana

उत्कटासन करण्याच्या ९ पायऱ्या | 9 Steps to Chair Pose

  1. पायात थोडे अंतर घेऊन ताठ उभे राहूया.
  2. तळहात जमिनीकडे असतील अश्या रीतीने हात खांद्याच्या रेषेत वर उचलुया. हात कोपरात वाकू नयेत.
  3. गुडघे वाकऊन आपले ओटीपोट असे खाली अनुया जणू आपण एका काल्पनिक खुर्चीत बसतो आहोत.
  4. आरामात स्थिर रहा. यासाठी काल्पनिक वर्तमानपत्र वाचा किंवा लॅपटॉपवर टाईप करत आहात समजा.
  5. हात जामिनाला समांतर आहेत नां, याची खात्री करा.
  6. सजगतेने ताठ बसा, पाठ ताठ ठेवा.
  7. श्वसन सुरु ठेवा. वर्तमानपत्रातील सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचून काढा.  Chair Yoga Pose | Utkatasana Yoga Pose
  8. हळुवार खाली सरकून खुर्चीत आणखी खोल बसा पण आपले गुडघे आपल्या पावलांच्या पुढे नाहीत नां, लक्ष ठेवा.
  9. आणखी खाली खाली जात सुखासनात बसा. गरज वाटल्यास पाठीवर झोपून विश्राम करा.

श्री श्री योग तज्ञांची Sri Sri Yoga सूचना : संपूर्ण आसनभर चेहऱ्यावर हास्य असुद्या. याची तुम्हाला हे आसन दीर्घ काळ टिकऊन ठेवण्यास मदत करेल. हे आसन उभे राहून करायच्या आसनांच्या शेवटी केल्यास या आसनानंतर आपण बसून sitting yoga postures तसेच  lying down yoga postures. झोपून करावयाची आसने करू शकतो.

उत्कटासनाचे लाभ | Benefits of Chair Pose

  • पाठीचा कणा, कंबर आणि छातीच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.
  • पाठीचा खालील भाग strengthen the lower back आणि धड मजबूत बनण्यास मदत होते.
  • मांड्या, घोटे आणि गुडघ्याचे स्नायू मजबूत बनतात.
  • शरीरात समतोल आणि Balances the body मन निर्धारी बनते.

उत्कटासन कोणी करू नये | Contraindications of the Chair Pose

  • जर गुडघे दुखी, अर्थरायटीस, घोट्यामध्ये दुखापत, पायाचे कोणतेही दुखणे, डोके दुखी किंवा अनिद्रा यांचा त्रास असेल तर हे आसन करू नये.
  • कंबरदुखी तसेच मासिक स्त्राव सुरु असेल तर धीम्या गतीने हे आसन करावे.

उत्कटासन | Chair Pose Video

View All - Standing Yoga Postures

<<जनुशीर्षासन|One-Legged Forward Bend                      वृक्षासन| Tree Pose >>

 

(beneficial-yoga-poses)

योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने  योगाभ्यास करावा. श्री श्री योग Sri Sri Yoga कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी  info@srisriyoga.in या संकेतस्थळावर भेट द्या.